रणबीर कपूर आणि आलिया भट्ट Dainik Gomantak
मनोरंजन

रणबीर कपुर आलिया भट्टला चिडवतो 'या' मजेशीर नावाने

रणबीर कपुर आलिया भट्टला खूप गोड नावाने हाक मारतो.

दैनिक गोमन्तक

बॉलीवुड अभिनेत्री (Bollywood) आलिया भट्ट "गंगुबाई काठियावाडी" चित्रपट रिलीज झाल्यापासून नेहमीच सोशल मिडियावर (Social Media) चर्चेत असते. 'गंगुबाई काठियावाडी' चित्रपटाला भरपूर यश मिळाले आहे. यामुळे आलियाचे (Alia Bhatt) वडील महेश भट्ट देखील तिला मिळालेल्या यशामुळे आनदी आहेत. अलीकडेच महेश भट्ट (Mahesh Bhatt) देखील एका मुलाखती दरम्यान आलिया भट्ट बद्दल अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. महेश भट्ट यांनी मुलाखतीमध्ये सांगितले की आलियाला रणबीर (Ranbir Kapoor) कोणत्या टोपण नावाने चिडवतो.

चित्रपट निर्माते महेश भट्ट यांनी एका मुलाखतीमध्ये आलियाच्या चित्रपटाला मिळालेल्या यशाबद्दल कौतुक केले आहे. रणबीर आणि महेश भट्ट आलियाला (Alia Bhatt) एलियन म्हणतात. कारण आलिया नेहमी विचित्र वागते. ती जेव्हाही रणबीर कपूरकडे (Ranbir Kapoor) जाते तेव्हा त्याला असे वाटते की ती दुसऱ्या जगातून आली आहे. महेश भट्ट (Mahesh Bhatt) देखील म्हणतात की आलिया नेहमीच एक रहस्य राहील.महेश भट्ट पुढे म्हणाले, आलिया एक अनोखी पक्षी असून तिला डीफाईन करण्याचा प्रयत्न करू नका. आलियाचे आयुष्य गुढतेने भरलेले आहे.

रणबीर कपूरने एलियनबद्दल जे सांगितले ते आलिया भट्टनेही मान्य केले आहे. आलियाने सांगितले की हे थोडे विचित्र आहे पण रणबीर नेहमी तिला एलियन म्हणतो. आलिया म्हणाली, वडिलांच्या तोंडूनही तिने पहिल्यांदाच एकल आहे, ते तिला विचित्र म्हणाले पण मी त्याबद्दल जास्त विचार करत नाही. पुढे आलिया म्हणाली मला हे नाव गोंडस वाटते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT