Leena Manimekalai Dainik Gomantak
मनोरंजन

Kaali Poster Controversy: लीना मनिमेकलाई यांच्या विरोधात लुकआउट नोटीस जारी

'काली' चित्रपटाच्या दिग्दर्शिका लीना मनिमेकलाई यांच्याविरोधात लुकआउट नोटीस जारी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

दैनिक गोमन्तक

Kaali Poster Controversy: 'काली' चित्रपटाच्या दिग्दर्शिका लीना मनिमेकलाई यांच्याविरोधात लुकआउट नोटीस जारी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानंतर आता लीना मणिमेकलाई यांच्या अडचणी वाढू शकतात. मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी या संदर्भात केंद्र सरकारला पत्र लिहून लीना यांच्या विरोधात लुकआउट नोटीस जारी करण्याची परवानगी देण्याचे आवाहन केले होते.

दरम्यान, एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, भोपाळ (Bhopal) पोलिसांनी लीना यांच्याविरुद्ध लुकआउट नोटीस जारी करण्याचे आदेश दिले आहेत. 'काली' चित्रपटाला केंद्रीय गृहमंत्रालयाने परवानगी दिल्यानंतर संचालकांविरोधात लुकआऊट नोटीस जारी करण्यात आली. लुकआउट नोटीसशी संबंधित अर्ज केंद्र सरकारला (Central Government) पाठवण्यात आला होता.

याआधी शिवराज सरकारचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा म्हणाले होते, 'लीना यांच्याविरुध्द लुकआउट सर्कुलर जारी केले जाईल. आम्ही केंद्र सरकारला पत्र लिहून चित्रपट निर्मात्या लीना मनिमेकलाई यांच्या विरोधात लुकआउट सर्कुलर (LOC) जारी करण्याची विनंती करणार आहोत. त्या जे काही करत आहे, ते मुद्दाम करत आहेत, असं वाटतं. त्यांच्या पोस्टमुळे धार्मिक भावना दुखावल्या जात असल्याचंही मी ट्विटरमध्ये म्हटलं आहे. मी त्यांना त्यांच्या बाजूने ते बंद करण्यास सांगेन.'

दुसरीकडे, शिवराज सरकारने याप्रकरणी सुरुवातीपासूनच लीना मणिमेकलाई यांच्या विरोधात कठोर भूमिका घेतली होती. लीना यांच्याविरुद्ध मध्यप्रदेशात स्वतंत्ररित्या गुन्हेही दाखल आहेत. सीएम शिवराज सिंह चौहान (Shivraj Singh Chouhan) यांनी स्वतः काली मातेचा अपमान सहन केला जाणार नाही, असे म्हटले होते.

लुकआउट नोटीस म्हणजे काय

सामान्यत: लुकआउट नोटीस हे एक प्रकारचे परिपत्रक आहे, जे अधिकार्‍यांद्वारा गुन्हेगारी प्रकरणात नाव असलेल्या व्यक्तीने देश सोडून पळून जाऊ नये याची खात्री करण्यासाठी जारी केले जाते. एलओसी जारी केली जाते, जेव्हा एखादी व्यक्ती त्याच्याविरुद्ध नोंदवलेल्या एखाद्या विशिष्ट प्रकरणात फरार असते. गुन्हेगारी प्रकरणातील व्यक्ती देश सोडून पळून जाण्याची भीती असते. इतर काही प्रकरणांमध्ये, एखाद्या व्यक्तीच्या देशाबाहेरच्या हालचालींवर निर्बंध घालण्यासाठी पोलीस त्याचा वापर करतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job प्रकरणातील तक्रारदारांचे मोबाईल जप्त केल्‍याचा दावा; संशयितांचे कॉल डिटेल्स, लोकेशन्‍स जाहीर करण्याचे मुख्यमंत्र्यांना आव्हान

Anjuna Villagers Protest: हणजुणेत स्थानिक आक्रमक! मेगा इव्हेंट्सविरोधात धरणे आंदोलन; ध्वनी प्रदूषणाविरोधी झळकावले फलक

Calangute: दारुच्या नशेत टाईट पर्यटकाचा कळंगुटमध्ये राडा; नग्न होऊन रस्त्यात झोपला, टॅक्सीवर उभारला

Rashi Bhavishya 23 November 2024: नोकरीत बढतीची संधी अन् बेरोजगारांनाही दिलासा... 'या' दोन राशींच्या लोकांचा विशेष दिवस!

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

SCROLL FOR NEXT