Bhumiputra Movie  Dainik Gomantak
मनोरंजन

गोव्यातील गावकऱ्यांची व्यथा मांडणारा 'भूमिपुत्र'

लोकप्रिय असलेल्या तौसिफ द नावेली यांनी सध्या गाजत असलेल्या भूमिपुत्र विधेयकावर आधारित ‘भूमिपुत्र’ हा चित्रपट प्रदर्शित झाला असून सद्या तो गोव्यात चांगलाच गाजत आहे.

Rohit Hegade

भूमिपुत्र (Bhumiputra) या प्रकाराला गोव्यात जनमानसाचा आरसा मानला जातो. सध्या कोविडमुळे (Covid 19 ) तियात्र थोडा मागे पडला असला तरी त्याची जागा कोंकणी (Konkani) फिल्म्सनी घेतलेली आहे. तियात्र वर्तुळातील थोडासा वादग्रस्त; पण तरीही लोकप्रिय असलेल्या तौसिफ द नावेली यांनी सध्या गाजत असलेल्या भूमिपुत्र विधेयकावर आधारित ‘भूमिपुत्र’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या फिल्ममध्ये आघाडीच्या कलाकारां बरोबर राजकीय(Political) आणि सामाजिक (Social) क्षेत्रात सक्रिय असलेल्या ऐश्वर्या, तारा केरकर, फातोर्डा काँग्रेसचे (Congress) चिदंबर यांचाही समावेश आहे. काही वर्षांपूर्वी याच तौसिफने हिंदुत्ववादी शक्तींना विरोध करणारा ‘आकांतवादी गोयांत नाका’ हा तियात्र आणून स्वतःवर खटलाही ओढवून घेतला होता. आता हा भूमिपुत्र आणून काय ते ओढवून घेतात ते पाहावे लागेल!

दरम्यान, या विधेयकाला गावकऱ्यांचा विरोध करत सरकार विरोधात आंदोलनाचा पवित्रा घेतला. त्यानंतर सरकारने विधानसभेत संमत केलेले गोवा भूमिपुत्र अधिकारणी विधेयक रद्द करावे, अशी गावकऱ्यांनी मागणी केली. पूर्ण जमीनची मालकी मिळण्यासाठी सरकारने खरे तर विधेयक आणण्याची गरज आहे. पण त्याकडे दुर्लक्ष केल्‍याने गावकऱ्यांनी नाराजी व्‍यक्त केली.

भूमी असून आम्ही भूमिहीन, असा जप आता येथील मराठे गावकरी करीत होते. एका बाजूने सरकार दुसऱ्यांच्या जमिनीवर बेकायदेशीर कब्जा करून राहत असलेल्यांना भूमिपुत्र (Bhumiputra) ठरवून भूमिपुत्र अधिकारिणी कायद्याने अधिकार देण्याचा कायदा करीत आहे. तर दुसऱ्या बाजूने ज्यांची हक्काची भूमी जी पोर्तुगिजांविरुद्ध बंड करून हिसकावून घेतली, त्या भूमीची मालकी आजही कोर्ट रिसिव्हरकडे ठेवली आहे. स्वत:च्याच जमिनीवर कुंकळ्ळीचे गावकरी परके झाले आहेत. भूमिहीन तर बळकावलेल्या जमिनीचे मालक भूमिपुत्र? वा रे सरकार....

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

South Africa Mass Shooting: दक्षिण आफ्रिकेत रक्ताचा सडा...! 3 चिमुरड्यांसह 11 जणांचा मृत्यू; जोहान्सबर्गमध्ये अज्ञातांकडून अंधाधुंद फायरिंग

Goa Shack Fire: उतोर्डा येथील प्रसिद्ध 'जॅमिंग गोट'ला भीषण आग! पर्यटकांच्या लाडक्या शॅकचे मोठे नुकसान

छत्रपतींच्या आदेशानुसार बाजीराव पेशव्यांनी सरदार रामचंद्र सुखटणकर यांच्या सूचनेवरून 'मंगेशी' गाव मंदिराला दान केले..

Goa Salt Pans: 1964 साली गोव्यात 200 हून अधिक मिठागरे होती आणि आज..?

Goa Live News: साष्टी तालुक्यात वाहतूक पोलिसांचा 'बडगा'

SCROLL FOR NEXT