Fukrey 3  Dainik Gomantak
मनोरंजन

Box Office Collection: 'फुकरे 3' चा बॉक्स ऑफीसवर धुमाकूळ

Fukrey 3 Box Office Collection: दरम्यान, शाहरुख खानच्या 'जवान'ने मंगळवारी 2.50 कोटींची कमाई केली आहे.

दैनिक गोमन्तक

Fukrey 3 Box Office Collection: पंकज त्रिपाठी, पुलकित सम्राट, वरुण शर्मा आणि मनजोत सिंग यांचा चित्रपट 'फुकरे 3' पहिल्या दिवसापासून बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे.

पहिल्या सोमवारीही या चित्रपटाने चांगली कमाई केली होती. आता या चित्रपटाने बॉक्स ऑफीसवर किती कमाई केली आहे, ते जाणून घेऊयात.

आठवड्याच्या सुरुवातीला पहिल्या मंगळवारी चित्रपटाने सुमारे 4.75 कोटींची कमाई केली आहे. 'फुकरे 3' ने 6 दिवसात जवळपास 60 कोटींचा आकडा गाठला आहे.

सुरुवातीच्या अंदाजानुसार, चित्रपटाने 59.92 कोटींची कमाई केली आहे. दरम्यान, शाहरुख खान( Shahrukh Khan )च्या 'जवान'ने मंगळवारी 2.50 कोटींची कमाई केली आहे.

'फुकरे 3'ने केला 6 दिवसात 70 कोटींचा टप्पा पार

जगभरातील कमाईबद्दल बोलायचे झाले तर 'फुक्रे 3' ने आत्तापर्यंत 70 कोटींचा आकडा पार केला आहे. या चित्रपटाने 5 दिवसांत 69.10 कोटींची कमाई केली होती.

5 दिवसांत भारतातील एकूण संकलन 65.10 कोटी रुपये होते. हा चित्रपट लवकरच 100 कोटींचा टप्पा गाठेल अशी अपेक्षा आहे.

'फुकरे 3' हा 2013 मध्ये आलेल्या कॉमेडी ड्रामा फिल्म 'फुक्रे'चा सिक्वेल आहे ज्यामध्ये वरुण शर्मा, पुलकित सम्राट, मनजोत सिंग आणि पंकज त्रिपाठी यांच्याशिवाय रिचा चड्ढा देखील भोली पंजाबनच्या भूमिकेत आहे.

वरुण शर्मा चित्रपटात चुचाच्या भूमिकेत सर्वांची मने जिंकत असल्याचं दिसून येत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bank Job: SBI मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! 12,000 जागांसाठी होणार मेगाभरती, 250 नव्या शाखा सुरू करण्याचा बँकेचा प्लॅन

Congress Dalit Tribal Support: दलित-आदिवासींची साथ मिळवणे काँग्रेससाठी सोपे नाही! राहुल गांधींसमोर मोठे राजकीय आव्हान

Goa Assembly Session: गोवा विधानसभेचा 'खेळखंडोबा'! सत्ताधारी-विरोधकांच्या राजकारणात राज्याच्या भवितव्याचा विसर

Dabolim Dubai Flight: दाबोळी-दुबई विमानसेवा पुन्हा सुरू होणार, दररोज एक उड्डाण; मुंबई-गोवा मार्गावरही दिवसाला 8 फेऱ्या

Goa Tourist Death: आठ महिन्यांत गोव्यात 56 पर्यटकांचा मृत्यू! 4 पर्यटकांचे खून; 14 जणांचा बुडून मृत्यू, तर 10 जणांची आत्महत्या

SCROLL FOR NEXT