Cannes Festival 2022 Dainik Gomantak
मनोरंजन

Cannes Festival 2022: कान्स चित्रपट महोत्सवात सत्यजित रे यांच्या 'प्रतिद्वंदी' चे होणार विशेष स्क्रीनिंग

Cannes festival 2022 : भारत यंदाच्या कान्स चित्रपट महोत्सवात सहभागी होणार आहे.

दैनिक गोमन्तक

भारत यंदाच्या कान्स चित्रपट महोत्सवात (Cannes festival) सहभागी होणार आहे. यंदा 17 मे ते 28 मे या कालावधीत हा महोत्सव पार पडणार आहे. या चित्रपट महोत्सवात बॉलीवुडची मस्तानी 'दीपिका पदुकोण' (Deepika Padukone) ज्युरी म्हणून दिसणार आहे. तर सत्यजित रे यांचा 'प्रतिद्वंदी' हा चित्रपट कान्स चित्रपट महोत्सवात दाखवला जाणार आहे. (Cannes Festival 2022 updates)

कान्स (Cannes Festival) चित्रपट महोत्सवात 'ऑल दॅट ब्रीथ्स' या सिनेमाचे स्क्रीनिंग होणार आहे. तसेच 'सत्यजित रे' यांचा 'प्रतिद्वंदी' हा चित्रपट देखील या महोत्सवात दाखवला जाणार आहे. सत्यजित रे यांचा हा चित्रपट बंगाली लेखक सुनील गंगोपाध्याय यांच्या कथेवर आधारित आहे. या सिनेमाने 1971 साली सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनासह तीन राष्ट्रीय पुरस्कार पटकावले आहेत. ज्येष्ठ अभिनेते धृतिमान चॅटर्जी यांचा हा पहिलाच चित्रपट आहे.

फ्रान्समधील प्रसिद्ध अभिनेता विंसेट लिंडन यांना फिल्म फेस्टिव्हलच्या ज्युरींचे अध्यक्ष पद देण्यात आले आहे. यंदाचा फिल्म फेस्टिव्हल खूप खासअसणार आहे. भारताच्या 'ऑल दॅट ब्रीथ्स' (All That Breathes) या माहितीपटाचे विशेष स्क्रीनिंग होणार आहे. या माहितीपटाचे दिग्दर्शन शौनक सेन यांनी केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT