Samantha Ruth Prabhu
Samantha Ruth PrabhuDainik Gomantak

Samantha : तुझी त्वचा इतकी कशी चमकतेय? समंथाने सांगितले उपचारामुळे तिच्या चेहऱ्यावर...

अभिनेत्री समंथा रुथ प्रभू सध्या उपचारासाठी अमेरिकेत आहे, एका आजारावरच्या उपचारासाठी समंथा काही दिवस परदेशात असणार आहे.

अभिनेत्री समंथा रुथ प्रभूने उपचारासाठी इंडस्ट्रीपासून दिड वर्षांसाठी दूर राहण्याची घोषणा केली होती. तिच्या चाहत्यांना ती नवे चित्रपट घेऊन येणार नाही यासोबतच तिच्या तब्येतीची विशेष काळजी वाटतेय.

कित्येक चाहत्यांनी तिला सोशल मिडीयावर आजारातून लवकर बरे होण्याच्या शुभेच्छाही दिल्या. सध्या समंथा एका इन्स्टाग्राम पोस्टमुळे सोशल मिडीयावर चर्चेत आहे.

समंथाची त्वचा चमकत होती.

समंथाने (Samantha Ruth Prabhu) नुकत्याच शेअर केलेल्या एका पोस्टमध्ये तिची चमकती त्वचा पाहुन चाहत्यांना कमालीचं आश्चर्य वाटलं. जेव्हा एका चाहत्याने तिला तिच्या 'क्लीअर स्किन'चे रहस्य विचारले तेव्हा सगळ्यांनाच धक्का बसला. 

तिने सांगितले की मायोसिटिसच्या (Myositis disease) उपचाराचा भाग म्हणून तिने घेतलेल्या स्टिरॉइड शॉट्समुळे तिच्या त्वचेला त्रास होत असल्याने ती फिल्टर वापरत आहे. समंथाने 19 सप्टेंबरला संध्याकाळी इंस्टाग्रामवर तिच्या चाहत्यांशी संवाद साधला आणि रेस्टॉरंटमध्ये बसून त्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली.

उपचारामुळे त्वचा तशी झाली

एका चाहत्याने समंथाला विचारले, 'तुझी त्वचा इतकी क्लिन कशी आहे?' चाहत्याला प्रत्युत्तर देताना ती म्हणाली, “खरं तर तशी ती अजिबात नाही. चिन्मयी श्रीपाद माझी त्वचा नीट करणार आहे, तिने वचन दिले आहे. ती माझी त्वचा चकचकीत करणार आहे.

समंथा पुढे म्हणाली वास्तविक या समस्येमुळे, मला खूप स्टिरॉइड्स वापरावे लागले, मला खरोखरच बरेच स्टिरॉइड शॉट्स करावे लागले त्यामुळे माझ्या त्वचेवर त्याचा परिणाम झाला माझी चमकती त्वचा नाही, हे एक फिल्टर आहे मित्रांनो.

चाहत्याचा प्रश्न आणि समंथाचे उत्तर

समंथाला देखील एक प्रश्न आला ज्यामध्ये असे लिहिले: 'तुम्ही जगता त्यातल्या सगळ्याच प्राधान्याच्या 3 गोष्टी कोणत्या आहेत? आयुष्यातलं वास्तव समजण्यासाठी तुम्ही स्वतःला सांगत असलेल्या गोष्टी.' या प्रश्नाचं उत्तर देताना समंथा म्हणाली.

"मी खूप धीर, खंबीर झाले आहे आणि माझी इच्छाशक्ती अनंतापर्यंत पोहोचली आहे." प्रश्नाचे उत्तर समंथाने तिच्या इन्स्टा स्टोरीद्वारे दिले, “1. मी मात करीन 2. गोष्टींवर प्रश्न विचारणे थांबवा.... 3. प्रामाणिकपणे आणि सत्याने पुढे जा.”

Samantha Ruth Prabhu
Samantha Ruth Prabhu Dainik Gomantak

समंथाने दिला किशोरवयीन मुलांना सल्ला

'तरुण आणि किशोरवयीन मुलांना जीवनात चुकीचे निर्णय घेण्याबाबत' सल्ला देण्यास सांगितल्यावर समंथाने उत्तर दिले. ती म्हणाली की त्यांनी असे समजू नये की त्यांचे आयुष्य संपले आहे. खरंतर ही त्यांच्या आयुष्यातील सर्वोत्तम वेळ आहे. 

तिचे स्वतःचे उदाहरण देताना ती म्हणाली, आयुष्य इतक्या लवकर संपू शकत नाही कारण त्यांना भविष्यात अनेक समस्या आणि अडचणी आहेत. 

ती म्हणाली की वयाच्या 25 व्या वर्षी ती कल्पनाही करू शकत नव्हती की ती इतकी मजबूत होईल आणि तिच्या आयुष्यात तिला सामोरे गेलेल्या अनेक समस्यांना सामोरे जाण्यास सक्षम होईल.

Samantha Ruth Prabhu
Vijay Antony's Daughter : साऊथच्या प्रसिद्ध अभिनेत्याच्या 16 वर्षाच्या मुलीची आत्महत्या...

समंंथा सुट्टीवर

समंथा सध्या मायोसिटिस आजारावरच्या उपचारासाठी आणि एका मोठ्या विश्रांतीसाठी परदेशात आहे. सध्या समंथावर उपचार सुरू आहेत. 

तिने चाहत्यांच्या संवादादरम्यान सांगितले की ती बरी होत आहे आणि खूप बरे वाटत आहे, आणि ती पुढे वेब शो, Citadel's Indian version मध्ये दिसणार आहे.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com