Bhumi Pednekar Dainik Gomantak
मनोरंजन

Bhumi Pednekar : भूमी पेडणेकरने कुणासोबत केलं लिपलॉक...फोटो झाला व्हायरल

अभिनेत्री भूमी पेडणेकरचा लिप लॉकचा फोटो व्हायरल झाला आहे पण फोटोतील व्यक्ती कोण आहे? हे मात्र समजु शकलं नाही

Rahul sadolikar

Bhumi Pednekar: अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि कियारा अडवाणी यांनी 7 फेब्रुवारीला लग्न केले आणि 12 फेब्रुवारीला त्यांनी मुंबईत एक भव्य रिसेप्शन पार्टी दिली. यामध्ये बी-टाऊनचे सर्व स्टार्स पोहोचले आणि पार्टीला रंग चढला. 

यासोबतच त्यांनी पार्टीच्या जल्लोषात चार चाँदही लावले. इथेच लोकांच्या नजरा अनन्या पांडे आणि आदित्य रॉय कपूरच्या अफेअरवर खिळल्या होत्या. त्याचवेळी भूमी पेडणेकरचे वेगळे दृश्य पाहायला मिळाले.

भूमीने केलेले गुपचूप लिप लॉक कॅमेऱ्यात कैद झाले. आता ती व्यक्ती कोण होती? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल चला पाहुया कोण होता भूमीचा लिप लॉक पा.

कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्राच्या रिसेप्शन पार्टीत भूमी पेडणेकर तिच्याच दुनियेत हरवली होती. तिच्या अंगावर ताऱ्यांनी लपेटलेली ती या खास सोहळ्याची शोभा वाढवत होती. 

सगळेजण पार्टीत बिझी असताना भूमीच्या एका क्लिपने सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली. त्याचं असं झालं की, पार्टीनंतर सगळ्यांप्रमाणे तीही तिच्या घरी निघाली होती.

ती गाडीत बसताच पापाराझींनी तिला घेरले. आणि त्यानंतर काही फोटो आणि व्हिडीओ त्यांच्या हाती लागले.

मात्र, भूमी पेडणेकरसोबत निळ्या कुर्त्यातील एक व्यक्तीही दिसली. यानंतर बॉडीगार्डने पापाराझीच्या कॅमेऱ्याला हात लावण्याचा प्रयत्न केला जेणेकरून तो काहीही टिपू नये. पण असे झाले नाही. 

तितक्यात भूमी गाडीत बसायला गेली. तसेच त्या व्यक्तीचे आणि भूमीचे लिपलॉक झाले आणि तेच कॅमेऱ्यात कैद झाले. यानंतर हा व्हिडिओ व्हायरल झाला.

भूमी पेडणेकरने ज्याला किस केले, त्याचे नाव यश कटारिया आहे. तो व्यवसायाने व्यापारी आहे. या दोघांचे एकत्र अनेक फोटोही समोर आले आहेत. यश हा भूमीचा बॉयफ्रेंड असल्याचं म्हटलं जातं पण हे खरं आहे की अफवा आहे हे अजुन समजले नाही.

 हे दोघे रिलेशनशिपमध्ये आहेत की नाही हे माहीत नसले तरी ज्या पद्धतीने हा व्हिडिओ समोर आला आहे, त्यावरून त्यांच्यामध्ये काहीतरी शिजत आहे, याचाच सुगंध आता समोर येत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sanquelim Ganja Seizure: पोलिसांना टीप मिळाली, निळी पिशवी उघडल्यावर विस्फारले डोळे; साखळीत मोठी कारवाई, गांजाचा साठा जप्त

Goa Crime: शेळ्यांच्या वादातून डोक्यावर, छातीवर केला चाकूने वार; 8 वर्षानंतर आरोपीला शिक्षा, 18 दिवसांचा कारावास

Sand Mining: वाळू उपसा प्रश्‍न! जीसीझेडएमएला 50 हजारांचा दंड; उत्तर सादर न केल्याने एनजीटीची कारवाई

Ind Vs NZ T20: 5व्या सामन्यापूर्वी मोठी बातमी! सॅमसनसाठी अखेरची संधी? वरुण चक्रवर्तीबाबतही संदिग्धता

Nayudy Trophy: 23 चौकार, 6 षटकार! गोव्याविरुद्ध दिवसात ठोकले द्विशतक; पंजाबचा धावांचा डोंगर

SCROLL FOR NEXT