Indipendance Day 2023 : संपूर्ण भारतीयांसाठी अभिमानास्पद आणि गौरवाचा दिवस म्हणजे स्वातंत्र्यदिन. या दिवशी प्रत्येक भारतीय देशाच्या लष्करी ताकदीविषयी आणि गौरवशाली लोकशाही परंपरेविषयी अभिमानाने भारावून जातो.
15 ऑगस्ट रोजी संपूर्ण देश स्वातंत्र्यदिन साजरा करणार आहे. देशवासीयांच्या नसांमध्ये उत्साह दिसून येईल. सर्वत्र देशभक्तीपर गाणी वाजतील देशासाठी आपल्या प्राणांच बलिदान दिलेल्या क्रांतिकारकांचं स्मरण केलं जाईल.
सुट्टीच्या या दिवशी तिरंगा फडकवल्यानंतर तुम्हाला पडद्यावरही काही पाहायचे असेल, जेणेकरून सैनिकांच्या शौर्याला आणि धैर्याला पुन्हा एकदा सलाम करता येईल, तर ही बातमी फक्त तुमच्यासाठी आहे.
आम्ही तुम्हाला देशभक्तीने परिपूर्ण अशा चित्रपटांची यादी देत आहोत. जे पाहून तुमचे डोळे ओले होतीलच पण तुमच्या भारतीय असण्याचा अभिमानही वाटेल. तुमच्या अंगावर शहारे येतील आणि नकळत तुम्ही भारत माता की जय म्हणाल. हे चित्रपट तुम्ही Netflix पासून Amazon Prime Video या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहू शकता.
बॉक्स ऑफिसवर कितीही सिनेमे आले तरी 'बॉर्डर' हा असा सिनेमा आहे की, अगदी जुन्या पिढीपासुन नव्या पिढीपर्यंतच्या लोकांना आजही प्रेरणा देतो . तो 26 वर्षांपूर्वी रिलीज झाला होता. जेपी दत्ता यांनी हे लेखन, दिग्दर्शन आणि निर्मिती केली होती.
ही कथा 1971 च्या भारत-पाकिस्तान युद्धावर आधारित होती. यात सनी देओल, जॅकी श्रॉफ, सुनील शेट्टी, अक्षय खन्ना, पुनीत इस्सार, तब्बू, राखी, पूजा भट्ट यांच्यासह अनेक स्टार्स होते.
2021 साली OTT वर रिलीज झालेला हा बायोग्राफिकल वॉर चित्रपट कारगिल युद्धात शहीद झालेल्या विक्रम बत्रा यांच्या जीवनावर आधारित आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन विष्णुवर्धन यांनी केले होते. यात कियारा अडवाणी, सिद्धार्थ मल्होत्रा यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका होत्या.
हा चित्रपट 2019 मध्ये प्रदर्शित झाला होता. आदित्य धर यांनी याचे दिग्दर्शन केले होते. चित्रपटाची कथा 2016 मध्ये उरी येथे झालेल्या हल्ल्यावर आधारित आहे. चित्रपट पाहिल्यानंतर तुमची छाती अभिमानाने फुलून येईल. यामध्ये विकी कौशलने मेजर विहान शेरगिलची भूमिका साकारली होती.
हा चित्रपट 2003 मध्ये प्रदर्शित झाला होता.LOC: कारगिल हा चित्रपट भारत आणि पाकिस्तानमध्ये झालेल्या कारगिल युद्धावर आधारित आहे. याचे दिग्दर्शन जेपी दत्ता यांनी केले होते. यात संजय दत्त, अजय देवगण, नागार्जुन, सैफ अली खान, सुनील शेट्टी, अभिषेक बच्चन आणि अक्षय खन्ना यांच्यासह अनेक स्टार्स होते.
आलिया भट्ट आणि विकी कौशल स्टारर 'राझी' हा मेघना गुलजार दिग्दर्शित स्पाय थ्रिलर चित्रपट आहे. यात जयदीप अहलावत, रजित कपूर, शिशिर शर्मा सहाय्यक भूमिकेत आहेत. हा चित्रपट हरिंदर सिक्का यांच्या 'कॉलिंग सेहमत' या कादंबरीवर आधारित आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.