Elon Musk Neuralink Brain Chip  Google Image
मनोरंजन

Neuralink Brain Chip Implant: मानवी मेंदूत चीप बसवण्याच्या प्रयोगावर कंगनाची अफलातून पोस्ट; नेटकरी म्हणाले-'तू यासाठी योग्य...'

Neuralink Brain Chip Implant: या प्रयोगाची तुलना सतीयुगाबरोबर केली आहे.

दैनिक गोमन्तक

Neuralink Brain Chip Implant: बॉलीवूड अभिनेत्री कंगना रणौत आपल्या अभिनयापेक्षा आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे अनेकदा चर्चेत असते. आता तिने इलॉन मस्क यांच्या न्यूरालिंक कॉर्प यांच्या मानवी मेंदूत चिप बसवल्याच्या घोषणेनंतर मोठे वक्तव्य केले आहे. अभिनेत्रीने इलॉन मस्क यांच्या पोस्टला उत्तर देताना त्यांचे कौतुक केले आणि या प्रयोगाची तुलना सतीयुगाबरोबर केली आहे. सतीयुगात हे तंत्रज्ञान आपल्या ऋषींकडे आधीच होते अशा आशयाची सोशल मिडीयावर पोस्ट शेअर केली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, इलॉन मस्क यांनी सोशल मिडिया हँडल एक्स ( ट्विटर ) वर न्यूरालिंक कॉर्प या कंपनीकडून माणसाच्या मेंदूत चीप बसवण्याच्या महत्वाकांक्षी प्रोजेक्टबद्दल पोस्ट शेअर केली होती. ही चीप मेंदूमध्ये बसवल्यानंतर माणूस आपल्या मेंदूद्वारेच कॉम्पुटर किंवा मोबाईल चालवू शकणार असल्याचं म्हटले आहे. हा प्रयोग यशस्वी झाला तर त्याचा फायदा ज्यांनी आपले अवयव गमावले आहेत, जे अपंगत्वाचा सामना करत आहेत त्यांना या तंत्रज्ञानाचा फायदा होणार आहे.

कंगना आपल्या पोस्टमध्ये म्हणते- "सतयुग मुख्यत्वे या तंत्रज्ञानामुळे म्हणजेच न बोलता संवाद साधण्याच्या क्षमतेमुळे लक्षात राहतो. देव, ऋषी आणि इतर अनेक प्राणी आपल्या ग्रंथांमध्ये ज्या तंत्रांचा वापर करतात ते आपण आपल्या आयुष्यात पाहिले तर कल्पना करणे अशक्य नाही. नास्तिकांसाठी सर्वात मोठे आव्हान म्हणजे त्यांनी जे पाहिले किंवा ऐकले नाही ते समजून घेणे, कारण ते आपल्या धर्मग्रंथात लिहिलेल्या प्रत्येक गोष्टीला खोटे मानतात."

Kangana Ranaut

कंगनाच्या या पोस्टनंतर नेटकऱ्यांनी मजेशीर कंमेट केल्या आहेत. एका युजरने म्हटले आहे की, आज इलॉन मस्कला शांत झोप लागू दे. दुसऱ्या एका युजरने म्हटले आहे की, तू या प्रयोगासाठी उत्तम आहेस कमीत कमी तुझ्या मेंदूत ही चीप बसवल्यानंतर तू काहीतरी योग्य आणि विचार करुन बोलशील.

दरम्यान, मानवी मेंदूत चीप बसवण्याचा प्रयोग ऐतिहासिक आणि महत्वपूर्ण मानला जात आहे. कारण यामुळे ज्यांना हात किंवा पायाचे अपंगत्व आहे किंवा ज्यांनी आपले हात-पाय गमावले आहे त्यांच्यासाठी हे वरदान ठरणार असल्याचे म्हटले जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs AUS: शिखर धवन-युसूफ पठाणची वादळी खेळी निष्फळ, कांगारूंनी भारताचा 4 गडी राखून केला पराभव

Usgaon Bridge: उसगावात 62 वर्षे जुनाट पूल दुरावस्थेत; स्थानिकांची दुरुस्तीची मागणी

Valpoi: बाप रे... गायीच्या पोटात प्लास्टिकचा ढीग! शस्त्रक्रिया करून तब्बल 26 किलो प्लास्टिक काढलं

Viral News: प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत सापडली पत्नी, बेदम मार खाल्यानंतर नग्नच पळाला लव्हर Watch Video

Pusapati Ashok Gajapathi Raju: पुसापती अशोक गजपती राजूंनी गोव्याचे राज्यपाल म्हणून स्वीकारली सूत्रे; आंध्रवासीयांच्या आनंदाला भरते

SCROLL FOR NEXT