Alia Bhatt Vicky Kaushal Katrina Kaif Dainik Gomantak
मनोरंजन

KWK7: VicKatच्या लग्नाबाबत आलिया भट्टचा मोठा खुलासा, म्हणाली 'तुझ्या लग्नात आम्हाला...'

करण जोहरने खुलासा केला की, विकी आणि कतरिनाच्या लग्नाआधी करण आणि आलिया भट्ट यांनी कतरिनाला दारूच्या नशेमध्ये फोन केला होता.

दैनिक गोमन्तक

विकी कौशल (Vicky Kaushal) आणि सिद्धार्थ मल्होत्रा ​(Sidharth Malhotra) ​डिस्नी प्लस हॉटस्टारवरील कॉफी विथ करण सीझन 7 च्या नवीन भागात दिसून आले आहेत. विकी आणि कतरिना कैफच्या लग्नाच्या डिटेल्स आतापर्यंत लोकांसमोर आलेल्या नाहीत. या लग्नाच्या अनेक बातम्या राजस्थानच्या सवाई माधोपूरमध्ये झाल्या, पण प्रत्यक्षात या लग्नात काय होतं, याचा खुलासा विकीने या शोमध्ये केला आहे. या सगळ्या दरम्यान करण जोहरने (Karan Johar) असा खुलासा केला की, विकी आणि कतरिनाच्या लग्नाआधी करण जोहर आणि आलिया भट्ट यांनीही कतरिनाला दारूच्या नशेमध्ये फोन केला होता. (Before Vicky Kaushal and Katrina Kaif wedding Alia Bhatt called Katrina while drunk)

करण-आलियाने कतरिनाला नशेमध्ये म्हटले होते,

करण जोहरने या शोमध्ये सांगितले की, विकी-कतरिनाच्या लग्नाआधी आलिया आणि मी कतरिनाला नशेत फोन केला होता. करण जोहर पुढे म्हणाला की, 'तुझ्या लग्नात आम्हाला आमंत्रण दिले नव्हते, आलिया आणि मी तिला नशेत म्हटले होते. आम्ही दिल्लीत शूटिंग करत होतो, वाईन पीत होतो आणि तारे बघत होतो मग आम्ही विचार केला की कोणाला कॉल करायचा आणि आम्ही विकी-कतरिनाला फोन केला आणि म्हणालो, आम्ही तुमच्यासाठी खूप आनंदी आहोत तसेच. करण पुढे म्हणाला की तुम्हाला माहिती आहे की मला आणि आलिया दोघांनाही कतरिना खूप आवडते तसेच मी कतरिनाला अनेक वर्षांपासून ओळखतो आणि तिचे लग्न होत होते, त्यामुळे आम्ही खूप भावूक झालो होतो.

कतरिना-रणबीर-आलिया कनेक्शन

कतरिना कैफ आणि आलिया भट्ट खूप चांगल्या मैत्रिणी आहेत इतकेच नाही तर रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये येण्यापूर्वी आलिया आणि कतरिना नेहा धुपियाच्या टॉक शोमध्ये बेस्ट फ्रेंड म्हणून एकत्र दिसल्या होत्या. आलियापूर्वी कतरिना रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती पण रणबीर-आलियाच्या जवळीकनंतर कतरिना-आलिया क्वचितच एकत्र दिसू लागल्या. मात्र, आता कतरिना-विकी आणि रणबीर-आलिया विवाहबंधनात अडकले आहेत.

विकी-कतरिना मीम्सवर खूप हसायचे,

विकी कौशलने करण जोहरच्या या चॅट शोमध्ये खुलासा केला आहे की, 'या सोफ्यावर गेल्या सीझनमध्ये मला पहिल्यांदा कळले की कतरिना कैफ देखील मला ओळखते. नंतर त्याने असा खुलासाही केला की, आम्ही दोघेही आमच्या आयुष्यात पहिल्यांदा झोया अख्तरच्या घरी भेटलो होतो. विकीने शोमध्ये सांगितले की, लग्नादरम्यान दररोज हे फनी मीम्स, ट्विट आणि मेसेज इंटरनेटवर शेअर केले जात होते आणि आम्ही सर्व जागरूक होतो. आमचा मित्रांचा एक ग्रुप देखील आहे, ज्यामध्ये हे सर्व मीम शेअर केले जायचे आणि आम्ही खूप हसायचो देखील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

King Momo 2026: कार्निव्हल 2026 चे बिगुल वाजले! सेड्रिक डी कोस्टा यांची 'किंग मोमो' म्हणून घोषणा

IND vs NZ: विजेच्या वेगाने आला चेंडू अन्... श्रेयस अय्यरच्या 'रॉकेट थ्रो'ने उडवले स्टंप्स; ब्रेसवेलची डायव्हही ठरली अपयशी Watch Video

Viral Video: 'धूम' स्टाईल स्टंट अन् थेट जमिनीवर लोळण! दिल्ली पोलिसांचा रीलवाल्यांना दणका; स्टंटबाजांचं मीम बनवून केलं ट्रोल

IND vs NZ: किवी सलामीवीरांचा धमाका! 27 वर्षांनंतर भारतीय भूमीवर रचला ऐतिहासिक रेकॉर्ड; कॉन्वे आणि निकोल्स जोडीची कमाल

लग्नाला गेले कुटुंब अन् एकटी मुलगी, खिडकीचे ग्रिल कापताना चोरट्यांना रंगेहाथ पकडले; पर्रा येथे दरोड्याचा मोठा डाव फसला

SCROLL FOR NEXT