Bhuvan Bam  Dainik Gomantak
मनोरंजन

Rafta Rafta Trailor Release :भुवन बाम- सृष्टी गांगुलीच्या आगामी शो 'रफ्ता रफ्ता'चा टीजर रिलीज..

अभिनेता भुवन बाम आणि सृष्टी गांगुलीच्या 'रफ्ता रफ्ता'चं टीजर रिलीज झालं आहे.

Rahul sadolikar

Bhuvan Bam's New Show : भुवन बाम(Bhuvan Bam) आणि सृष्टी गांगुली रिंदानी(Srishti Ganguli Rindani) .यांच्या प्रमुख भूमीका असणार अमेझॉन मिनी टीव्हीचा आगामी शो 'रफ्ता रफ्ता'चा टीझर झाला नुकताच प्रसिद्ध झाला आहे

हा टिजर अमेझॉनच्या मोफत व्हिडिओ स्ट्रीमिंग सेवेने हा टीझर प्रदर्शित केला आहे. या टिव्ही शो मध्ये डिजिटल सेन्सेशन भुवन बामसोबत अभिनेत्री सृष्टी गांगुली रिंदानी मुख्य भूमीकेत पाहायला मिळेल. या टीजरमध्ये न्यूली मॅरीड कपल करन आणि नित्या यांच्या आयुष्याची झलक दिसते.

नुकत्याच प्रदर्शित झालेल्या टीझरमध्ये हे जोडपे ब्रेकफास्ट दरम्यान एकमेकांच्या सहवासाचा आनंद घेत असल्याचं दिसतं. पुढे याच्यात कॉमेडी ऑफ एरर्स होत राहते. सात एपीसोडची ही सिरीज दैनंदिन समस्या दाखवत एक आकर्षक, विलक्षण आणि मजेदार अनुभव देणार हे नक्की.

यावर बोलताना भुवन बाम म्हणाले, "मी मध्यमवर्गीय कुटुंबात लहानाचा मोठा झालो आणि लग्नाकडे पाहण्याचा दृष्टिकोन गेल्या काही वर्षांत ज्ञात आणि अज्ञात कारणांमुळे खूप बदलला आहे. रोमँटिक ड्रामा उलगडणारा सर्व कंटेंट यात आहे.

पुढे भुवन म्हणाला 'रफ्ता रफ्ता'मध्ये काही प्रसंगी अनपेक्षित वळण घेऊन आधुनिक लग्मसंस्थेतल्या बारीक गोष्टी टिपण्याचा प्रयत्न केला आहे. अमेझॉन मिनी टीव्ही (Amazon MiniTV) आमचा स्ट्रीमिंग पार्टनर असल्याने आम्हाला आनंद होत आहे कारण आमचा कंटेंट संपूर्ण भारतातील प्रेक्षकांसाठी विनामूल्य उपलब्ध असेल."

'रफ्ता रफ्ता'ही एक ट्विस्ट असलेली रॉमेडी असून, भुवन बामचा आधीचा कंटेंट बघता प्रेक्षकांमध्ये या सिरीजची उत्सुकता वाढणार हे नक्की.'रफ्ता रफ्ता'ही सिरीज २५ जानेवारी रोजी अमेझॉन मिनी टीव्हीवर प्रदर्शित होण्यासाठी सज्ज आहे

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Damu Naik: काही नेत्यांना ‘प्रसिद्धी स्टंट’ची सवय! दामूंचा भाजप आमदारांना घरचा आहेर; लोबोंवरही निशाणा

Vijai Sardesai: MPA ची दादागिरी, प्रदूषण वाढलेय! विजय सरदेसाईंचा आरोप; ‘जनता दरबार’मध्ये ऐकल्या समस्या

Goa Politics: खरी कुजबुज; पोलिसांचे फोन टॅपिंग?

GST Council: ‘एक देश एक कर’ला बळकटी देणे गरजेचे! दिल्लीत ‘जीएसटी’ परिषदेच्या बैठकीत CM सावंतांचे प्रतिपादन

Goa Liquor Smuggling: गोव्यातून गुजरातला दारुतस्करी! 1.43 कोटींचा मद्यसाठा जप्त; पिसुर्लेतील डिस्टिलरी सील, 9 जण अटकेत

SCROLL FOR NEXT