Siddhant Chaturvedi-Navya Naveli Nanda Goa vacation Instagram
मनोरंजन

Siddhant-Navya Goa vacation: गोव्यातून व्हेकेशनवरून परतलेल्या 'या' कपलची बी टाऊनमध्ये चर्चा...

गली बॉयचा अभिनेता आणि बिग बींची नात मुंबई विमानतळावर दिसले एकत्र

गोमंतक ऑनलाईन टीम

Siddhant Chaturvedi-Navya Naveli Nanda Relationship: अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदा आणि अभिनेता सिद्धांत चतुर्वेदी एकमेकांना डेट करत असल्याच्या बातम्या गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. आता दोघांनीही आपलं नातं अधिकृत केल्याचे दिसत आहे. रविवारी दोघे मुंबई विमानतळावर एकत्र दिसले.

दोघेही गोव्याहून व्हेकेशनवरून परतल्याची चर्चा आहे. नव्या आणि सिद्धांत दोघेही मुंबई विमानतळावर एकत्र दिसून आले. विमानतळावर एकत्र दिसण्याची त्यांची ही पहिलीच वेळ नाही. या वेळी दोघेही व्हाइट कॅज्युअल आऊटफिटमध्ये दिसले.

दोघेही गेल्या काही दिवसांपासून गोव्यात व्हेकेशनवर होते, अशी चर्चा आहे. दोघांनी एकत्रितपणे गोव्यात सुट्टी साजरी केली आहे. या दोघांविषयी आधीपासून चर्चा होत होती. त्यात आता दोघे एकत्र व्हेकेशनवर गोव्यात येऊन गेल्यामुळे दोघांच्या रिलेशनशिपवर शिक्कामोर्तब झाल्याचे मानले जात आहे.

गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये नव्या आणि सिद्धांत पहिल्यांदाच सार्वजनिकरित्या एकत्र दिसले होते. डिसेंबर २०२२ मध्ये चित्रपट निर्माता अमृतपाल सिंग बिंद्रा यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत ते एकत्र दिसले होते. दोघेही कारमधून एकत्र गेले.

गेल्या वर्षी एका मुलाखतीत सिद्धांतला नव्यासोबतच्या नात्याबद्दल विचारण्यात आले होते. त्याला दोघांच्या नात्याबद्दलच्या अफवा खऱ्या आहेत का? असे विचारण्यात आले होते. प्रत्युत्तरात सिद्धांत म्हणाला होता, काश ये सच होता...

सिद्धांतच्या उत्तरावरून त्याला नव्याला डेट करायचे असल्याचे स्पष्ट झाले होते. यानंतर दोघेही मनीष मल्होत्राच्या दिवाळी पार्टीत आणि करण जोहरच्या वाढदिवसाच्या पार्टीत दिसले होते.

नव्या ही जया-अमिताभ बच्चन यांची मुलगी श्वेता बच्चन-नंदा यांची मुलगी आहे. वडील एस्कॉर्ट्स कंपनीचे मालक निखिल नंदासोबत हे नव्याचे वडील आहेत. नव्याने फोर्डहॅम युनिव्हर्सिटी, न्यूयॉर्कमधून डिजिटल तंत्रज्ञानात पदवी प्राप्त केली आहे.

ती प्रॉडक्शन, मार्केटिंग, यातील तज्ज्ञ आहे. तिला चित्रपटांमध्ये रस नाही. ती तिचा कौटुंबिक व्यवसाय सांभाळते. ती आरा हेल्थ या ऑनलाइन हेल्थकेअर प्लॅटफॉर्मचीही संस्थापक आहे. याशिवाय ती एक चॅट शो होस्ट करते.

सिद्धांतबद्दल सांगायचे तर, त्याने 2019 च्या सुपरहिट चित्रपट 'गली बॉय' मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर त्याने 'बंटी और बबली 2', 'फोन भूत' आणि 'गेहराईंयाँ' सारख्या चित्रपटात काम केले आहे. याशिवाय तो इनसाइड एज या वेब सीरिजमध्येही दिसला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

"तीन वर्षांत 9 विद्यार्थ्यांनी अभ्यासाच्या दडपणामुळे आयुष्य संपवलं, अभ्यासक्रमाचा फेरविचार करावा", आलेमाव यांची सरकारकडे मागणी

Sanju Samson: आशिया कप 2025 पूर्वी संजू सॅमसनची दमदार बॅटिंग, फक्त 'इतक्या' चेंडूत ठोकलं अर्धशतक

Online Betting Raid: गोवा पोलिसांचा डबल धमाका! ऑनलाइन सट्टेबाजी आणि दलालांवर एकाच वेळी कारवाईचा बडगा

Dewald Brevis: 22 वर्षीय बेबी एबीचं वादळ, ऑस्ट्रेलियाला धुतलं, विराट कोहली- बाबर आझमचा विक्रम उद्ध्वस्त

Goa Tourism: 'अन्यथा पर्यटन सेवा बंद करू!' म्हादईवरील रिव्हर राफ्टींग निधीसाठी पंचायत आक्रमक

SCROLL FOR NEXT