Avinash Tiwari- Amitabh Bachchan Dainik Gomantak
मनोरंजन

Amitabh Bachchan: अभिनेत्याकडून बीग बींच्या डोक्यात लागला मार; करिअर धोक्यात...

Amitabh Bachchan: जेव्हा त्यांनी माझ्यासोबत स्टंट केला तेव्हा ते 72 वर्षांचा होते.

दैनिक गोमन्तक

Amitabh Bachchan: बीग बी म्हणजेच अमिताभ बच्चन बॉलीवूडमधील अनेकांची प्रेरणा आहेत. आपल्या दमदार अभिनयाने आणि भारदस्त आवाजाने त्यांनी बॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये स्वत:चे वेगळे स्थान निर्माण केले आहे. आता एका अभिनेत्याने अमिताभ बच्चन यांच्याबरोबरचा एक किस्सा सांगितला आहे.

अभिनेता अविनाश तिवारीने अमिताभ बच्चन यांच्यासोबत 'युद्ध' या सीरीज काम करत असतानाचा एक आठवण सांगितली आहे. तो म्हणतो चुकून अभिताभ बच्चन यांच्या डोक्यात मी कोपरा मारला होता. त्यावेळी तो इतका घाबरला होता की, त्याला वाटले आता आपले करिअर संपले. एका मुलाखतीदरम्यान, २०१३ ची घटना त्याने शेअर केली आहे.

अविनाश तिवारीचा पहिला अ‍ॅक्शन सीक्वेन्स होता जो त्याने 2013 मध्ये 'युद्ध' या सीरीजसाठी अमिताभ बच्चनसोबत शूट केला होता.

अविनाश तिवारी म्हणतो, 'माझा आयुष्यातला पहिला अॅक्शन सीन अमिताभ बच्चनसोबत होता. स्टंट करणाऱ्या लोकांसोबत सराव करायचो. पण बच्चन सरांना रिहर्सल करण्याची गरज नव्हती, कारण त्यांनी हे आयुष्यभर केले आहे. शॉट तयार झाला की ते आमच्यात सामील व्हायचे. जेव्हा त्यांनी माझ्यासोबत स्टंट केला तेव्हा ते 72 वर्षांचा होते.

त्या अॅक्शन सीक्वेन्समध्ये मी चुकून माझ्या कोपराने त्याच्या डोक्याला मारले. माझ्याकडे त्याचा व्हिडिओ आहे. सेटवर सगळेच मला चिडवत होते की मला आता चित्रपट मिळणार नाही. तेव्हा मला माझे करिअर संपल्यासारखे वाटले होते.

अविनाश तिवारीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, तो अलीकडेच 'काला' आणि नंतर 'बॉम्बे मेरी जान' या वेबसीरिजमध्ये दिसला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT