Sudha and Om Shivpuri Dainik Gomantak
मनोरंजन

Birthday Special: ओम शिवपुरी च्या प्रेमात होती टेलिव्हिजनची फेमस 'बा'

अभिनेत्री सुधा यांनी "क्योंकि सास भी कभी बहू थी" या टीव्ही मालिकेतून (TV series) खूप नाव कमावले.

दैनिक गोमन्तक

टीव्हीच्या (TV) माध्यमातून घरोघरी पोहोचलेल्या आणि बॉलीवुड (Bollywood) क्षेत्रातील सुप्रसिद्ध अभिनेत्री सुधा शिवपुरी (Sudha Shivpuri) यांचा आज वाढदिवस (Birthday) आहे. त्या टीव्हीच्या माध्यमातून 'बा' या नावाने प्रसिद्ध आहे. त्यांच्या वयात त्या खूप हिट होत्या. जिथे प्रत्येकाला त्यांना भेटायला आणि त्यांचे आशीर्वाद घेण्यास उत्सुक असत. त्यांच्या "क्योंकि सास भी कभी बहू थी" या टीव्ही मालिकेतून (TV series) त्यांनी खूप नाव कमावले. ही मालिका एकूण आठ वर्ष टीव्हीवर चालू होती. यामुळेच त्या प्रेक्षकांच्या घरात हिट ठरली.

सुधा शिवपुरी (Sudha Shivpuri) यांचा जन्म 14 जुलै 1937 रोजी इंदौर येथे झाला. त्यांच्या जन्मानंतर काही वर्षांनी त्यांचे संपूर्ण कुटुंब राजस्थानात गेले. जेव्हा त्या आठवित शिकत होत्या, तेव्हा त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यानंतर त्यांच्या घरात दारिद्र्याची परिस्थिति निर्माण झाली, त्यांची आई सुद्धा आजारी पडली होती. अशा परिस्थितीत सुधाकडे काम करण्याशिवाय काहीच उरले नाही, यामुळे अखिल भारतीय रेडियोच्या जालंधर केंद्रात होणाऱ्या नाटकांमध्ये (Drama) त्यांनी बाल कलाकार म्हणून काम करण्यास सुरुवात केली.

काही दिवसांनंतर ओम शिवपुरी यांची भेट होऊन त्यांची चांगली मैत्री झाली. जसजसा काळ गेला तसतसे या दोघांमधील प्रेम वाढू लागले, परंतु त्या काळात सुधाच्या आयुष्यातील सर्वात मोठी समस्या म्हणजे त्यांच्या कुटुंबातील अनेक वर्षापासून असलेली दारिद्र्य. त्या कारणास्तव त्याने त्या काळात अभ्यास सोडून कमाई करण्याचा निर्णय घेतला पण ओम त्यांच्या आयुष्यात होते आणि त्यांनी त्यांना बीए करायला सांगितले , ज्यामुळे सुधा यांनी बीएचे शिक्षण पूर्ण केले.

सुधा यांचे एकीकडे बीएच शिक्षण सुरू होते तर घेत ओम यांचे चित्रपटांमध्ये करियर करण्यात मग्न होते. पण यादरम्यान अभिनेत्रीसोबत लग्नाची चर्चा घरीच सुरू झाली होती जिथे अनेक स्थळे यायला सुरुवात झलाई होती. परंतु , ओमच्या घरी एक वेगळीच कथा चालू होती. ओम यांच्या कुटुंबातील सदस्यांनी सांगितले की त्यांच्या सर्व भावंडांचे लग्न होई पर्यंत त्यांचे लग्न होणार नाही. प्रत्येकाचे लग्न त्यांच्या घरी स्थायिक होईपर्यंत, तो नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधून अभ्यासक्रम संपल्यानंतर परत येईल आणि तो आल्याबरोबर सुधा यांच्याशी लग्न करळ असा त्यांचा विश्वास होता.

