Bollywood Movies on Kargil War: Dainik Gomantak
मनोरंजन

Bollywood Movies on Kargil War: कारगिलची गोष्ट सांगणारे हे चित्रपट पाहिलेत का?

कारगिल युद्धात प्राणांची आहुती देणाऱ्या सैनिकांच्या स्मरनार्थ बॉलिवुडमध्ये देखील अनेक चित्रपट बनवले आहेत. ही चित्रपट कोणती आहेत हे जाणून गेऊया.

Puja Bonkile

Bollywood Movies on Kargil War: आजचा दिवस हा प्रत्येक भारतीयांसाठी महत्वाचा आहे. आजच्याच दिवशी म्हणजेच 26 जुलै 1999 ला भारतीय जवानांनी आपले प्राण गमावून करागिल युद्धात पाकिस्तानचा पराभव केला होता.

या युद्धात 500 हून अधिक भारतीय जवानांनी देशासाठी बलिदान दिले होते. कारगिल युद्धात प्राणांची आहुती देणाऱ्या सैनिकांच्या स्मरनार्थ बॉलिवुडमध्ये देखील अनेक चित्रपट बनवले आहेत.

  • गुंजन सक्सेना

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री जान्हवी कपूर आणि अभिनेता पंकज त्रिपाठी स्टारर ‘गुंजन सक्सेना’ हा चित्रपट कारगिल युद्धावर आधारित आहे. या चित्रपटामध्ये जान्हवीने भारतीय हवाई दलातील अधिकारी आणि कारगिल युद्धामध्ये मोलाचे योगदान देणाऱ्या हेलिकॉप्टर पायलट गुंजन सक्सेना यांची भूमिका साकारली आहे. हा चित्रपट तुम्ही नेटफ्लिक्सवर पाहू शकता.

  • LOC कारगिल

कारगिल युद्धाची गोष्ट सांगणाऱ्या चित्रपटांच्या यादीमध्ये ‘एलओसी कारगिल’ या चित्रपटाचा देखील समवेश आहे. हा चित्रपट 2003 मध्ये रिलीज झाला होता. या चित्रपटामध्ये अजय देवगण, संजय दत्त, अभिषेक बच्चन, सैफ अली खान, सुनील शेट्टी हे कलाकार आहेत.

  • शेरशाह

2021 मध्ये कारगिल युद्धात शहीद झालेल्या जवानांमध्ये कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या आयुष्यावर आधारित ‘शेरशाह’ नावाचा एक चित्रपट बनवण्यात आला होता. जो लोकांना खूप आवडला होता. या चित्रपटात अभिनेत्री सिद्धार्थ मल्होत्राने कॅप्टन विक्रम बत्राची भूमिका साकारली होती. या चित्रपटात त्याच्यासोबत अभिनेत्री कियारा अडवाणीने देखील मुख्य भुमिका साकारली होती. हा चित्रपट प्राईम व्हिडीओवर पाहता येणार आहे.

  • धूप

‘धूप’ हा चित्रपटसुद्धा कारगिल युद्धावर आधारित आहे. हा चित्रपट देखील 2003 मध्ये रिलीज होता. या चित्रपटाची गोष्ट 7 जुलै 1999 रोजी शहीद झालेल्या कॅप्टन अनुज नय्यर आणि त्यांच्या कुटुंबावर आधारित होता.

  • लक्ष्य

फरहान अख्तर दिग्दर्शित 'लक्ष्य' हा एक गाजलेला चित्रपट म्हणता येईल. या चित्रपटात हृतिक रोशन, प्रीती झिंटा, अमिताभ बच्चन, बोमन इराणी आणि ओम पुरी यांच्या मुख्य भूमिका आहेत. यामध्ये कारगिल युद्धाचे काही दृश्य पाहायला मिळणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ganesh Chaturthi: 'या' वेळेत करा गणरायाची प्रतिष्ठापना! सुख, समृद्धी, ऐश्वर्याने भरेल घर; जाणून घ्या कारण

Arunachal Pradesh Landslide: कारवर कोसळले भलेमोठे दगड, प्रवासी थोडक्यात बचावले; अरुणाचल प्रदेशातील भूस्खलनाचा धडकी भरवणारा व्हिडिओ

Chess World Cup Goa: दिल्ली नाही 'गोवा'! FIDE चेस विश्वचषक 2025 ची घोषणा; जाणून घ्या वेळापत्रक

Dead Whale Fish: तळपण समुद्रकिनाऱ्यावर आढळला 30 फूट लांब कुजलेल्या अवस्थेतील व्हेल मासा

India America Relations: ट्रम्प यांनी 4 वेळा फोन केला, पण मोदींनी घेतला नाही? जर्मन मासिकाचा मोठा दावा

SCROLL FOR NEXT