Big Boss set to roll out its OTT version Twitter/@BBReviewer_5
मनोरंजन

Big Boss OTT लाँचसाठी काहीच तास शिल्लक

बिग बॉसचे (Big Boss) नवीन सीजन पाहण्यासाठी प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.यावेळेस बिग बॉस ओटीटी (Big Boss OTT) प्लॅटफॉर्म वर येणार आहे

दैनिक गोमन्तक

बिग बॉसचे (Big Boss) नवीन सीजन पाहण्यासाठी प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.यावेळेस बिग बॉस ओटीटी (Big Boss OTT) प्लॅटफॉर्म वर येणार आहे आणि बिग बॉस ओटीटी लाँच होण्यासाठी फक्त काही तास शिल्लक आहेत आणि आता प्रेक्षक या शोची आतुरतेने वाट पाहत आहेत. यावेळी करण जोहर (Karan Johar) बिग बॉसच्या या शोचे सूत्रसंचालन करणार आहे.शोच्या प्रीमियरसाठी भव्य तयारीही करण्यात आली आहे. बिग बॉस ओटीटीच्या प्रीमियरमध्ये मलायका अरोराही (Malaika Arora) तिच्या स्टाईलची जादू पसरवण्यासाठी सज्ज आहे. वास्तविक, शोचा एक नवीन प्रोमो समोर आला आहे ज्यात मलायका अरोरा 'मिमी' चित्रपटातील परम सुंदरी गाण्यावर नाचताना दिसत आहे.(Big Boss set to roll out its OTT version)

आता हा व्हिडीओ पाहून प्रत्येकजण त्याच्या स्टाईलचे वेडे होत आहेत . मलायका अरोरा जेव्हा जेव्हा पडद्यावर येते तेव्हा तिच्या सौंदर्यापुढे प्रत्येकजण घायाळ होती , तर मलायकाचे टीव्हीवरही खूप नाव आहे. आता बिग बॉस OTT देखील मलायकाच्या नृत्याने सुरू होत असलयाने प्रेक्षकांना ही एक पर्वणीच असणार आहे.

नुकतेच करण जोहरने या शोचा प्रोमो व्हिडिओ देखील रिलीज केला आहे. या व्हिडिओमध्ये तो प्रेक्षकांना कभी खुशी कभी गम च्या पार्श्वसंगीताने घराची झलक देत होता. करण जोहर पहिल्यांदाच बिग बॉस हा शो होस्ट करणार आहे.बिग बॉस ओटीटी मागील सर्व सीझनपेक्षा वेगळे असणार आहे. चाहते बिग बॉस ओटीटी 24 तास पाहू शकतील. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हा शो पूर्वीपेक्षा जास्त बोल्ड आणि अधिक धमाकेदार बनवला गेला आहे.

बिग बॉसमध्ये नेमके कोण सेलिब्रिटी या बिग बॉसच्या घरात असणार आहेत हेही सर्वांना जाणून घ्यायची इचछा असतेच तर तो ही प्रश्न आता सुटला आहे कारण यावेळी बिग बॉसमध्ये रिद्धिमा पंडित, करण नाथ, जीशान खान, नेहा भसीन, अक्षरा सिंह सारखे सेलेब्स शो मध्ये घराचे सदस्य बनतील. हा शो 8 ऑगस्ट रोजी डिजिटल प्लॅटफॉर्मवर रिलीज होईल. आता हा शो प्रेक्षकांच्या अपेक्षा पूर्ण करतो आणि प्रेक्षक करण जोहरला बिग बॉसचे होस्ट म्हणून किती पसंत करतात हे पाहणेही तितकेच महत्वाचे ठरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Village Tourism: "आम्हाला प्रकल्प हवाच!" सुर्ला ग्रामस्थांकडून इको-टुरिझमचे स्वागत; शासनाच्या प्रकल्पाला ग्रामसभेचा पाठिंबा

TCS Layoff: मोठी बातमी! टीसीएस देणार 12,000 जणांना नारळ; सीईओ म्हणाले, 'भविष्यासाठी गरजेच...'

Goa Live News: नागपंचमीसाठी नागोबा सज्ज

Bison In Sawantwadi: एक, दोन नव्हे… थेट 15 गवारेड्यांचा धुमाकूळ! लोकांना फुटला घाम, पाहा थरकाप उडवणारा VIDEO

तुम्हालाही विनाकारण राग येतोय? सावधान! असू शकते रक्तातील साखरेच्या बदलांचे लक्षण, 'या' गोष्टी ठेवा लक्षात

SCROLL FOR NEXT