...याच समीर वानखेडेंनी शाहरुखला ही दाखवला होता कायद्याचा धाक

शाहरुख खानची समीर वानखेडेसोबत आमनेसामने होण्याची ही पहिलीच वेळ नाही. अनेक वर्षांपूर्वी समीर वानखेडेंनी शाहरुखला दीड लाखांचा दंड ठोठावला होता.
Sameer Wankhede took action On Shah Rukh Khan also on Mumbai airport
Sameer Wankhede took action On Shah Rukh Khan also on Mumbai airport Dainik Gomantak
Published on
Updated on

NCBचे अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) सध्या प्रचंड चर्चेत आहेत. गेल्या वर्षी सुशांत सिंग राजपूतच्या (Sushant Singh Rajput) मृत्यूनंतरही समीर प्रसिद्धीच्या झोतात आले होते , मात्र शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) मुलगा आर्यन खान (Aryan Khan) याच्या अटकेनंतर सर्वत्र चर्चा होत आहे ती समीर वानखेडेंचीच . 2 ऑक्टोबर रोजी NCB ने क्रूझवर छापा टाकून आर्यन खानला अटक केली (NCB Raid). आर्यनने आतापर्यंत अनेकवेळा जामिनासाठी अर्ज केला आहे, मात्र प्रत्येक वेळी त्याचा अर्ज फेटाळण्यात आला आहे. सध्या आर्यनची केस कोर्टात सुरू आहे.शाहरुख आपल्या मुलाला वाचवण्यासाठी अनेक प्रत्यन करताना दिसत आहे ,पण आर्यनला जामीन काही केल्या मिळत नाही. (Sameer Wankhede took action On Shah Rukh Khan also on Mumbai airport)

समीर वानखेडे यांनी आतापर्यंत अनेक सेलिब्रिटींना अनेक प्रकरणात दंड ठोठावला आहे मात्र त्यांनी एकदा स्वतः शाहरुख खानवर देखील कारवाई केली होती . शाहरुख खानची समीर वानखेडेसोबत आमनेसामने होण्याची ही पहिलीच वेळ नाही. अनेक वर्षांपूर्वी समीर वानखेडेंनी शाहरुखला दीड लाखांचा दंड ठोठावला होता. आणि आता आर्यन खानच्या केसमुळे तो मुद्दा आता पुन्हा चर्चेत आला आहे.

Sameer Wankhede took action On Shah Rukh Khan also on Mumbai airport
'लेकाच्या पराक्रमामुळे' सुपरस्टारची झाली अशी दयनीय अवस्था..

काय आहे ते पूर्ण प्रकरण

वास्तविक, 2011 मध्ये समीर वानखेडे हे सेवाकर विभागात कार्यरत होते . त्यावेळी समीर मुंबई विमानतळ कस्टम विभागाचे प्रमुख होते,तेंव्हा अनेक सेलिब्रिटी त्यांच्या देखरेखीखाली परदेशी जात असत . ही गोष्ट 2011 ची आहे जेव्हा शाहरुख लंडनहून सुट्टी संपवून कुटुंबासह परतत होता. यावेळी त्याच्याकडे 20 बॅग्स होत्या. त्यावेळी समीरने किंग खानच्या कुटुंबीयांना जाऊ दिले होते, मात्र त्याला विमानतळावरच थांबवले होते. या संदर्भात समीरने शाहरुखची बराच वेळ चौकशी देखील केली होती.

यानंतर समीरने शाहरुखला जास्त वजन आणल्याने दीड लाखांचा दंड ठोठावला होता . आर्यनच्या खटल्याबद्दल बोलायचे झाले तर आज या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. आज पुन्हा आर्यनच्या जामीनावर त्याची सुटका होणार की आणखी काही दिवस तुरुंगातच राहावे लागणार याचा निर्णय होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com