Akshay Kumar's upcoming movie Bell bottom Trailer  Dainik Gomantak
मनोरंजन

Bell Bottom: अक्षय कुमारच्या बहुप्रतिक्षीत चित्रपटाचा ट्रेलर रिलीझ

दैनिक गोमन्तक

अक्षय कुमारच्या (Akshay Kumar) 'बेलबॉटम' चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. आवडता सुपरस्टार अक्षय कुमार 'बेलबॉटम' चित्रपट या चित्रपट घेऊन आल्याने चाहते आनंदी झाले आहेत. या चित्रपटात पुन्हा एकदा अक्षय कुमार एका मिशनवर असुन आणि देशासाठी लढताना दिसत आहे. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये देशभक्ती आणि त्यासंबंधीतचे दृष्य दिसुन येता आहेत. अशाप्रकारे अक्षय कुमार पुन्हा एकदा जोरदार अ‍ॅक्शन मोडमध्ये आलेला दिसतोय. बेलबॉटमचा ट्रेलर रिलीज होताच सोशल मीडियावर हा चर्चेचा बनला आहे. स्पायची थ्रिलर स्टोरी असणारा हा चित्रपट 2 डी तसेच 3 डी स्वरूपात रिलीज होईल. प्रेक्षकांसाठी या चित्रपटाचा 3-डी अनुभव खूपच रोमांचकारक असणार आहे. (Bell Bottom: Trailer of Akshay Kumar's movie has been released.)

कोरोना महामारीच्या संकटानंतर पडलेल्या मोठ्या गॅपनंतर अक्षय कुमारचा हा पहिला चित्रपट आहे, जो चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाच्या टीझरने आधीच चाहत्यांवर मोठा प्रभाव टाकला असुन चाहत्यांना चित्रपटगृहांमध्ये चित्रपट पाहण्यासाठी चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

अक्षय कुमार दिग्दर्शित चित्रपटात हे चेहरे दिसणार आहेत

अक्षय कुमारसोबतच या चित्रपटात वाणी कपूर, लारा दत्ता आणि हुमा कुरेशी हे देखील दिसणार आहेत आणि रणजीत एम तिवारी यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. पूजा एंटरटेनमेंट प्रस्तुत एम्मी एंटरटेनमेंटचा 'बेलबॉटम'चे वाशु भगनानी, जॅकी भगनानी, दीपशिखा देशमुख, मोनिषा अडवाणी, मधु भोजवानी आणि निखिल अडवाणी हे निर्माते आहेत. असीम अरोरा आणि परवेज शेख लिखित 'बेलबॉटम' 19 ऑगस्ट 2021 रोजी रिलीज होणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

बॉलीवूड, टॉलीवूडचा प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक जानी मास्टरला गोव्यात अटक, सहकारी महिलेचा 6 वर्षापासून लैंगिक छळ केल्याचा आरोप

Ratnagiri Crime News: स्वप्नात दिसला मृतदेह, सिंधुदुर्गातील तरुण पोहोचला पोलीस ठाण्यात; तपासात उघड झाली धक्कादायक माहिती

तम्नार प्रकल्प रखडणार! कर्नाटकचे शेपूट वाकडेच, सिद्धरामय्यांनी कळसा-भांडुराचा मुद्दा केला उपस्थित

रस्त्यांच्या अवस्थेवरुन काँग्रेस आक्रमक; दहा दिवसांत काम सुरु न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा

फोंड्यात 'हेडा गॅब्लर'चा प्रयोग; 125 वर्षापूर्वी लिहलेले नोर्वेजियन नाटककाराचे नाटक पाहण्याची संधी

SCROLL FOR NEXT