Ganesh Chaturthi 2023 Dainik Gomantak
मनोरंजन

Ganesh Chaturthi 2023 : अंंबानींच्या घरी गणेश दर्शनाला स्टार्सची लगबग... जवानच्या कलाकारांचा इथेही जलवा

सध्या गणेशोत्सवाची लगबग सर्वत्र सुरू आहे. सामान्य नागरिकांपासून ते अभिनेते- उद्योगपतींच्या घरात बाप्पाचं आगमन झालं आहे..उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरीही गणपती बाप्पा विराजमान झाले आहेत.

Rahul sadolikar

सध्या सर्वत्र गणेशोत्सवाचं उत्साही वातावरण आहे. सामान्य नागरीकांपासून ते अभिनेते, उद्योगपती बाप्पाच्या भक्तीत विलीन झालेले दिसतात. देशभरात 19 सप्टेंबरपासुन गणेशोत्सव सुरू झाला आहे.

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मुंंबईच्या निवासस्थानीही गणेशाची प्रतिष्ठापणा झाली आहे. अंबानींच्या घरातल्या बाप्पाचं दर्शन घ्यायला बॉलीवूडच्या अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली. यात जवानच्या कलाकारांनी सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं.

अँटिलियामध्ये दिसले हे कलाकार

मुकेश अंबानी यांनी मुंबईच्या निवासस्थानी अँटिलियामध्ये गणेश चतुर्थीच्या पूजेचे आयोजन केले होते. या पूजेसाठी अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. अनेक स्टार्स यावेळी पारंपारिक पोषाखात दिसले होते. या पुजेसाठी रेखा, जूही चावला, रणवीर सिंग-दीपिका पदुकोण, राजकुमार राव हे कलाकार उपस्थित होते.

या शिवाय या पूजेसाठी शाहिद कपूर, वरुण धवन, जान्हवी कपूर, रश्मिका मंदान्ना, करण जोहर. विकी कौशल, सनी कौशल, खुशी कपूर, बोनी कपूर, रितेश देशमुख, जेनेलिया डिसूझा, एकता कपूर, जितेंद्र, श्रद्धा कपूर, सुनील शेट्टी असे अनेक कलाकार दिसले. 

Shahrukh Khan's Family

गौरी खानची आईही सोबत होती

अनेक स्टार्स- सुपरस्टार्स जरी या पूजेसाठी उपस्थित असले तरीही 'जवान'चित्रपटाचे स्टार्स या पूजेत आकर्षणाचे केंद्रबिंदू बनले होते. या गणेश पूजा सोहळ्यात 'जवान'चा लीड हिरो शाहरुख खान पत्नी गौरी खानसोबत दिसला. शाहरुख खानचे संपूर्ण कुटुंब पूजेसाठी आले होते. यावेळी मुलगी सुहाना आणि मुलगा अबराम यांच्याशिवाय गौरी खानची आईही तिच्यासोबत दिसली.

Atlee Kumar

शाहरुखसोबत आर्यन खान नव्हता

'जवान' चित्रपटात शाहरुख खानसोबत दिसणारी अभिनेत्री नयनतारा पती विघ्नेश शिवनसोबत पोहोचली होती. शाहरुख खान येताच लोकांनी त्याला चारही बाजूंनी घेरले. मात्र, गणेश चतुर्थीच्या या फोटोंमध्ये शाहरुख खानचा मोठा मुलगा आर्यन मात्र उपस्थित नव्हता.

जवानचे कलाकार

"जवान' चित्रपटात शाहरुख खानच्या पत्नीच्या भूमिकेने लोकांची मने जिंकणारी दीपिका पदुकोणही येथे दिसली. दीपिका पती रणवीर सिंगसोबत दिसली. यावेळी तिने रणवीर सिंगसोबत कॅमेऱ्यासमोर बरीच पोज दिली.

मात्र, ज्यांच्यावर सर्वांच्या नजरा खिळल्या होत्या, तो म्हणजे 'जवान' चित्रपटाचा दिग्दर्शक ऍटली. दिग्दर्शक अॅटलीची पत्नी कृष्णा प्रियाने 'जवान'च्या संपूर्ण स्टारकास्टमध्ये सर्वांच्य नजरा स्वत:कडे वळवल्या. या फोटोंमध्ये रणवीरसमोर दीपिकाच उंच दिसत होती.

Goa Politics: 'माझे घर'ला 'खो' घालण्याचा यत्न, विरोधी आमदारांना धडा शिकवा; CM प्रमोद सावंतांचे जनतेला आवाहन

Bihar Elections: "मंचावर येऊन नाचायला सांगा ते नाचतील..." विरोधी पक्ष नेते राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींना टोला

Goa Firing Case: जैतीर-उगवेत रेती उपसा करणाऱ्या कामगारांवर गोळीबार, स्थानिक बंदूकधारकांची पोलिसांकडून चाैकशी, 50 मजुरांची झडती

Goa Rain: ऐन ऑक्टोबरमध्ये राज्य 'ओलेचिंब'! महिन्यात आतापर्यंत 11.82 इंच नोंद; अनेक ठिकाणी पडझड, रस्त्यांवर पाणी

Danish Chikna Arrested: 'चिकना'चा खेळ संपला! अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या खास माणसाला गोव्यातून उचललं, पत्नीलाही ताब्यात घेतलं

SCROLL FOR NEXT