या चित्रपटामध्ये डान्स करताना ऐश्वर्याच्या कानातून वाहत होत रक्तं  Dainik Gomantak
मनोरंजन

या चित्रपटामध्ये डान्स करताना ऐश्वर्याच्या कानातून वाहत होत रक्तं

आज आम्ही तुम्हाला ऐश्वर्या रायशी संबंधित असाच एक किस्सा सांगणार आहोत.

दैनिक गोमन्तक

ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai Bachchan) तिच्या सौंदर्यासाठी जगभरात ओळखली जाते. यासोबतच तिने बॉलीवुड (Bollywood) चित्रपटामध्येही आपले अभिनय कौशल्य दाखवले आहेत. असे म्हणतात की ती कोणत्याही चित्रपटामध्ये असली तरी ती तिच्या अभिनय करतांना त्या भूमिकेत शिरते. आज आम्ही तुम्हाला ऐश्वर्या रायशी संबंधित असाच एक किस्सा सांगणार आहोत.

तुम्हाला देवदास चित्रपट आठवत असेलच. शाहरुख खान, ऐश्वर्याराय आणि माधुरी दीक्षित यांनी या चित्रपटात त्यांनी उत्कृष्ट अभिनय केले आहे. तसेच या चित्रपटात माधुरी आणि ऐश्वर्यायाने उत्कृष्ट डान्स देखील केला आहे. डोला रे डोला या गाण्यावर दोन्ही अभिनेत्रीनी डान्स करतांना कोणतीही कसर सोडली नाही. सततच्या डान्सच्या सरावामुळे दोन्ही अभिनेत्रीना अनेक समस्यांना सामोरे जावे लागले. ऐश्वर्या रायच्या कानातूनही रक्तस्त्राव सुद्धा होऊ लागला होता. जाणून घेवूया देवदास चित्रपटाशी संबंधित काही खास गोष्टी

कानातून येत होत रक्त

ऐश्वर्या आणि माधुरी दीक्षित यांच्यावर डोला रे डोला हे गाण चित्रित केले होते. हे गाण खूप प्रसिद्ध सुद्धा झाले होते. आजसुद्धा लोक या गाण्यावर नाचताना दिसतात. या चित्रपटामध्ये ऐश्वर्याने पारोची भूमिका साकारली होती. या गाण्यासाठी या दोन्ही अभिनेत्रीना वजनदार दागिने घालून डान्स करावा लागला होता. या दरम्यान ऐश्वर्याने कानात जड झुमके घातले होते. कानातले पडल्यामुळे ऐश्वर्याच्या कानातून रक्तस्राव होऊ लागला. परंतु तिने न थांबता डान्स पूर्ण केला.

देवदास या चित्रपटमधील "काहे छेडे मोहे" या गाण्यासाठी माधुरी दीक्षितने घातलेला लेहेगा 30 किलो वजनाचा होता. एवढा भारी लेहेंगा घालून माधुरीने डान्स केला होता. या गाण्याच्या शूटिंगदरम्यान ती प्रेग्नंट होती. तरीसुद्धा तिने डान्स सुरूच ठेवला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live News: सीबीडीटीच्या आरोपींना सशर्त जमीन मंजूर

Panaji Smart City: पणजीत नागरिकांच्या जीवाशी खेळ! खोदकाम सुरू; पण फलक नाहीत; दुचाकीस्वारांना धोका

Tribal Reservation Bill: आदिवासी विधेयकावर लोकसभेत होणार चर्चा; राजकीय प्रतिनिधित्वाला मिळणार बळकटी; तानावडेंनी दिली माहिती

Sonu Nigam At IFFI: 'आसमान से आया फरिश्ता..'; सोनू-अनुराधाची रफींना आदरांजली, रसिक मंत्रमुग्ध

Goa Cabinet: फडणवीस कि पुन्हा शिंदे? महाराष्ट्रातील सत्ता स्थापनेच्या पेचामुळे गोवा मंत्रिमंडळातील बदल खोळंबला

SCROLL FOR NEXT