Virat Kohli - Anushka Sharma Dainik Gomantak
मनोरंजन

Ayodhya Ram Mandir: अनुष्का-विराटलाही राममंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण; अभिनेत्री आणि आयोध्येचे खास कनेक्शन

Ayodhya Ram Mandir: ज्यासाठी खेळापासून बॉलिवूड आणि व्यवसायापर्यंत प्रत्येक क्षेत्रातील बड्या व्यक्तींना निमंत्रण पत्रे पाठवण्यात आली आहेत.

दैनिक गोमन्तक

Ayodhya Ram Mandir: अयोध्येतील राम मंदिराचा अभिषेक करण्याचा दिवस अगदी जवळ आला आहे. यानिमित्ताने अयोध्येत 22 जानेवारीला एका मोठ्या सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे, ज्यासाठी खेळापासून बॉलिवूड आणि व्यवसायापर्यंत प्रत्येक क्षेत्रातील बड्या व्यक्तींना निमंत्रण पत्रे पाठवण्यात आली आहेत.

राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी अनेक बॉलिवूड स्टार्सनाही निमंत्रण पाठवण्यात आले होते. आता या यादीत अनुष्का शर्मा आणि तिचा पती विराट कोहली यांच्या नावाचाही समावेश झाला आहे.

राम मंदिराच्या अभिषेक सोहळ्यासाठी अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीलाही निमंत्रण मिळाले आहे. याची सोशल मिडियावर चर्चा होत असून, अनुष्का-विराटचा फोटोही व्हायरल होत आहे. यामध्ये प्रभू रामाच्या अभिषेक सोहळ्याचे निमंत्रण पत्र दोन्ही हातात दिसत आहे.

अनुष्काचे भगवान रामाची नगरी अयोध्येशी खूप खास नाते आहे. त्यांचा जन्म 1 मे 1988 रोजी अयोध्येत झाला. पुढे करिअर करण्यासाठी ती मुंबईत शिफ्ट झाली. अनुष्काचा जन्म अयोध्येतील लष्करी रुग्णालयात झाला. त्यांचे वडील अजय कुमार शर्मा अयोध्येत भारतीय लष्कराच्या डोगरा रेजिमेंटमध्ये होते.

अयोध्येतील राम मंदिराच्या अभिषेक सोहळ्याबाबत बोलायचे झाले तर त्याची तयारी बऱ्याच दिवसांपासून सुरू होती. यात सुमारे 8 हजार लोक सहभागी होऊ शकतात. रजनीकांत, मोहनलाल आणि अमिताभ बच्चन यांच्याशिवाय रणबीर कपूर, आलिया भट्ट, राम चरण आणि त्यांची पत्नी उपासना, अरुण गोविल, सुनील लाहिरी आणि दीपिका चिखलिया, अनुपम खेर यांनाही प्राण प्रतिष्ठा सोहळ्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: भर मैदानात घुसला 'बिनतिकीट' पाहुणा! कुत्र्याच्या एंट्रीनं खेळाडूंमध्ये घबराट, पाहा VIDEO

Raj - Uddhav Thackeray: मुंबईत दुमदुमला 'आवाज मराठी'चा; 20 वर्षानंतर राज - उद्धव एकत्र

"हॉटेलचं जेवण चाखल्यावर घरचं आवडेल का?" प्रेमानंद महाराजांनी सांगितलं तरुणांच्या घटस्फोटांचं मुख्य कारण; Watch Video

Crime News: लाकडाच्या भुशात दारु लपवली, कर्नाटकच्या गाडीला गोव्याची नंबरप्लेट लावली; केरी नाक्यावर 12 लाखांचे गोवा बनावटीचे मद्य जप्त

Goa News Live Updates: झाड पडलेल्या घराची वीज मंत्री सुदिन ढवळीकर यांनी केली पाहणी

SCROLL FOR NEXT