ओम शिवपुरी हे दिल्लीला आले. परंतु सुधा यांच्याकडे लग्नाचा दबाव वाढत होता. दरम्यान ओम यांनी एक युक्ति वापरली आणि सुधालाही नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये दाखल केले. जिथे त्यांची मैत्रीण त्यांच्याकडे आली आणि त्याचबरोबर त्यांनी अभिनयाचा अभ्यास करण्यास सुरुवात केली. सुधा यांच्या कुटुंबातील सदस्यांनी त्यांना अभ्यासासाठी दिल्ली येथे पाठवले होते, परंतु लग्नाचे भूत अद्याप त्यांच्या डोक्यावरुण उतरले नव्हते. यामुळेच त्यांनी एका मुलाला सुधा यांना भेटायला दिल्ली नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा येथे पाठवले होते. पण जेव्हा सुधा या त्या मुलाला भेटल्या , तेव्हा त्या मुलाला सांगितले की त्यांचे दुसऱ्या मुलांवर प्रेम आहे आणि त्यांचे लग्न होऊ शकत नाही .

या सगळ्या गडबडीत शेवटी सुधा यांचे 1968 मध्ये ओम यांच्याशी लग्न केले, लग्नानंतर डोघांनीही एकत्रितपणे दिशांतर नावाची नाटक कंपनी सुरू केली या कंपनीत दोघांनी बरीच नाटक लिहिली आणि बऱ्याच नाटकांत धडपडही केली. 1974 दरम्यान ओम यांना मुंबईहून चित्रपटांच्या ऑफर येऊ लागल्या. ओम आणि सुधा या दोघांनीही मुंबईत स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. सुधा यांना चित्रपटांमध्ये फारच कमी काम मिळाले, तर त्यांच्या पतीला चित्रपट सृष्टीत खूप मोठ्या प्रमाणात काम मिळत होते.

ओम शिवपुरी यांचे निधन

मुंबईत आल्यानंतर त्या दोघांचे आयुष्य खूप चांगले चलले होते. ओम चित्रपटातही नियमित काम करत होते. त्यांना दोन मुले देखील झाली. मुलीचे नाव रीतु शिवपुरी आणि मुलाचे नाव विनीत शिवपुरी असे ठेवले होते. 15 ऑक्टोबर 1990 रोजी वयाच्या 54 व्या वर्षी हृदयविकाराने मृत्यू झाला. या घटनेनंतर सुधा या पूर्णपणे तुटल्या होत्या. त्या काळात त्यांनी स्वत:ची खूप काळजी घेतली तर त्याच्या मुलांनीही त्यांना खूप आधार दिला.

सुधा यांची अभिनयाला पुन्हा सुरुवात

सुधा यांनी वयाच्या 60 व्या वर्षी पुन्हा एकदा काम करायला सुरुवात केली. एकता कपुरच्या प्रसिद्ध टीव्ही मालिका ' क्योंकि सास भी कभी बहू थी ' यात 'बा' ची भूमिका केली होती. त्यावेळी प्रेक्षकांनी त्याच्या या भूमिकेला खूप प्रेम दिले. 2009 मध्ये संगीत नाटक अकादमीने अभिनय क्षेत्रात केलेल्या योगदानाबद्दल सुधा शिवपुरी यांना गौरविण्यात आले .

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'गोंयत कोळसो नाका' आंदोलनाला विरोधी पक्षांची एकजूट! आलेमाव, सरदेसाई अन् परबांचा भाजपवर हल्लाबोल; म्हणाले, 'कोळशाच्या मुद्यावर गप्प बसणारे आता...'

Goa Sex Racket Bust: वास्को पोलिसांची दाबोळीतील 'स्पा'वर छापेमारी, सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करत सहा महिलांची सुटका; दोघे अटकेत

Krishnaji Kank: फोंडा किल्ल्यासाठी शंभूराजे दौडत आले, गोव्याचा गव्हर्नर पोर्तुगीज सैन्यासह पळत सुटला; शूरवीर कृष्णाजी कंकांची कथा

Terrorists Attack in India: हाफिज सईदकडून भारतावर हल्ल्याचा कट, बांगलादेशला 'लाँचपॅड' बनवण्याची तयारी; दहशतवादी सैफुल्लाहचा चिथावणीखोर VIDE0 व्हायरल

Ironman 70.3 Goa India: गोवा 'आयर्नमॅन' स्पर्धेत विदेशी खेळाडूंनी मारली बाजी! भारतीय एअर फोर्सनेही नोंदवला तिहेरी विजय

SCROLL FOR NEXT