अभिनेता जतिन सरना दिसणार यशपाल शर्मांच्या भूमिकेत

यशपाल शर्मा यांच्या निधनाबद्दल बॉलिवूड अभिनेता जतिन सरना (Jatin Sarna) यांनी शोक व्यक्त केला आहे.
Actor Jatin Sarna with Yashpal Sharma
Actor Jatin Sarna with Yashpal SharmaInstagram/Jatin Sarna
Published on
Updated on

क्रिकेट वर्ल्ड कप 1983 (1983 World Cup) चे हीरो यशपाल शर्मा (Yashpal Sharma) यांचे मंगळवारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. यशपाल शर्मा 66 वर्षांचे होते. यशपाल शर्मा यांच्या निधनाबद्दल बॉलिवूड अभिनेता जतिन सरना (Jatin Sarna) यांनी शोक व्यक्त केला आहे. 'सेक्रेड गेम्स' (Sacred Games) मधून लोकप्रियता मिळवणारे जतिन' ’83’ चित्रपटात यशपाल शर्माची भूमिका साकारणार आहे. हा चित्रपट पूर्ण झाला आहे, परंतु कोरोनाव्हायरस (Coronavirus Pandemic) मुळे त्याचे प्रकाशन रखडले आहे.(Bunty aka Jatin Sarna of Sacred Games is playing Role of Yashpal Sharma in film 83)

जतिन सरनाने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान यशपाल शर्मासोबत घालवलेले क्षण आठवले आहे. जतिनने यशपाल शर्मा आणि स्वत:चे अनेक फोटोज इंस्टाग्रामवर शेअर केली आहेत, ज्यात क्रिकेटपटू यशपाल शर्मा त्याला खेळाच्या बारकाईने समजावताना दिसत आहेत. हे फोटोज शेअर करताना जतिन सरनाने खूप भावनिक कॅप्शन देखील लिहिले आहे.

Actor Jatin Sarna with Yashpal Sharma
Mimi Trailer Out: कृतीची सरोगेट मदर बनण्याची इमोशनल कहाणी

जतिन सरनाने लिहिले- "हे बरोबर नाही सर, नाही हे योग्य नाही आणि देवा तू पण बरोबर नाहीस. यशपाल सर, यावर विश्वासच बसत नाही. आपण इतक्या लवकर जाऊ शकत नाही. अजून एक डाव शिल्लक होता. मुलाखत अजून येणे बाकी होती. तुम्हाला भेटण्यासाठी मला तुमच्या घरी यायचे होते, मला एकत्र चित्रपट पहायचा होता. तुमचे एक्सप्रेशन पाहायचे होते. यश पा यश पा म्हणून ओरडायचे होते. सिंह कोण आहे हे सर्वांना माहित असले पाहिजे. सर तुमची नेहमी आठवण येईल. इतिहास तुम्हाला कधीच विसरणार नाही."

यशपाल शर्मा यांचे क्रिकेटमधील योगदान आणि भारत विश्वकरंडक मिळविण्यात त्यांनी घेतलेली भूमिका चित्रपटाचे दिग्दर्शक कबीर खान यांनी चित्रपटाच्या पडद्यावर आणली आहे. 83 चित्रपटात रणवीर सिंग माजी भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार कपिल देव याच्या भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वीच यशपाल यांनी जगाला निरोप दिल्याने जतीन सरना यांच्यासह चित्रपटाशी संबंधित असलेल्या सर्वांनाच धक्का बसला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com