Bigg Boss 17  Dainik Gomantak
मनोरंजन

Bigg Boss 17: फिनालेच्या आधी आणखी एक स्पर्धक घराबाहेर! 'या' सदस्याचे ट्रॉफी जिंकण्याचे भंगले स्वप्न

Bigg Boss 17: सध्या सुरु असलेल्या विकेंडच्या एपिसोडमध्ये सलमान खानने अनेक स्पर्धकांच्या कुटुंबियांबरोबर संवाद साधला आहे.

दैनिक गोमन्तक

Bigg Boss 17: बिग बॉसच्या शोचा ग्रँड फिनाले जवळ आला असून आता या आठवड्यात बिग बॉसची ट्रॉफी आपल्या नावावर करणार हे पाहायला मिळणार आहे. सध्या सुरु असलेल्या विकेंडच्या एपिसोडमध्ये सलमान खानने अनेक स्पर्धकांच्या कुटुंबियांबरोबर संवाद साधला आहे.

अनिल कपूर रिअॅलिटी शो 'बिग बॉस 17'च्या प्रोमोमध्ये दिसला होता. त्याने सलमान खानसोबत खूप धमाल केली. तो त्याचा आगामी सिनेमा 'फायटर'च्या प्रमोशनसाठी आला होता. मात्र, त्यांच्यासोबत हृतिक किंवा दीपिका पदुकोण दिसले नाही. दोघांनी स्टेजवर खूप धमाल केली. याशिवाय नॉमिनेशन टास्कनंतर मन्नारा चोप्राला असभ्य बोलल्याबद्दल सलमान खानने अंकिता लोखंडे आणि ईशा मालवीय यांना फटकारल्याचेही समोर आले आहे.

याशिवाय आयशा खानची हकालपट्टी होऊनही तीन सदस्यांवर नॉमिनेशनची टांगती तलवार कायम होती. अशा परिस्थितीत सलमान खान घरातील सदस्यांना सांगतो की, फिनालेच्या एक आठवडा आधी, एका सदस्याचा प्रवास इथेच संपत आहे. त्यानंतर हा निर्णय ऐकून अंकिता आणि विकी रडू लागले आणि ईशाला धक्का बसला.

त्यामुळे कोण बाहेर गेले आहे हे अधिकृतरित्या समोर आले नाही. मात्र ईशा मालवीय घरातून बाहेर गेल्याचे म्हटले जात आहे.दरम्यान, २८ जानेवारीला बिग बॉसच्या १७ व्या सीझनचा ग्रँड फिनाले होणार आहे. आता बिग बॉसची ट्रॉफी कोण आपल्या नावावर घेऊन जाणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT