Tiger Shroff-Disha Patani Breakup Dainik Gomantak
मनोरंजन

Tiger Shroff-Disha Patani Breakup; 'टायगर दिशा'हीन; ब्रेकअपचं कारण काय ?

सहा वर्षानंतर वेगळे होणार असल्याची बॉलिवूडमध्ये चर्चा

दैनिक गोमन्तक

टायगर श्रॉफ-दिशा पटानी ब्रेकअप : दिशा पटानी आणि टायगर श्रॉफ या जोडीबद्दल एक मोठी बातमी समोर आली आहे. ही बॉलिवूडमधील चर्चेत असलेली जोडी आहे. मात्र 6 वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर ते वेगळे झाल्याचे बोलले जात आहे. म्हणजेच दिशा आणि टायगर हे जोडपे म्हणून एकत्र नाहीत.

टायगर-दिशा जोडी एकत्र नाही दिसणार

टायगर श्रॉफ आणि दिशा पटानी या जोडीला चाहते अनेकदा एकत्र पाहत होते. पण आता दिशा आणि टायगर जोडी म्हणून एकत्र दिसणार नाहीत. एका प्रसिद्ध वृत्तपत्राने दिलेल्या रिपोर्टनुसार टायगर आणि दिशा यांच्या नात्यात गेल्या एक वर्षापासून बरेच चढ-उतार आले होते. पण या जोडप्याने ही गोष्ट कधीच कळू दिली नाही.

वेगळे होण्याचा निर्णय का घेतला ?

दिशा आणि टायगरने वेगळे होण्याचा निर्णय का घेतला याचे खरे कारण समोर आलेले नाही. पण हे दोन्ही स्टार्स आता सिंगल लाईफ जगत आहेत हे नक्की. प्रसिद्ध वृत्तपत्राने संवाद साधताना टायगरच्या एका मित्राने दोघांच्या ब्रेकअपची बातमी खरी असल्याचे सांगितले आहे. टायगरच्या मित्राचे म्हणणे आहे की, ब्रेकअपमुळे टायगरला त्याच्या कामात काही फरक पडू दिला नाही. तो पूर्वीप्रमाणेच आपल्या कामावर लक्ष केंद्रित करताना दिसतो. टायगर सध्या लंडनमध्ये त्याच्या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.

या सिनेमांमध्ये दिसणार आहे

दिशा पटानी आणि टायगर श्रॉफच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर दिशा पटानी 'एक व्हिलन रिटर्न्स'मध्ये दिसणार आहे. त्याचवेळी टायगर श्रॉफ 'गणपत' आणि 'बागी-4'मध्ये आपली ताकद दाखवताना दिसणार आहे. दिशा आणि टायगर आता जोडप्यासारखे एकत्र नसले तरी त्यांची मैत्री अजूनही कायम आहे. आता बघूया ब्रेकअपच्या बातमीवर दिशा आणि टायगर काही बोलतात का?

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mumbai Goa Highway: वडखळ नाक्याच्या दुरावस्थेविरोधात शेकापचं आंदोलन, मुंबई - गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी

हाडं, अंडी, मेणबत्ती लावून शाळेच्या मैदानात ब्लॅक मॅजिक? हळदोणात रात्री बारा वाजता तरुणीला घेतलं ताब्यात

Verca Fire News: '..पतीनेच पेटवली दुचाकी'! वार्कातील आग प्रकरणावरून पत्नीची तक्रार; कौटुंबिक वादातून घटना घडल्याची माहिती

Buimpal: भरवस्तीत चिमुकल्याच्या अपहरणाचा प्रयत्न, हाताचा चावा घेऊन 12 वर्षीय मुलाची सुटका; पोलिसांचा तपास सुरु

Goa Agriculture Ambassador: स्वयंपूर्णतेचा संदेश देणारा वरद ‘कृषिदूत’! गोवा सरकारकडून ॲम्बेसिडर म्हणून निवड; भाजी उत्पादनात प्रगतीचा ध्यास

SCROLL FOR NEXT