Ayush Sharma Dainik Gomantak
मनोरंजन

Ayush Sharma : सलमानच्या बहिणीला जेव्हा रंगावरुन हिणवले जाते...अर्पिताला ट्रोल करताच नवरा संतापला

सलमान खानच्या बहिणीचा म्हणजेच अर्पिताचा पती आयुष शर्मा चांगलाच संतापला आहे.

Rahul sadolikar

बॉलिवूड अभिनेता आणि सलमान खानचा मेहुणा आयुष शर्मा चांगलाच भडकला आहे. आयुषने पत्नी अर्पिता खान शर्माला तिची काळी त्वचा आणि वाढलेले वजन यासाठी ट्रोल करणाऱ्या ट्रोलर्सचा समाचार घेतला आहे. 
सलमान खानची लाडकी बहीण अर्पिता आणि अभिनेता आयुष शर्मा यांचा सुखी संसार सुरू आहे. आपल्या मेहुण्याच्या करिअरकडेही भाईजानचे लक्ष असते. सलमानचा मेहुणा आयुष शर्मा सध्या एका कारणामुळे चर्चेत आला आहे. अर्पिताच्या रंगाची खिल्ली उडवल्यामुळे तिचा पती चांगलाच भडकला आहे.

आयुषने अर्पिताच्या काळ्या रंगाची खिल्ली उडवणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर दिले असून, त्याच्या पत्नीला स्वतःचा अभिमान आहे आणि तिला तिचे आयुष्य स्वतःच्या अटींवर जगायचे आहे. आयुष शर्माही सध्या त्याच्या आगामी 'रुस्लान' चित्रपटामुळे चर्चेत आहे. 

21 एप्रिल रोजी त्याच्या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला असून त्यासोबतच त्याला कायदेशीर नोटीसचाही सामना करावा लागला आहे.

आयुष शर्माचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये तो 'टीईडीएक्स प्लॅटफॉर्म'वर बोलत आहे. आयुष या व्हिडिओमध्ये सांगतो की, त्याची पत्नी अर्पिता खानला पब्लिक फिगर म्हणून खूप टार्गेट केले जाते. 

जेव्हा ती ऑनलाइन जाते, कोणताही फोटो अपलोड करते तेव्हा लोक तिची खिल्ली उडवतात. अर्पिताला तिच्या गडद रंगामुळे आणि जास्त वजनामुळे टोमणे मारले जातात.

व्हिडिओमध्ये आयुष म्हणतो, 'माझ्या पत्नीला तिच्या वाढलेल्या वजनामुळे सतत ट्रोल केले जाते. या लोकांना वाटते की ती एक सेलिब्रिटी आहे, त्यामुळे तिने इतके लठ्ठ नसावे. त्याचा रंग गडद का आहे?

 अर्पिताने सेलिब्रिटीसारखे डिझायनर कपडे घालावेत. ती जेव्हाही तिचे फोटो सोशल मीडियावर टाकते तेव्हा लोक लगेच तिला तिच्या काळ्या त्वचेची आठवण करून देतात.

तेव्हा आयुष म्हणतो की, मला त्याच्या पत्नीचा अभिमान आहे. अर्पिता ती कोण आहे, तिला स्वतःचा अभिमान आहे. 'अंतीम' चित्रपट फेम आयुष पुढे म्हणतो, 'आजच्या जगात आंतरिक सौंदर्याचा आदर नाही. आपण किती चांगले व्यक्ती आहात हे कोणालाही जाणून घ्यायचे नाही. 

लोकांना फक्त बाह्य सौंदर्याची काळजी असते आणि त्यांना तेच पहायचे असते. मला माझ्या पत्नीचा अभिमान आहे कारण ती तिच्या रंगाने खूप आरामदायक आहे. अशा ट्रोलर्सना त्यांनी कधीही आपल्यावर वर्चस्व गाजवू दिले नाही. अर्पिता स्वतःच्या अटीवर आयुष्य जगते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Assembly Election 2027: निवडणुकीच्या तोंडावर भाजपचा 'मास्टरस्ट्रोक'; अधिकाधिक महिलांना उमेदवारी देण्याचा निर्णय, विधानसभेत महिला संख्या वाढवणार

Goa Crime: ऐन सणासुदीत राज्यात घरफोड्या अन् सायबर फसवणुकीचे सत्र! तोरसे, दवर्लीत चोरट्यांचा धुमाकूळ; बँकेला 75 लाखांचा चुना

डिचोली तालुक्यात झेंडूचे मळे केशरी-पिवळ्या फुलांनी बहरले, कृषी खात्याच्या ‘आत्मा’ योजनेला मोठे यश; शेतकऱ्यांच्या मेहनतीला दसऱ्याचे फळ

Asian Para Games 2026: आशियाई पॅरा गेम्समध्ये भारतीय खेळाडूंची धमाकेदार सुरुवात! 10 मीटर एअर रायफलमध्ये मोना अग्रवालला 'गोल्ड', तर अवनी लेखराला 'सिल्व्हर'

Goa Mining: 'गाव नष्ट होऊ देणार नाही!' होंडा ग्रामसभेत 'सोलये' खाणीचा प्रश्न ऐरणीवर; एनओसी रोखण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार

SCROLL FOR NEXT