Avatar: The way of water Dainik Gomantak
मनोरंजन

Avatar The Way Of Water Day 11 : अवतारने तोडला कश्मिर फाईल्स आणि ब्रह्मास्त्रचा रेकॉर्ड..आता पुढे कोण?

अवतार 2 ने कश्मिर फाईल्स आणि ब्रह्मास्त्र या चित्रपटांनी बनवलेला रेकॉर्ड मोडला आहे.

Rahul sadolikar

जेम्स कॅमेरुन दिग्दर्शित अवतार : द वे ऑफ वॉटर या सिनेमाने बहुचर्चित कश्मिर फाईल्स आणि ब्रह्मास्त्र या सिनेमाचा रेकॉर्ड मोडला आहे. अवतार या सिनेमाने भारतासह जगभरातल्या प्रेक्षकांवर जादु केली आहे.रविवारच्या दिवशी चित्रपटाने कमाई केलीच पण त्याचबरोबर सोमवारीसुद्धा अवतारने बुकिंगच्या माध्यमातुन जोरदार कमाई केली आहे.

भारतात यावर्षीच्या टॉप 5 सिनेमांमध्ये समाविष्ट असणाऱ्या कश्मिर फाईल्स आणि ब्रह्मास्त्र या सिनेमांचा कमाईचा रेकॉर्ड अवतारने मोडला आहे. कश्मिर फाईल्स या वर्षी 11 मार्चला रिलीज झाला होता . बॉक्स ऑफिसवर या सिनेमाने  ‘252.90 कोटी इतकी कमाई केली तर 9 सप्टेंबरला रिलीज झालेल्या ‘ब्रह्मास्त्र पार्ट वन शिवा’ ने 257.44 कोटी कमाई केली होती.

 ‘अवतार द वे ऑफ वाटर’ने रिलीजच्या दुसऱ्या रविवारी केलेली कमाई चक्रावुन टाकणारी आहे. या रविवारी अवतारने 25.12 कोटी रुपयांची कमाई केली आहे. अवतारने आतापर्यंत इंडियन बॉक्स ऑफिसवर रविवारी रात्री 252.85 कोटी रुपये कमावले आहेत.

इंग्लिशमध्ये 131.55 कोटी , हिंदीत 81.80 कोटी , तेलुगूमध्ये 22.80 कोटी , तमिळमध्ये 13.50 कोटी आणि मल्याळममध्ये 3.2 कोटी एवढी तगडी कमाई अवतारने केली आहे. याशिवाय सोमवारसाठी झालेलं बुकींग 6 कोटींच्या वर गेले आहे. सोमवारी अवतार 12 कोटी रुपयांची कमाई करेल असा अंदाज आहे.

अवतारचा कमाईचा आलेख असाच चढता राहिला तर अवतारची कमाई नवनवे रेकॉर्ड करणार हे निश्चित. त्यातच आता या आणि पुढच्या शुक्रवारी कोणताहा सिनेमा रिलीज होणार नसल्याने त्याचा फायदा अवतारला नक्की मिळणार.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Ranji: नवीन मोसम, नवीन प्रशिक्षक! 'गोवा क्रिकेट'ची परंपरा सुरुच; बडोद्याचे 'मेवाडा' सहावे कोच नियुक्त

Durand Cup: 'ड्युरँड कप' होणार गोव्याशिवाय! गोमंतकीय संघांची नोंदणी नाही; संघ बांधणी प्रक्रिया पूर्ण नाही

Anmod Ghat: अनमोड घाटातील रस्ता खचला; बेळगाव - गोवा मार्गावरील वाहतूक विस्कळीत

Pissurlem: चिंता मिटली! पिसुर्लेत खाण खंदकावर पंप तैनात; धोक्याची पातळी ओलांडल्यास होणार उपसा

Goa News Live Updates: मुसळधार पावसाचा फटका; पणजी, ताळगाव, सांताक्रूझ आणि सांत आंद्रे परिसरात मर्यादीत पाणी पुरवठा

SCROLL FOR NEXT