The Vaccine War And Fukrey Dainik Gomantak
मनोरंजन

Box Office Collection: 'फुकरे 3' अन् 'द वॅक्सिन वॉर'कडे प्रेक्षकांनी फिरवली पाठ

Box Office Collection: मात्र बॉक्स ऑफीसवर हे दोन्ही चित्रपट म्हणावी तशी कमाई करु शकले नाहीत.

दैनिक गोमन्तक

Box Office Collection: सध्या चित्रपटगृहात बॉलीवूडचे अनेक चित्रपट प्रदर्शित होत आहेत. त्यापैकी कोणता चित्रपट आपल्या प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यात यशस्वी ठरणार हे पाहणे उत्सुकतेचे आहे.

नुकतेच शाहरुखच्या जवानने अनेक विक्रम करत इतर चित्रपटांपुढे एक रेकॉर्ड सेट केले आहेत. 'फुकरे 3' आणि 'द वॅक्‍सीन वॉर' हे दोन चित्रपट नुकतेच प्रदर्शित झाले आहेत. मात्र बॉक्स ऑफीसवर हे दोन्ही चित्रपट म्हणावी तशी कमाई करु शकले नाहीत.

फुकरे ३ आणि विवेक अग्नीहोत्रीचा द वॅक्सिन वॉर हे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत होते. द वॅक्सिन वॉर पहिल्याच दिवशी एक कोटीची कमाई करण्यात अपयशी ठरल्याचे चित्र दिसून आले आहे.

मृगदीप सिंह लांबा यांनी दिग्दर्शित केलेल्या 'फुकरे 3' चित्रपटाकडून अपेक्षा होत्या कारण याआधीच्या फुकरे २ आणि फुकरे या चित्रपटांनी प्रेक्षकांचे भरभरुन मनोरंजन केले होते. मिळालेल्या माहीतीनुसार, चित्रपटाने पहिल्याच दिवशी 8.82 कोटीचा गल्ला जमवण्यात यश आले आहे. यातील २.५ कोटी अॅडव्हान्स बुकिंगमध्ये कमावले होते. फुकरे ३ चे बजेट ४० कोटी आहे. आठवड्याच्या शेवटी चित्रपट चांगली कमाई करु शकतो असे म्हटले जात आहे.

दुसऱ्या बाजूला विवेक अग्नीहोत्रीच्या वॅक्सिन वॉरने फक्त ८५ लाख इतकी कमाई केली आहे. १२.५ कोटी बजेट असलेल्या चित्रपटाने ८५ कोटीमधील ५० लाख अॅडव्हान्स बुकिंगमध्ये कमावले आहेत. आता हे चित्रपट किती कमाई करणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

दरम्यान, विवेक अग्नीहोत्रीचा 'द काश्मीर फाइल्स' चांगलाच गाजला होता. संपूर्ण देशात हा चित्रपट पाहिला गेला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bank Job: SBI मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! 12,000 जागांसाठी होणार मेगाभरती, 250 नव्या शाखा सुरू करण्याचा बँकेचा प्लॅन

Congress Dalit Tribal Support: दलित-आदिवासींची साथ मिळवणे काँग्रेससाठी सोपे नाही! राहुल गांधींसमोर मोठे राजकीय आव्हान

Goa Assembly Session: गोवा विधानसभेचा 'खेळखंडोबा'! सत्ताधारी-विरोधकांच्या राजकारणात राज्याच्या भवितव्याचा विसर

Dabolim Dubai Flight: दाबोळी-दुबई विमानसेवा पुन्हा सुरू होणार, दररोज एक उड्डाण; मुंबई-गोवा मार्गावरही दिवसाला 8 फेऱ्या

Goa Tourist Death: आठ महिन्यांत गोव्यात 56 पर्यटकांचा मृत्यू! 4 पर्यटकांचे खून; 14 जणांचा बुडून मृत्यू, तर 10 जणांची आत्महत्या

SCROLL FOR NEXT