Kajal Aggarwal Baby Shower Insta
मनोरंजन

Baby Shower: काजल अग्रवालच्या चेहऱ्यावर गरोदरपणाची चमक

काजल अग्रवालने अलीकडेच तिच्या इन्स्टाग्राम आणि इन्स्टा स्टोरीवर तिच्या बेबी शॉवरचे अनेक फोटो शेअर केले आहेत.

दैनिक गोमन्तक

दाक्षिणात्य चित्रपटांसह हिंदी चित्रपटसृष्टीतही आपल्या अभिनयाच्या जोरावर वेगळी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री काजल अग्रवाल (Kajal Aggarwal) सध्या तिच्या गरोदरपणाचा काळ खूप एन्जॉय करत आहे. या वर्षाच्या सुरुवातीला अभिनेत्री काजल अग्रवाल आणि तिचा पती गौतम किचलू यांनी सोशल मीडियाद्वारे त्यांच्या चाहत्यांना आई-वडील झाल्याची गोड बातमी शेअर केली होती. काजल अग्रवाल अनेकदा सोशल मीडियावर बेबी बंपचे फोटो शेअर करत असते. आता अलीकडेच काजल अग्रवालने तिचा नवरा गौतमसोबतचा स्वतःचा एक सुंदर फोटो शेअर केला आहे आणि तिच्या बेबी शॉवरबद्दल चाहत्यांना सांगितले आहे.

काजल अग्रवालचा बेबी शॉवर

काजल अग्रवालने अलीकडेच तिच्या इन्स्टाग्राम आणि इन्स्टा स्टोरीवर तिच्या बेबी शॉवरचे अनेक फोटो शेअर केले आहेत. तिने इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या पहिल्या फोटोमध्ये ती तिच्या पतीसोबत पोज देताना दिसत आहे. हा फोटो शेअर करण्यासोबतच काजलने कॅप्शनमध्ये गोदभराई असे लिहिले. या खास चित्रासोबतच काजल अग्रवालने तिच्या इन्स्टा स्टोरीवर तिच्या कुटुंबीयांसह आणि मित्रांसोबत बेबी शॉवर सेरेमनीमधील अनेक फोटो शेअर केले आहेत.

लाल साडीत खूपच सुंदर दिसत आहे

काजल अग्रवालने तिच्या बेबी शॉवर समारंभासाठी लाल रंगाची स्लीव्हलेस ब्लाउजसह कांजीवरम साडी नेसली होती. या लूकसह काजलने कानात लांब झुमके आणि गळ्यात हार घातला होता. या फोटोंमध्ये काजल अग्रवाल खूपच सुंदर दिसत होती. पहिल्या फोटोमध्ये ती सर्व मैत्रिणी आणि पती गौतमसोबत पोज देताना दिसली, दुसऱ्या फोटोत तिने डोक्यावर लाल रंगाची चुणरी घेतली, तर काही फोटोंमध्ये ती पती गौतमसोबत चांगले क्षण घालवताना दिसत होती.

2020 मध्ये केले होते गौतमसोबत लग्न

काजल अग्रवालच्या बेबी शॉवरचे हे फोटो तिच्या चाहत्यांना खूप आवडत आहेत. तिच्या या फोटोंवर चाहते कमेंटचा वर्षाव करत आहेत. काजल अग्रवालने 2020 मध्ये तिचा प्रियकर गौतम किचलूशी लग्न केले. तो मुंबईतील प्रसिद्ध व्यापारी आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Liquor Smuggling: गोव्यातून गुजरातला दारुतस्करी! 1.43 कोटींचा मद्यसाठा जप्त; पिसुर्लेतील डिस्टिलरी सील, 9 जण अटकेत

Mapusa: पाणीपुरवठा ऑफिसमध्ये नेल्या गढूळ पाण्याच्या बाटल्या! म्हापशातील प्रश्न ऐरणीवर; काँग्रेसचा घागर मोर्चाचा इशारा

Reis Magos: रेईश मागूशमधील प्रकल्प DLF ने गुंडाळला? ‘रेरा’कडे नोंदणी मागे घेण्यासाठी अर्ज; 80 बंगल्यांची नोंदणी होणार रद्द

Advalpal: अडवलपालमध्ये नळांद्वारे दूषित पाण्याचा पुरवठा! स्थानिकांचे आरोग्य धोक्यात; ‘फोमेंतो’मुळे समस्या उद्भवल्याचा संशय

Amthane Dam: भर पावसातही ‘आमठाणे’ कोरडे! धरणात 5 टक्केच पाणी; पर्यटनावरही परिणाम

SCROLL FOR NEXT