Birthday special: दया भाभी 'टप्पू के पापा' म्हणून जेठालाल का हाक मारायची
Birthday special: दया भाभी 'टप्पू के पापा' म्हणून जेठालाल का हाक मारायची  Instagram/@disha.vakani_
मनोरंजन

Birthday special: दया भाभी 'टप्पू के पापा' म्हणून जेठालालला का हाक मारायची

दैनिक गोमन्तक

तारक मेहता का उल्टा चष्मा (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) या प्रसिद्ध टीव्ही मालिकेमध्ये दया भाभीची (Daya Bhabhi) भूमिका साकारून घरोघरी लोकप्रिय झालेल्या दिशा वाकाणी (Disha Vakani) हिचा आज वाढदिवस आहे. 17 ऑगस्ट 1978 रोजी तिचा जन्म झाला. ती आज 43 वा वाढदिवस साजरा करत आहे. दिशा वाकाणीने ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai Bachchan) आणि शाहरुख खान (Shah Rukh Khan) कलाकारांसोबत काम केले आहे. पण तिला खरी ओळख तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेतून 'दया बेन' या भूमीकेतून मिळाली.

अनेक चित्रपटांमध्ये काम केलेल्या दिशाने 2009 ते 2018 पर्यंत 'तारक मेहता का उल्टा चष्मा" द्वारे प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले. दया बेनच्या भूमिकेत दिशाची बोलण्याची शैली सर्वांनाच आवडली. विशेषत: जेव्हा ती 'टप्पू के पापा' म्हणायची. दिशा तारक मेहता का उल्टा चष्मा या शोमधून निघून गेल्यानंतर तिच्या चाहत्यांना तिच्या तोंडून 'टप्पू के पापा' ऐकण्याची इच्छा होती. दिशा पुन्हा या शोचा भाग बनेल की नाही हे कोणालाही माहिती नाही.

दया भाभी जेठालालला 'टप्पू के पापा' का म्हणायची?

दिशा एका मुलाखतीमध्ये म्हणाली, 'गुजराती कुटुंबामध्ये ही एक प्रथा आहे की पत्नी तिच्या पतीला त्यांच्या नावाने हाक मारत नाही. असे मानले जाते की जर तिने आपल्या पतीला नावाने हाक दिल्यास तिच्या पतीचे आयुष्य कमी होईल. म्हणूनच ती पतीला आपल्या मुलाचे वडील म्हणून संबोधते. असे सांगितले.

या दरम्यान, दिशा वाकाणीने शोबद्दल असेही म्हटले होते की , प्रेक्षकांना शो पाहिल्यावर अचानक हसायला आले म्हणजे टो खरा कॉमेडी शो. तारक मेहता का उल्टा चष्मा हा कॉमेडी शो एक प्रकारे चार्ली चॅप्लिनची आठवण करून देणारा आहे, ज्यांचे म्हणने होते की "मला नेहमी पावसात फिरायला आवडते, त्यामुळे कोणीही मला रडतांना पाहू शकत नाही."

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's Live News: पर्वरीत चारचाकीच्या धडकेत दुचाकी चालकाचा मृत्यू

Fighter Jet Attack Simulation: गोव्यात UFO? मध्‍यरात्री कानठळ्या, हृदयात धडकी भरवणाऱ्या आवाजचे रहस्य काय?

SSC Result 2024 : ‘हेडगेवार’ची 100 टक्के निकालाची परंपरा कायम

Mopa Airport: खून प्रकरणानंतर मोपात सतर्कता; शेकडाे मजुरांची पडताळणी

Margao Accident : कणकवली येथे कार उलटून मडगावातील सात प्रवासी जखमी

SCROLL FOR NEXT