Bigg Boss 17  Dainik Gomantak
मनोरंजन

Bigg Boss 17 Promo: अन् गेम पलटला ! चार सदस्यांना मिळाला महत्वाचा अधिकार

Bigg Boss 17 Promo: आता ग्रँड फिनालेला काही वेळ शिल्लक असताना बिग बॉसने नॉमिनेशनसाठी एक टास्क आयोजित केला आहे.

दैनिक गोमन्तक

Bigg Boss 17 Promo: बिग बॉसच्या घरात नेहमीच काहीतरी नवीन घडताना दिसते. सतत ट्विस्ट अँड टर्न्स पाहायला मिळतात. आता ग्रँड फिनालेला काही वेळ शिल्लक असताना बिग बॉसने नॉमिनेशनसाठी एक टास्क आयोजित केला आहे.

या टास्कसाठी दोन टीम करण्यात आल्या आहेत. त्यापैकी एक टीम अभिषेक, अरुण, मन्नारा आणि मुनव्वर यांची आहे. तर दुसरी टीम ईशा, अंकिता, विकी आणि आएशा यांची आहे. टीम ए ने 16 जानेवारीच्या एपिसोडमध्ये परफॉर्म केलेले पाहायला मिळाले. त्यांच्यावर मिठ-मिरचीपासून ते स्प्रे-तेलापर्यंत सर्व काही टाकण्यात आले पण त्यांनी केलेल्या परफॉर्मन्सवर प्रेक्षक खूष झाले आहेत.

दुसऱ्या दिवशी टीम बी ची वेळ होती, त्याआधी या गटातील स्पर्धकांनी घरातील सर्व बकेट, मिरची पावडर आणि इतर असे सर्व साहित्य लपवून ठेवले ज्याचा वापर त्यांनी टीम ए मधील सदस्यांच्या विरुद्ध केला होता. यावरुन विकी आणि मुनव्वर यांच्यात भांडणेदेखील पाहायला मिळाली आहेत.

बिग बॉसने टीम A ला आर्काइव्ह रूममध्ये बोलावले. तिथे विकीची टीम घरातील सर्व मसाले कसे लपवून ठेवते हे दाखवण्यात आले आहे. या लोकांची पाळी येण्यापूर्वी मिरची आणि मसाले लपवताना दिसल्याचे सांगितले जाते. अंतिम फेरीच्या अगदी जवळ, हा निव्वळ अन्याय आहे. आणि पूर्णपणे अस्वीकार्य असल्याचे बिग बॉसनेदेखील म्हटले आहे. फुटेज पाहिल्यानंतर मुनव्वर म्हणाला की, एवढी भीती होती तर या लोकांनी असे का केले?

आता प्रोमोमध्ये दाखवल्याप्रमाणे बिग बॉस टीम ए कडे निर्णय घेण्याचा अधिकार देतात. आता टीम ए टीम बीने खेळावी अशी मागणी करणार की नॉमिनेशन टास्क खेळण्यासाठी प्रवृत्त करणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT