'बिईंग शॅरलॉक' Dainik Gomantak
मनोरंजन

बिईंग शॅरलॉकला यूट्यूबवर भरघोस प्रतिसाद

बिईंग शॅरलॉक या लघुपटाची सुरुवात अत्यंत आकर्षक आहे.

दैनिक गोमन्तक

दिग्दर्शक रामप्रसाद आडपईकर यांचा ‘बिईंग शॅरलॉक’ हा मजेशीर लघुपट दोन दिवसांपूर्वीच युट्युबवर (You Tube) रिलीज झाला आहे. ‘शॅरलॉक’ (Sherlock) अनेकांच्या मनात दडून असतो. काल्पनिक पात्र असले तरी प्रमाणे खऱ्या आयुष्यातही आपण काही अवघड कोडी सोडवून दाखवावीत अशी सुप्त इच्छा अनेकांच्या मनात असते. मात्र जेव्हा ‘शॅरलॉक’ फॉर्म्युला वापरून आपण एखाद्याची मदत करायचे ठरवतो तेव्हा भलत्याच रांगड्यात सापडल्याचा अनुभव येतो.

रामप्रसाद म्हणतो, त्यालाही लहानपणी ‘शॅरलॉक’ बद्दल एक प्रकारचे आकर्षण होतेच. त्या आकर्षणाची परिणती अशाप्रकारे त्याच्या ‘बिईंग शॅरलॉक’ (Being Sherlock) या लघुपटाच्या निर्मितीद्वारे झाली आहे. खरं म्हणजे कोविडकाळातला (Corona) एक प्रयोग म्हणून ही निर्मिती झाली. रामप्रसादला वाटत होतं की कदाचित हा लघुपट लोकांना नीटपणे समजणार नाही.

कारण ‘पाहता-पाहता विचार करणे’ हेदेखील हा लघुपट (Short Film) पाहताना प्रेक्षकांकडून अपेक्षीत होते, जे सहसा होत नसते. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे युट्यूबवर आलेल्या प्रतिसादावरून लोकांना हा चित्रपट (Movie) आवडल्याचे दिसते आहे. रामप्रसादला हे देखील अनपेक्षित होते. या लघुपटाची सुरुवात अत्यंत आकर्षक आहे. त्यामुळे अगदी सुरुवातीपासूनच हा लघुपट प्रेक्षकांच्या मनाची पकड घेतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

Pandharpur Wari: 1566 साली लोक जुने गोवेतील रस्त्यांतून, अभंग म्हणत वारीला जात असल्याची नोंद आहे..

Goa LPG Advisory: एलपीजी ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; गोवा सरकारकडून अ‍ॅडवायझरी जारी

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

SCROLL FOR NEXT