Big Boss 17  Dainik Gomantak
मनोरंजन

Big Boss 17 : "बिग बॉस हा बुद्धी आणि मनाचा खेळ तो सगळ्यांसाठी सारखा नसतो" सलमानच्या बिग बॉसच्या प्रोमो रिलीज

अभिनेता सलमान खान बिग बॉसबद्दल बोलताना या खेळाला बुद्धी आणि मनाचा खेळ म्हणाला आहे.

Rahul sadolikar

Salman Khan talking about Bigg Boss : बिग बॉस हा टेलिव्हिजनवरचा एक पॉप्युलर रिअॅलिटी शो आहे. मनोरंजन, नाट्यमय भांडणं आणि प्रसंगी एकमेकांवर धावून जात शिवीगाळ करण्यापर्यंत स्पर्धकांची मजल जाते हेही आजवर प्रेक्षकांनी पाहिलं आहे.

कित्येकदा सलमानने स्पर्धकांना खडे बोल सुनावत आपली दबंग स्टाईल दाखवली आहे. यामध्ये अभिजीत बिचकुले, एजाज खान या स्पर्धकांनी सलमानचा राग सहन केला आहे. नुकतंच सलमानने बिग बॉसबद्दल बोलताना या खेळाचं वैशिष्ट्य सांगितलं आहे.

बिग बॉसचा 17 वा सीझन

बॉलीवूडचा दबंग अभिनेता सलमान खान सध्या बिग बॉसच्या 17 व्या सीझनमुळे खूप चर्चेत आहे. रिअॅलिटी शो बिग बॉसच्या नव्या सीझनसह सलमान खान टेलिव्हिजनच्या पडद्यावर परतण्यासाठी सज्ज झाला आहे. हा बिग बॉसचा 17 वा सीझन असणार आहे.

 शनिवारी संध्याकाळी एका नवीन प्रोमोचे अनावरण करण्यात आले आणि त्यात सलमान बॉम्बमध्ये हस्तक्षेप करत असल्याचे दाखवण्यात आले. सोशल मिडीयावर त्याच्या आगामी चित्रपट टायगर 3 ची चर्चा सुरू आहे.

सलमानच्या बिग बॉसचा प्रोमो

बिग बॉसच या सीझनचा प्रोमो खूपच हटके आहे. बिग बॉस 17 च्या प्रोमोमध्ये सलमान एका बॉम्बसमोर बसलेला दिसतो आणि म्हणतो, हा बॉम्ब आहे! यात सहभागी होणारे यापेक्षा अधिक स्फोटक असतील.”

 शेवटी सलमान चुकीची वायर कापतो आणि बॉम्बचा स्फोट होतो. आगीतून बाहेर पडताना सलमान म्हणतो, आम्ही त्यांना आगीशी खेळायला लावू, स्फोट घडवून आणू. या खेळासाठी हृदय, मन आणि शक्ती लागेल. पण हा खेळ सर्वांसाठी सारखा नसेल.

एल्विश यादवची कमेंट

एल्विश यादव , मनीषा राणी आणि इतरांसाठी अनेकांनी या पोस्टवर कमेंट केल्या. एका इंस्टाग्राम युजरने प्रोमोवर कमेंट केली, "तुम्ही सुरुवातीपासूनच पक्षपाती आहात, प्रत्येकासाठी समान कसे असेल?."

 दुसर्‍याने चिंता व्यक्त केली, "क्रिकेट वर्ल्ड कप दरम्यान कोणीही लाइव्ह पाहणार नाही... लोक फक्त रिकॅप पाहतील."

बिग बॉसचा प्रोमो

23 सप्टेंबरला बिग बॉसचा हा प्रोमो रिलीज झाला. Jio Cinema ने अनोख्या कॅप्शनसह प्रोमो शेअर केला, “ ही नवीन सुरुवात स्फोटक असेल, सहभागींचे स्वागत एका नवीन शैलीत, अत्यंत सामर्थ्याने केले जाईल !तो येत आहे #BiggBoss17, 15 ऑक्टोबर रात्री 9 वाजल्यापासुन, 24 तास LIVE स्ट्रीमिंग मोफत फक्त #JioCinema वर. #BB17 #BB17onJioCinema @beingsalmankhan @colorstv.

अपहरण, जबरदस्ती अन् पाशवी अत्याचार! आर्केस्ट्रात काम करणाऱ्या तरुणीची 6 नराधमांनी लुटली अब्रु; पूर्णियाात ओलांडली क्रौर्याची सीमा

बर्च नाईटक्लब अग्नितांडवावरून विधानसभेत गदारोळ; राज्यपालांच्या अभिभाषणावेळी हौदात गेलेल्या विरोधी पक्षातील आमदारांना काढले बाहेर

Pakistan Nuclear Policy: 'पाकिस्तानचा अणुबॉम्ब फक्त भारतासाठीच!' अण्वस्त्र धोरणावरुन नजम सेठींचा खळबळजनक दावा; पाकिस्तानी पत्रकारानं उघडलं देशाचं गुपित

VIDEO: रिझवानची लाजच काढली! नॉट आऊट असूनही मैदानाबाहेर जावं लागलं! व्हिडिओ व्हायरल

Viral Video: बड्या नेत्याचा साधेपणा की राजकीय स्टंट? खासदारसाहेब बनले 'डिलिव्हरी बॉय', ब्लिंकिटचा युनिफॉर्म घालून घरोघरी पोहोचवलं पार्सल

SCROLL FOR NEXT