Laal Singh Chaddha
Laal Singh ChaddhaDainik Gomantak

आमिर खानच्या 'लाल सिंग चड्ढा'चा ट्रेलर होणार खास दिवशी रिलीज

'लाल सिंग चड्ढा' चित्रपट यावर्षी 11ऑगस्टला रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे.
Published on

बॉलिवूड अभिनेता आमिर खानच्या 'लाल सिंग चड्ढा' या कॉमेडी-ड्रामा चित्रपटाची चाहते खूप दिवसांपासून वाट पाहत आहेत. हा चित्रपट यावर्षी 11 ऑगस्टला रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे. अभिनेता आणि मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये कोणतीही कसर सोडू इच्छित नाही. (Amir Khan's Laal Singh Chaddha movie trailer to be released on IPL finale)

Laal Singh Chaddha
Hina Khan in Cannes 2022 : फ्रान्सच्या रस्त्यांवर हिना खानच्या दिलखेचक अदा!

चित्रपटाच्या ट्रेलर रिलीजच्या संदर्भात खानने एक नवीन कल्पना मांडली आहे. आमिर खान आयपीएल 2022 च्या फिनालेला 'लाल सिंह चड्ढा' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करणार असल्याचे बोलले जात आहे. अंतिम सामना 29 मे 2022 रोजी होणार आहे. ही बातमी ऐकून चाहते खूप उत्साहित झाले आहेत.

Laal Singh Chaddha
दीपिका पदुकोणच्या नेकनेलसची रंगलीये चर्चा, किंमत ऐकून व्हाल थक्क

पिंकविलाच्या माहितीनुसार, 'लाल सिंह चड्ढा'चा ट्रेलर 29 मे रोजी रिलीज होणार आहे. याच दिवशी आयपीएलचा अंतिम सामना देखील आहे. निर्माते आणि आमिर खान यांनी एकत्र येऊन सिनेमा आणि क्रिकेटच्या चाहत्यांना आश्चर्यचकित करण्याचा निर्णय घेतला आहे.

मार्केटिंग आणि जाहिरातींच्या जगात प्रथमच प्रेक्षक अशा प्रचारात्मक क्रियाकलाप पाहतील आणि त्यांचा आनंद घेतील. मिळालेल्या माहितीनुसार, हा ट्रेलर स्टार स्पोर्ट्स चॅनेलवर दाखवला जाणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com