Shaktiman Movie : शक्तीमान आता मोठ्या पडद्यावर...200 कोटी बजेट असणार? मुकेश खन्ना म्हणाले...

90 च्या दशकात जन्मलेल्या पिढीचा सुपरहिरो शक्तीमान आता मोठ्या पडद्यावर येणार आहे.
Shaktiman Movie
Shaktiman MovieDainik Gomantak

90 च्या दशकातल्या बच्चे कंपनीच्या हृदयावर राज्य करणारा शक्तीमान हा टीव्ही शो अनेकांना आठवत असेल. या शोने त्यावेळच्या लहान मुलांवर गारुड घातलं होतं. शक्तीमान भारतातला पहिला सुपरहिरो होता. या शोबद्दलची एक मोठी अपडेट सध्या समोर आली आहे.

ज्येष्ठ अभिनेते मुकेश खन्ना यांनी त्यांच्या शक्तीमान या टीव्ही शोवर आधारित आगामी चित्रपटाबद्दल माहिती दिली आहे. त्यांनी टेलिव्हिजनवर अनेक वर्षे देसी सुपरहिरोची भूमिका केली. चित्रपटाची घोषणा होऊन काही काळ लोटला असून आता चित्रपटाला उशीर का झाला या प्रश्नालाही मुकेश खन्ना यांनी उत्तर दिले आहे

रणवीर सिंह बनणार शक्तीमान?

सोनी पिक्चर्सने गेल्या वर्षी या प्रोजेक्टची घोषणा केली होती. ही एक ट्रायोलॉजी असणार आहे जी 90 च्या दशकातल्या आयकॉनिक सुपरहिरोला परत आणेल. बेसिल जोसेफ दिग्दर्शित या चित्रपटात मुख्य भूमिकेसाठी अभिनेता रणवीर सिंगची निवड करण्यात आली आहे. पण , निर्मात्यांनी या वृत्ताला अधिकृत दुजोरा दिलेला नाही.

चित्रपटाची घोषणा

यादरम्यान मुकेश खन्ना यांनी त्यांच्या भीष्म यूट्यूब चॅनलवर हा चित्रपट आंतरराष्ट्रीय स्तरावर बनवला जाणार असल्याचे शेअर केले. ते म्हणाले, "करारावर स्वाक्षरी झाली आहे. ही खूप मोठ्या लेवलची फिल्म आहे.

एका चित्रपटासाठी २००-३०० कोटी रुपये खर्च येणार आहे आणि तो स्पायडर मॅन बनवणाऱ्या सोनी पिक्चर्सने बनवणार आहे. पण त्याला उशीर होत गेला, आधी (कोविड-१९) साथीचा रोग होता, मी माझ्या चॅनलवरही तो चित्रपट होत असल्याची घोषणा केली होती, पण तो शक्य होऊ शकले नाही.

मुकेश खन्ना शक्तीमानमध्ये नाहीत?

पुढे बोलताना मुकेश खन्ना म्हणाले या भूमिकेला मी पुन्हा जिवंत करणार आहे की आणखी कोणी शक्तीमान साकारणार आहे यावर भाष्य करण्याचे त्यांनी टाळले. "मी म्हणू शकतो की मी आता शक्तीमानच्या गेट-अपमध्ये दिसणार नाही.

मला थांबावे लागेल कारण मला कोणतीही तुलना नको आहे. पण चित्रपट येत आहे, लवकरच अंतिम घोषणा होईल, जिथे त्यात कोण असेल, कोण दिग्दर्शित करेल हे तुम्हाला कळेल. तो आंतरराष्ट्रीय स्तरावर बनवला जात आहे, जसा तो व्हायला हवा होता,".

शक्तीमानची सुरूवात...

शक्तीमान हे सप्टेंबर 1997 मध्ये दूरदर्शनवर प्रसारित होण्यास सुरुवात झाली. तो मार्च 2005 पर्यंत यशस्वीरित्या प्रसारित झाला. मुकेश खन्ना यांनीच या शोची निर्मिती केली आणि शक्तीमान आणि पंडित गंगाधर विद्याधर मायाधर ओंकारनाथ शास्त्रीजी या दोन्ही भूमिका केल्या. मुख्य भूमिकाही साकारली, आणि वृत्तपत्रासाठी छायाचित्रकार म्हणून काम केले. हा चॅनलवरील सर्वाधिक पाहिला जाणारा शो होता आणि आजही त्याचा चाहता वर्ग आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com