Bigg Boss 17  Dainik Gomantak
मनोरंजन

Bigg Boss 17: फिनाले जवळ येताच 'या' स्पर्धकांची घरातून हकालपट्टी

Bigg Boss 17: बिग बॉसच्या घरात मोठा ड्रामा पाहायला मिळाला होता.

दैनिक गोमन्तक

Bigg Boss 17: बिग बॉसच्या घरात नेहमीच ट्विस्ट अँड टर्न्स पाहायला मिळत असतात. आता मात्र फिनाले जवळ येत असातना स्पर्धकांना बिग बॉसकडून आश्चर्याचे धक्के मिळत असल्याचे चित्र दिसत आहे.

अनेक स्पर्धकांचे इव्हिक्शन या आठवड्यात होणार आहे. चिंटू उर्फ ​​समर्थ जुरेलचा प्रवास आता संपला आहे. कमी मतांच्या आधारे त्याला शोमधून बाहेर काढण्यात आले आहे. शो मध्ये त्याची एंट्री वाइल्ड कार्ड म्हणून झाली होती. त्यानंतर ईशा मालवीय, समर्थ जुरैल आणि अभिषेक कुमार यांच्यामध्ये लव्ह ट्रँगल पाहायला मिळाला होता. मध्यंतरी या तिघांची मैत्रीदेखील पाहायला मिळाली तर त्यानंतर मोठ्या प्रमाणात भांडणेदेखील झाली. समर्थ आणि ईशाने अभिषेकच्या मानसिक आरोग्याची खिल्ली उडवल्यानंतर बिग बॉसच्या घरात मोठा ड्रामा पाहायला मिळाला होता.

मिळालेल्या माहितीनुसार, हा विकेंड सलमानने नाही तर करण जौहरने होस्ट केला आहे. करणने समर्थ आणि आयशा या दोन स्पर्धकांची चांगलीच शाळा घेतल्याचे म्हटले जात आहे. समर्थने अभिषेकला मानसिक त्रास दिल्याबद्दल आणि आएशाने मुन्नवर फारुकीच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल नॅशनल टीव्हीवर भाष्य केल्याने या दोघांना करण जौहरने कडक शब्दात सुनावले आहे.

दरम्यान, समर्थच्या जाण्याने कोणालाही फरक पडल्याचे दिसत नाही. कारण तो इतर स्पर्धकांच्या तुलनेत फार कमी कंटेट देत होता किंवा अभिषेक कुमार बरोबर भांडण्याशिवाय इतर काही करत नव्हता. आता समर्थ पाठोपाठ अरुणदेखील बाहेर बिग बॉसच्या घराबाहेर पडणार असल्याची माहीती समोर आली आहे.

आता बिग बॉसच्या घरात कोणते स्पर्धक टिकून राहणार आणि कोणाला आधीच घराबाहेर पडणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. या सीझनची बिग बॉसची ट्रॉफी कोण आपल्या नावावर करणार हे पाहणे प्रेक्षकांसाठी उत्सुकतेचा विषय असणाकर आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT