Manoj Tiwari On Nasiruddin Shah Dainik Gomantak
मनोरंजन

Manoj Tiwari On Nasiruddin Shah: नसीरुद्दीन शाह चांगले अभिनेते ;पण...भाजप नेत्याची केरळ स्टोरीवरच्या वादावर प्रतिक्रिया

अभिनेते आणि भाजप नेते मनोज तिवारी यांनी नसीरुद्दीन शाह यांच्या केरळ स्टोरी चित्रपटाच्या मतावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

Rahul sadolikar

अभिनेते नसीरुद्दीन शाह आपल्या बेधडक बोलण्याने अनेकदा ट्रोल झाले आहेत. तरीही नसीरुद्दीन शाह यांनी आपल्या बिनधास्त बोलण्याला कधीही आवर घातला नाही. गेले काही दिवस 'द केरळ स्टोरी' या चित्रपटावर देशभरात जोरदार वाद सुरू आहेत.

या चित्रपटावर अलीकडेच नसीरजींनी नकारात्मक प्रतिक्रिया दिली होती त्यावर आता अभिनेते आणि भाजप नेते मनोज तिवारी यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. काय म्हणतायत मनोज तिवारी चला पाहुया?

नसीरुद्दीन शाह म्हणतात...

ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह त्यांच्या ताज्या विधानामुळे सध्या चर्चेत आहेत. अलीकडेच त्यांनी दिग्दर्शक सुदीप्तो सेन यांच्या 'द केरळ स्टोरी' या चित्रपटावर आपले मत मांडले होते, त्यांच्या बेधडक मताने सतत चर्चेत राहिला होते. 

याविषयी बोलताना त्यांनी अलीकडेच एका मुलाखतीदरम्यान सांगितले की, चित्रपटाचे यश हा धोकादायक ट्रेंड आहे. तसेच त्याची तुलना नाझी जर्मनीशी केली. केरळ स्टोरीवर थेट मत व्यक्त केल्याने आता नसीरुद्दीन शाह यांना टीकेला सामोरं जावं लागत आहे.

मनोज तिवारी यांचं प्रत्युत्तर

आता नसीरुद्दीन शाह यांच्या या मोठ्या वक्तव्यावर भाजप नेते, भोजपुरी गायक आणि अभिनेता मनोज तिवारी यांनी निशाणा साधला आहे. द केरळ स्टोरीवरील नसीरुद्दीनच्या टिप्पण्यांबद्दल मनोज तिवारी यांना विचारले असता, त्यांनी एका न्यूज पोर्टलला उत्तर दिले "मला जड अंतःकरणाने असे म्हणायचे आहे की नसीरुद्दीन एक चांगला अभिनेता आहे परंतु त्याचे हेतू योग्य नाहीत".

पूर्वीच्या चित्रपटांबद्दल कधी बोलले नाहीत

पूर्वीच्या चित्रपटांमध्ये गुंड महिलांना त्रास देत असत आणि त्यांच्याबद्दल अयोग्य टिप्पणी करत असत, तेव्हा नसीरुद्दीनने आवाज का उठवला नाही, असा सवाल त्यांनी केला. मात्र, यापूर्वीचे चित्रपट काल्पनिक असल्याचे मतही तिवारी यांनी मांडले. द केरळ स्टोरी आणि द काश्मीर फाईल्स ही वस्तुस्थितींवर आधारित असल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले.

नसीरुद्दीन शाह यांची भारतीय नागरीक म्हणून चांगली छाप नाही

पूर्वीच्या चित्रपटांबद्दल नसीरुद्दीन शाह यांना काही बोलायचे नव्हते, असे मनोजने सांगितले. यानंतर तिवारींनी सांगितले की, जर त्यांना चित्रपटाबाबत काही अडचण असेल तर तो कोर्टात जाऊ शकतो. 

भोजपुरी सुपरस्टार मनोज तिवारी पुढे म्हणाले की बोलणे खूप सोपे आहे. नसीरुद्दीन शाह यांनी भारतीय नागरिक म्हणून आणि माणूस म्हणून चांगली छाप पाडलेली नाही.

चित्रपट पाहणार नाही

विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वी नसीरुद्दीन म्हणाले होते की, 'भिड', 'आफवा' आणि 'फराज' हे सर्व चित्रपट फ्लॉप झाले, पण 'द केरळ स्टोरी' पाहण्यासाठी लोकांची गर्दी झाली होती. त्यांनी चित्रपट पाहिलेला नाही आणि त्याबद्दल बरेच वाचले असल्याने तो पाहण्याचा कोणताही विचार नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. 

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT