OTT Release Dainik Gomantak
मनोरंजन

OTT Release : बंबई मेरी जान, स्कॅम 2003... सप्टेंबरमध्ये ओटीटीवर अनुभवा मनोरंजनाचा तडका

Rahul sadolikar

OTT Release in September : आजकाल मनोरंजनासाठी थिएटर्स हाच एकमेव पर्याय राहिलेला नाही. ओटीटीने प्रेक्षकांना कधीही आणि कुठेही मनोरंजनाची चांगली सेवा देत आहे.

थिएटर्सपेक्षा ओटीटी हाच बेस्ट ऑप्शन आहे असं मानणारा एक मोठा प्रेक्षकवर्ग कोरोना महामारीच्या काळात तयार झाला.

कोवीडच्या काळात थिएटर्स बंद असल्याने टेलिव्हीजन आणि ओटीटीने प्रेक्षकांच्या मनोरंजनाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. ओटीटीनेही क्राईम, थ्रिलर,लव्ह अशा वेगवेगळ्या जॉनरच्या चित्रपट आणि वेबसिरीज प्रेक्षकांसाठी आणल्या आहेत.

स्कॅम 2003

सप्टेंबर महिनाही ओटीटी प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची अनोखी मेजवानी देणारा महिना असणार आहे. चला तर पाहुया सप्टेंबरचे हे ओटीटी रिलीज

सप्टेंबर महिन्यात मनोरंजन विश्वात शाहरुख खानच्या 7 सप्टेंबरला रिलीज होणाऱ्या जवानचा बोलबाला असणार आहे. याशिवाय ओटीटीवरही मनोरंजनाचं आश्वासन देणारा हा कंटेटही असणार आहे.

अब्दुल करीम तेलगी भारतात झालेल्या काही घोटाळ्यांमधल्या एका मोठ्या घोटाळ्याचा मास्टरमाईंड होता. हा घोटाळा होता 3000 कोटींचा बनावट स्टँपचा. स्कॅम 2003 ची कथा या सर्वात मोठ्या स्टॅम्प पेपर घोटाळ्याचा उलगडा ही वेबसिरीज करणार आहे.

स्कॅमचे दिग्दर्शन

स्कॅम 2003 ही सिरीज तुषार हिरानंदानी यांनी दिग्दर्शित केली आहे. पत्रकार संजय सिंग यांनी लिहिलेल्या ‘रिपोर्टर की डायरी’ या हिंदी पुस्तकावर आधारित ही सिरीज प्रेक्षकांच्या आवडेल की नाही हे 2 सप्टेंबरला समजेल. पत्रकार संजय सिंह यांनी या 3000 कोटींच्या घोटाळ्याचा छडा लावला होता.

फ्रीलान्सर

नीरज पांडे हा दिग्दर्शक तुम्हाला माहित आहे? बरोबर एम एस धोनी हा त्याचाच चित्रपट. आता हा दिग्दर्शक तुमच्यासाठी नवीन कथा घेऊन आला आहे.

ए वेन्सडे आणि स्पेशल ऑप्स फेम नीरज पांडे दिग्दर्शित, द फ्रीलान्सर ही अविनाश कामथ (मोहित रैना) ची कथा आहे जो सीरियात बंदिवान असलेल्या आलिया खान (कश्मीरा परदेशी) या तरुण मुलीची सुटका करतो. 

अनुपम खेर यांनी या सिरीजमध्ये डॉ खानची भूमिका साकारली आहे. हा शो शिरीष थोरात यांच्या 'अ तिकिट टू सीरिया' या पुस्तकावर आधारित आहे.

लव्ह अगेन

तुम्ही प्रियांका चोप्राचे फॅन असाल तर हा चित्रपट तुमच्यासाठीच आहे. प्रियांका चोप्रा जोनासचा चित्रपट, लव्ह अगेन 2 सप्टेंबर रोजी नेटफ्लिक्सवर रिलीज होईल. तसेच सॅम ह्यूघन आणि सेलिन डिओन यांच्या मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट मीरा नावाच्या एका महिलेची गोष्ट सांगतो.

तिने तिच्या मृत्यू पावलेल्या ज्याच्याशी तिच्या पार्टनरच्या नंबरवर टेक्स्ट मॅसेज पाठवल्यानंतर, तो रॉब (ह्यूघन) नावाच्या व्यक्तीला गेला आहे हे तिला माहीत नाही.  

तो तिच्या मॅसेजमध्ये व्यक्त केलेल्या भावनेने प्रभावित होतो आणि नंतर मीराला प्रत्यक्ष भेटण्यासाठी डिऑनची मदत घेतो. चोप्राचे पती, गायक निक जोनास यांचाही एक कॅमिओ आहे. 

हड्डी

नवाजुद्दीन सिद्दीकीची एक आगळी वेगळी कथा तुम्हाला पाहायची असेल तर 'हड्डी' या चित्रपटाचा पर्याय ओटीटीने तुमच्यासमोर ठेवला आहे.

नवाजुद्दीन सिद्दीकी, रेश लांबा, इला अरुण, मोहम्मद झीशान अय्युब, श्रीधर दुबे आणि अनुराग कश्यप, हड्डी ही एका ट्रान्सजेंडर महिलेच्या सूडाची गोष्ट सांगतो . नवाजचे पात्र अर्थात हड्डी अलाहाबादहून दिल्लीला ट्रान्सजेंडर्सच्या टोळीत सामील होण्यासाठी येतं. गुंडाच्या विरोधात एका ट्रान्सजेंडरने केलेल्या संघर्षाची ही कहानी आहे.

'द मॉर्निंग शो'

द मॉर्निंग शोच्या तिसऱ्या सीझनमध्ये नेटवर्कवरील सायबर हल्ल्यानंतर जेनिफर अॅनिस्टन, रीझ विदरस्पून आणि बिली क्रुडपची पात्रं तुमचं मनोरंजन करताना दिसतील. या हंगामात शोमध्ये सामील झालेला अभिनेता जॉन हॅम टेकने अब्जाधीश पॉल मार्क्सची भूमिका साकारली आहे . 

तो बचावासाठी येतो आणि कोसळणारे नेटवर्क वाचवण्यासाठी पैसे देतो. पण त्याच्या एंट्रीचा UBA न्यूजरूमच्या इकोसिस्टमवर कसा परिणाम होतो हे तिसर्‍या सीझनमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल.

बंबई मेरी जान

10 भागांच्या क्राईम ड्रामामध्ये के के मेनन आणि अविनाश तिवारी मुख्य भूमिकेत आहेत. फरहान अख्तरच्या एक्सेल एंटरटेनमेंटद्वारे निर्मित या शोमध्ये कृतिका कामरा, निवेदिता भट्टाचार्य आणि अमायरा दस्तूर यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. 

स्वातंत्र्योत्तर मुंबईच्या पार्श्वभूमीवर आधारित हा शो चांगलं विरुद्ध वाईट अशी कथा मांडतो. दारा काद्री नावाचा तरुण त्याच्या वडिलांचा वारसा सांभाळताना कसा संघर्ष करतो याची गोष्ट तुम्हाला आवडेल.

काला

शैतान आणि डेव्हिड फेम दिग्दर्शक बेजॉय नांबियार यांनी डिस्ने प्लस हॉटस्टारच्या आगामी मालिका कालामध्ये क्राईम ड्रामामध्ये मनोरंजनाचा तडका प्रेक्षकांसाठी दिला आहे. 

एका प्रेस स्टेटमेंटनुसार, हा शो एका इंटेलिजन्स ब्युरो (IB) अधिकाऱ्याची कथा आणि कालाच्या अंधकारमय दुनियेतील शक्तीचा खेळ आहे.

 या शोमध्ये अभिनेते अविनाश तिवारी, रोहन विनोद मेहरा, निवेथा पेथुराज, ताहेर शब्बीर आणि हितेन तेजवानी तुम्हाला पाहायला मिळेल

सेक्स एज्युकेशन

नेटफ्लिक्सच्या बहुचर्चित सिरीजपैकी एक असणारी सेक्स एज्युकेशन आता चाहत्यांच्या भेटीला आली आहे.

सेक्स एज्युकेशनचा शेवटचा सीझन 21 सप्टेंबर रोजी रिलीज होईल. शोचा तिसरा सीझन ओटिस आणि रुबीचे ब्रेकअप आणि ओटिसच्या आईच्या गरोदरपणाच्या ट्विस्टनंतर संपला होता. 

जाने जा

करीना कपूर खान सुजॉय घोषच्या क्राइम थ्रिलर 'जाने जा' या चित्रपटातून ओटीटी पदार्पणासाठी सज्ज आहे. हा चित्रपट जपानी लेखक केगो हिगाशिनो यांच्या 'डिव्होशन ऑफ सस्पेक्ट एक्स' या पुस्तकावर आधारित आहे. 

यात विजय वर्मा आणि जयदीप अहलावत यांच्याही भूमिका आहेत. तत्पूर्वी, सुजॉय घोष यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, “जाने जा या पुस्तकावर आधारित आहे जे माझ्या आयुष्यावर दीर्घकाळापासून प्रेम करत आहे. 

ज्या दिवसापासून मी डिव्होशन ऑफ सस्पेक्ट एक्स वाचले, तेव्हापासून मला ते चित्रपटात रुपांतरीत करायची होती. मी वाचलेली ती सर्वात आश्चर्यकारक प्रेमकथा होती

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

Fact Check: गोव्यात बोट पलटी होऊन 23 लोकांचा मृत्यू, 64 बेपत्ता; व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

SCROLL FOR NEXT