Ashwin Mushran Viral Video Dainik Gomantak
मनोरंजन

VIDEO: गोव्यात प्रसिद्ध अभिनेत्याच्या कारचा अपघात! दुचाकीवरील बाप-लेकाला धडक दिल्याचा आरोप, स्थानिकांशी वादाचा व्हिडिओ व्हायरल

Ashwin Mushran Viral Video: ‘लगे रहो मुन्ना भाई’, ‘शहजादा’, ‘फॅशन’, ‘मैं तेरा हीरो’ आणि ‘देसी बॉईज’ यांसारख्या हिंदी चित्रपटांमध्ये भूमिका साकारलेला अभिनेता अश्विन मुश्रान याच्या कारला गोव्यात अपघात झाल्याची घटना समोर आली आहे.

Sameer Amunekar

‘लगे रहो मुन्ना भाई’, ‘शहजादा’, ‘फॅशन’, ‘मैं तेरा हीरो’ आणि ‘देसी बॉईज’ यांसारख्या हिंदी चित्रपटांमध्ये भूमिका साकारलेला अभिनेता अश्विन मुश्रान याच्या कारला गोव्यात अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. दक्षिण गोव्यातील केपे परिसरात हा अपघात झाल्याची माहिती आहे.

कारच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी

मिळालेल्या माहितीनुसार, अश्विन मुश्रान याची कार आणि दुचाकी यांच्यात जोरदार धडक झाली. अभिनेत्याची कार रस्त्याच्या चुकीच्या बाजूने येत असल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात आला आहे. या धडकेत दुचाकीवरील वडील गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अपघातानंतर घटनास्थळी मोठी गर्दी जमली. दुर्घटनेच्या कारणावरून अभिनेता आणि स्थानिकांमध्ये वाद निर्माण झाला. दुचाकीस्वाराच्या चुकीमुळेच हा अपघात झाल्याचा दावा अश्विन मुश्रानने केल्याचे सांगितले जात आहे. मात्र स्थानिकांनी हा दावा फेटाळून लावत कारचालकाचीच चूक असल्याचा आरोप केला आहे.

जखमी व्यक्तीच्या उपचारांचा खर्च आणि नुकसानभरपाईची जबाबदारी संबंधितांनी घ्यावी, अशी मागणीही स्थानिकांकडून करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. मात्र या दाव्यांची अधिकृत पुष्टी अद्याप पोलिसांकडून झालेली नाही.

अभिनेता आणि पत्नीचा स्थानिकांशी वाद

अपघातानंतरचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये अश्विन मुश्रान आणि त्याची पत्नी स्थानिकांशी जोरदार वाद घालताना दिसत असल्याचा दावा केला जात आहे. अपघाताच्या कारणावरून दोन्ही बाजूंमध्ये शाब्दिक बाचाबाची झाल्याचे व्हिडीओत दिसते.

वादादरम्यान अभिनेत्याच्या पत्नीने स्थानिकांच्या दिशेने थुंकल्याचाही आरोप करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिस्थिती आणखी चिघळल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. मात्र व्हायरल व्हिडीओतील प्रत्येक दाव्याची अधिकृत पुष्टी होणे अद्याप बाकी आहे.

काही वेळाने अभिनेता पुन्हा घटनास्थळी आला

वाद वाढल्यानंतर अश्विन मुश्रान आणि त्याची पत्नी कारमधून तेथून निघून गेल्याचा दावा स्थानिकांनी केला आहे. मात्र काही वेळानंतर अभिनेता पुन्हा घटनास्थळी परतला आणि त्याने स्थानिकांची माफी मागितल्याचे सांगितले जात आहे.

माफी मागताना अभिनेत्याची भूमिका गंभीर नसल्याचे आणि त्याच्या वागण्यात प्रामाणिकपणाचा अभाव जाणवत असल्याचे स्थानिकांनी म्हटले आहे. या प्रकरणावरून परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

पोलिसांच्या अधिकृत भूमिकेची प्रतीक्षा

दरम्यान, या अपघाताबाबत पोलिसांकडून अद्याप सविस्तर अधिकृत माहिती समोर आलेली नाही. अभिनेता अश्विन मुश्रानकडूनही या संपूर्ण घटनेवर अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. त्यामुळे अपघात नेमका कसा घडला, वाहन कोणत्या बाजूने येत होते आणि या दुर्घटनेत कोणाची चूक होती, हे तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

खरी कुजबुज: गटारी पार्टीत शिजले राजकारण?

Pilgaon Panchayat: आम्हाला 'फ्लायओव्हर' नकोच, पिळगाव ग्रामसभेत ठराव; 'मायनिंग' विषयही गाजला

Cristiano Ronaldo Retirement: फुटबॉल चाहत्यांना मोठा धक्का! ख्रिस्तियानो रोनाल्डो निवृत्तीच्या वाटेवर, म्हणाला, 'हे माझं शेवटचं...'

काँग्रेस अध्यक्ष खर्गे सोमवारपासून 2 दिवसांच्या गोवा दौऱ्यावर, संघटनात्मक तयारीवर दक्षिण गोव्यात होणार 'पीएसी'ची महत्त्वपूर्ण बैठक

VIDEO: विजेचा खांब पडला अन् अफवा पसरली; बिहारच्या अशोकधाम मंदिरात चेंगराचेंगरी, 7 जणांचा मृत्यू; अनेक जण जखमी

SCROLL FOR NEXT