bollywood r madhavan son vedaant won seven medals in swimming championship Instagram /@actormaddy
मनोरंजन

आर माधवनच्या मुलाने रोशन केले महाराष्ट्राचे नाव

बेंगरुळू येथे नुकत्याच झालेल्या ज्युनियर नॅशनल अॅक्वाटिक चॅम्पियनशिपमध्ये वेदांतने महाराष्ट्रासाठी सात पदके जिंकली आहेत.

दैनिक गोमन्तक

बॉलीवुड अभिनेता आर माधवनचा मुलगा वेदांत माधवन याने पुन्हा एकदा आपल्या वडिलांना अभिमान वाटावा अशी संधी दिली आहे. बेंगरुळू येथे नुकत्याच झालेल्या ज्युनियर नॅशनल अॅक्वाटिक चॅम्पियनशिपमध्ये वेदांतने महाराष्ट्रासाठी सात पदके जिंकली आहेत. वेदांतच्या या यशावर आर माधवण खूप आनंदी झाला आहे. सोशल मिडियावर ट्वीट करून वेदांतचे अभिनंदन केले आहे.

वेदांत माधवनने बसवगानुडी एक्वाटिक सेंटर येथे झालेल्या जलतरण स्पर्धेत चार रौप्य आणि तीन कास्यपदके जिंकली आहत. त्यांच्या विजयानंतर लोक त्याचे आणि आर माधवनचे ट्वीटरद्वारे अभिनंदन करत आहेत. एका माध्यमाने दिलेल्या माहितीनुसार वेदांतने 800 मीटर फ्री स्टाइल जलतरण, 1500 मीटर फ्री स्टाइल जलतरण, 4 × 100 मीटर फ्री स्टाइल स्विमिंग आणि 4 × 200 मीटर फ्री स्टाइल जलतरण रिले इव्हेंटमध्ये रौप्य पदके जिंकली आहेत. त्याने 100 मीटर, 200 मीटर आणि 400 मीटर फ्रीस्टाइल जलतरण प्रकारात कांस्यपदक जिंकले. यापूर्वीसुद्धा वेदांतने स्विमिंग चॅम्पियनशिपमध्ये आपल्या देशासाठी पदके मिळवून दिली आहे.

आर माधवन याने बॉलीवुड चित्रपट आणि तमिळ चित्रपटामध्ये सुद्धा काम केले आहे. त्याने बॉलीवुडमध्ये अनेक सुपरहीट चित्रपटही केले आहेत. त्याने 'लंडन वाले',रहना है तेरे दिल में, रंग दे बसंती, तनु वेड्स मनू, 3 इडियट्स, साला खडूस यासारख्या बॉलीवुड चित्रपटामध्ये काम केले आहे. ' द नंबी इफेक्ट' हा त्याचा आगामी चित्रपट आहे. हे इस्रोचे माजी शास्त्रज्ञ नंबी नारायणन यांच्या जीवनावर आधारित आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Gavandali: गवंडाळीतील उड्डाण पुलाच्या कामाला गती द्या! प्रवाशांची मागणी;अरुंद रस्त्यावर अडथळा, वाहनचालकांना त्रास

Goa News Live Updates: अनमोड घाटातील रस्ता खचला, वाहतुकीवर परिणाम शक्य

Goa Politics: केजरीवालांच्‍या ‘एकला चलो’चा गोव्‍यावर परिणाम? राजकीय वर्तुळात चर्चा; युतीशिवाय पर्याय नसल्याचे विरोधकांचे मत

No Bag School Goa: गोव्यात भरते ‘बिनदप्तरी शाळा’! कुडचडेच्या ‘सीटीएन’ शाळेचा उपक्रम; विद्यार्थी लुटतात आनंद

Shwetakshi Mishra: अभिमान! श्वेताक्षी मिश्रा यांना उत्तर धृवावर संशोधनाची संधी; ग्रीष्मकालीन तुकडीत सहभाग

SCROLL FOR NEXT