Bigg Boss 17 Dainik Gomantak
मनोरंजन

Bigg Boss 17: विकी अन् नील यांना दाखवला जाणार घरचा रस्ता? 'हे' आहे कारण

Bigg Boss 17: सर्वप्रथम ऐश्वर्या शर्माने विकी जैनसाठी तिच्या हृदयाचे दरवाजे बंद केले आणि सांगितले की तिचा त्याच्यावर अजिबात विश्वास नाही.

दैनिक गोमन्तक

Bigg Boss 17: बिग बॉसच्या १७ वा सीझन चांगलाच गाजताना दिसत आहे. बिग बॉसच्या घरात दररोज कुणाची तरी भांडण होताना दिसते. स्पर्धकांमध्ये खटके उडतात. आता शो चा नवीन प्रोमो समोर आला आहे. यामध्ये सलमान वीकेंड का वॉर मध्ये विकी जैन आणि निल शर्मा यांचा क्लास घेताना दिसत आहे.

समोर आलेल्या प्रोमोमध्ये सलमान विकीला विचारताना दिसत आहे, त्याने निल शर्माला कॉल केला होता का? अंकिताला याबद्दल माहित होते का? याची शिक्षा म्हणून किंवा शो चे नियम म्हणून विकी आणि नील ला घराबाहेर पडावे लागण्याची शक्यता आहे. आता नेमके काय होणार हे एपिसोड मध्ये समजणार आहे.

याबरोबरच, शो ला सुरुवात झाल्यापासून जी व्यक्ती चर्चेत आहे ती म्हणजे ईशा मालवीय. आता सलमान तिलादेखील रागवताना दिसला आहे.

प्रोमोमध्ये घरात गायक आणि रॅपर 'किंग' ची एंट्री झाली आहे. तो घरातील मैत्रिणींना त्याच्या गाण्यांवर नाचण्यास भाग पाडतो. यानंतर तो स्पर्धकांना एक गेम खेळायला लावतो ज्यामध्ये स्पर्धकांनी त्या सदस्यासाठी 'हृदयाचे दार' बंद करावे, ज्याला ते त्यांच्या हृदयात स्थान देऊ इच्छित नाहीत.

सर्वप्रथम ऐश्वर्या शर्माने विकी जैनसाठी तिच्या हृदयाचे दरवाजे बंद केले आणि सांगितले की तिचा त्याच्यावर अजिबात विश्वास नाही. यानंतर अरुण श्रीकांत मशेट्टी यांनी अभिषेक कुमारसाठी आपल्या हृदयाचे दरवाजे बंद केले आणि म्हटले की, 'मी याच्याबरोबर भाईचारा कधीच टिकवू शकत नाही.'

त्यानंतर अंकिता लोखंडे सना रईस खानसाठी म्हणाली, 'तो फसवणूक करणारा आहे. ती माझ्या पाठीमागे वार करते, जे मला आवडत नाही. त्यानंतर सना तिच्या बचावात म्हणते की अंकितासाठी तिच्या हृदयाचे दार कधीच उघडू शकले नाही कारण तिला ती कधीच खरी वाटली नाही. सनाचे वाक्य पूर्ण होण्याआधीच अंकिताने तोंडावर दार बंद केले. दरम्यान, नील आणि विकीला बाहेर काढले जाईल का? हे आज रात्री ९ वाजता समजणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Student Financial Assistance: गोमंतकीय विद्यार्थ्यांना सरकारची मोठी भेट! IIT, IIM, AIIMSमध्ये प्रवेश मिळाल्यास 1 लाखांची शिष्यवृत्ती

Effigy Plastic Use: नरकासुर प्रतिमांसाठी प्लास्टिकचा वापर; प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या डोळ्यांवर पट्टी?

Smriti Mandhana Record: विराट-रोहितला जमलं नाही ते स्मृती मानधना करणार! टी-20 क्रिकेटमध्ये विश्वविक्रम रचण्याची संधी, फक्त इतक्या धावांची गरज

Gram Panchayat CCTV Plan: गोव्यातील प्रत्येक पंचायतीवर सीसीटीव्हीची नजर! तीन आठवड्यांत प्रक्रिया पूर्ण होण्याची शक्यता

Karnataka Accident: कर्नाटकात प्रवाशांवर काळाचा घाला! बस आणि ट्रक यांच्यात समोरासमोर धडक; 4 ठार, 14 जखमी

SCROLL FOR NEXT