Deepika And Siddhant Dainik Gomantak
मनोरंजन

Gehraiyaan Trailer: पहा दीपिका आणि सिद्धांतचा बोल्ड अंदाज

दीपिकाने डिजिटल जगातही तिची आता नवी इनिंग सुरू केली. बऱ्याच दिवसांपासून ती तिच्या 'गहराइया' (Gehraiyaan) या डिजिटल चित्रपटामुळे चर्चेत आहे

दैनिक गोमन्तक

बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणच्या जबरदस्त अभिनयाची जादूने जगभरातील प्रेक्षकांना भुरळ पाडली आहे इतकेच नव्हे तर, चाहत्यांच्या पसंतीस सुध्दा उतरली. आता अश्यातच दीपिकाने डिजिटल जगातही तिची आता नवी इनिंग सुरू केली. बऱ्याच दिवसांपासून ती तिच्या 'गहराइया' (Gehraiyaan) या डिजिटल चित्रपटामुळे चर्चेत आहे. आता तर तीच्या या चित्रपटाचा ट्रेलरही रिलीज झाला.

दीपिकाने ट्रेलर शेअर केला आहे

या चित्रपटात दीपिकासोबतच (Deepika Padukone)अनन्या पांडे, सिद्धांत चतुर्वेदी आणि धैर्य करवा हे कलाकारही मुख्य भूमिकेत आहेत. चित्रपटात दीपिका आणि सिद्धांत यांच्यात खूप बोल्ड सीन्स शूट करण्यात आले आहेत, ज्याची झलक ही स्पष्टपणे ट्रेलरमध्ये दिसून येते. दीपिकाने हा ट्रेलर तिच्या इंस्टाग्राम पेजवर पोस्ट केला असून कॅप्शनमध्ये लिहिले की, 'जिंदगी, प्रेम आणि पर्याय... या सर्वांचा अनुभव घेऊया.'

जाणून घ्या काय आहे कथा

ट्रेलरची सुरुवात दीपिका पदुकोणने होत असून , ती म्हणते की, "मला घरात राहणे पसंत नाही, मला इथे अडकल्यासारखे वाटते." यानंतर एंट्री होते अनन्या पांडे ची म्हणजे दीपिकाच्या बहिणीची , जी दीपिकाची तिच्या प्रियकराशी म्हणजे सिद्धांत चतुर्वेदी (Siddhant Chaturvedi) ओळख करून देते. मग पुढची कथा ही तिच्याच बहिणीच्या बॉयफ्रेंडसोबतच्या अफेअरभोवती फिरत असते.

रिलेशनशिप ड्रामा आहे फिल्म

ही फिल्म एक रिलेशनशिप ड्रामा आहे, ज्यामध्ये दीपिका आणि अनन्याने खूप बोल्ड सीन्स दिले आहेत. यामध्ये आजच्या नातेसंबंधातील गुंतागुंत आणि तरुणांच्या जीवनातील विशेष पैलू दाखविण्याचा प्रयत्न केला आहे.

OTT प्लॅटफॉर्म होणार प्रदर्शित

शकुन बत्रा दिग्दर्शित, चित्रपटात रजत कपूर आणि ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह यांचीही प्रमुख भूमिका असलेला चित्रपट हा 11 फेब्रुवारी रोजी OTT प्लॅटफॉर्म Amazon Prime Video वर स्ट्रीम होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Village Tourism: "आम्हाला प्रकल्प हवाच!" सुर्ला ग्रामस्थांकडून इको-टुरिझमचे स्वागत; शासनाच्या प्रकल्पाला ग्रामसभेचा पाठिंबा

TCS Layoff: मोठी बातमी! टीसीएस देणार 12,000 जणांना नारळ; सीईओ म्हणाले, 'भविष्यासाठी गरजेच...'

Goa Live News: नागपंचमीसाठी नागोबा सज्ज

Bison In Sawantwadi: एक, दोन नव्हे… थेट 15 गवारेड्यांचा धुमाकूळ! लोकांना फुटला घाम, पाहा थरकाप उडवणारा VIDEO

तुम्हालाही विनाकारण राग येतोय? सावधान! असू शकते रक्तातील साखरेच्या बदलांचे लक्षण, 'या' गोष्टी ठेवा लक्षात

SCROLL FOR NEXT