Bhupinder Singh Dainik Gomantak
मनोरंजन

Singer Bhupinder Singh Died: प्रसिद्ध गझल गायक भूपिंदर सिंग यांचे निधन

Singer Bhupinder Singh: प्रसिद्ध गझल गायक भूपिंदर सिंग यांचे निधन झाले आहे.

दैनिक गोमन्तक

Singer Bhupinder Singh Died: प्रसिद्ध गझल गायक भूपिंदर सिंग यांचे निधन झाले आहे. मुंबईतील क्रिटी केअर रुग्णालयात त्यांचे निधन झाले. ते बऱ्याच दिवसांपासून आजारी होते. वयाच्या 82 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पत्नी मिताली सिंग यांनी याला दुजोरा दिला आहे. त्या म्हणाल्या की "त्यांना काही काळापासून लघवीच्या समस्यांसह अनेक आरोग्यविषयक समस्यांमुळे त्रास होत होता". त्याचवेळी क्रिटी केअर हॉस्पिटलचे डॉ दीपक नामजोशी यांनी एबीपी न्यूजला सांगितले की, भूपिंदर सिंग यांना 10 दिवसांपूर्वी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

दरम्यान, डॉक्टरांनी सांगितले की, तपासादरम्यान त्यांना कोलन कॅन्सर झाला असल्याचा संशय होता. स्कॅनिंगमध्ये कॅन्सरची (Cancer) शक्यता दिसली होती. त्यांना कोरोनाचीही (Corona) लागण झाली होती.

प्रसिद्ध भारतीय संगीतकार

भूपिंदर सिंग हे प्रसिद्ध भारतीय संगीतकार होते. मुख्यतः ते गझल गायक होते. त्यांनी अनेक हिंदी चित्रपटांमध्ये पार्श्वगायन केले. भूपिंदर सिंग यांनी लहानपणीच त्यांच्या वडिलांकडून संगीताचे शिक्षण घेतले. जे स्वतः संगीतकार होते. नंतर ते दिल्लीला गेले जिथे त्यांनी ऑल इंडिया रेडिओसाठी गायक आणि गिटार वादक म्हणून काम केले. संगीतकार मदन मोहन यांनी त्यांना 1964 मध्ये पहिला मोठा ब्रेक दिला.

किशोर कुमार-मोहम्मद रफी यांच्यासोबत गायलेली गाणी

त्यांनी किशोर कुमार आणि मुहम्मद रफी यांच्यासोबत काही लोकप्रिय युगल गाणी गायली आहेत. भूपिंदर सिंग यांना मौसम, सत्ता पे सत्ता, आहिस्ता आहिस्ता, दूरियां, हकीकत आणि इतर अनेक चित्रपटांमधील त्यांच्या संस्मरणीय गाण्यांसाठी लक्षात ठेवले जाते. 'होके मजबूर मुझे, उससे बुला होगा', (मोहम्मद रफी, तलत महमूद आणि मन्ना डे यांच्यासोबत), 'दिल धुंदता है', 'दुकी पे दुकी हो या सत्ता पे सत्ता', (अनेक गायक) आणि अनेक आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: गोव्यानं नोंदवला सलग चौथा विजय; मोहितच्या गोलंदाजीसमोर मिझोरामचा संघ ढेर!

Rajbagh Beach: राजबाग किनाऱ्याने घेतला 'मोकळा श्वास'! पर्यटन खात्याकडून सात बेकायदेशीर बांधकामे उद्ध्वस्त

Goa Onion Rates: कांद्याने आणले डोळ्यात पाणी! नासाडीमुळे दोन दिवसात दरांमध्ये तब्बल २० रुपयांनी वाढ, जाणून घ्या सध्याचा भाव

Margao News: स्वच्छतेसंदर्भात मडगाव पालिकेचा महत्त्वाचा निर्णय; या कारणासाठी नागरिक, पर्यटकांकडून वसूल केला जाईल दंड

Cash For Job Scam: प्रिया यादवचा आणखी एक कारनामा उघड; डिचोलीतील चार बहिणींना घातला 80 लाखांना गंडा

SCROLL FOR NEXT