Ashish Vidyarthi Love Story Dainik Gomantak
मनोरंजन

Ashish Vidyarthi Love Story: या वयात प्रेमात पडलेल्या आशिष विद्यार्थी यांची लवस्टोरी कशी फुलली?

अभिनेते आशिष विद्यार्थी यांनी वयाच्या 60 व्या वर्षी बाशिंग बांधलं अन् सगळ्यांच्या भुवया उंचावल्या.

Rahul sadolikar

Ashish Vidyarthi Love Story: अभिनेते आशिष विद्यार्थी....अनेक चित्रपटातून खलनायकी भूमीका करणारा हा अभिनेता रियल लाईफमध्ये भलताच रोमँटिक निघाला. वयाच्या 60 व्या वर्षी आशिष विद्यार्थी बोहल्यावर चढले.

हे त्यांचं दुसरं लग्न असुन त्यांच्या या बातमीने सर्वांनाच धक्का बसला आहे. आशिष विद्यार्थींनी आसाममधील रुपाली बरुआसोबत कोर्ट मॅरेज केले होते.

सध्या सोशल मिडियावर आशिष विद्यार्थी आणि रुपाली बरुआ यांच्या लग्नाचे फोटो व्हायरल होत आहे. चाहत्यांनी या जोडप्याचे अभिनंदन करण्यास सुरुवात केली. तर दुसरीकडे काहींनी त्यांना ट्रोलही केलं आहे.

सोशल मिडीयावर फोटो व्हायरल

आजकाल आशिष विद्यार्थी त्यांच्या व्लॉग्सच्या माध्यमातून त्याच्या चाहत्यांशी जोडलेले असतात. ते बॉलिवूडचे तसेच साऊथच्या चित्रपटांतला प्रसिद्ध आणि आवडते खलनायक मानले जातात.

त्यांचे लग्न रुपाली बरुआ नावाच्या फॅशन एंटरप्रेन्योरशी झाले आहे. कोर्ट मॅरेजनंतरचे फोटो या कपलने फॅन्ससोबत शेअर केले आहेत.

या जोडप्याच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. लग्नाच्या फोटोंमध्ये दोघंही खूप आनंदी दिसत आहेत. दोघांनीही पारंपारिक भारतीय कपडे घातले आहेत. सोनेरी आणि पांढर्‍या रंगाच्या कपड्यांमध्ये हे कपल खूपच प्रेमात दिसत आहे.

नातं फुललं कसं?

लग्नानंतर दोघे रिसेप्शन पार्टीही देणार आहेत. आशिष या लग्नाचे वर्णन एक असामान्य भावना म्हणून करताना दिसला. रुपाली बरुआ आणि आशिष विद्यार्थी यांना जेव्हा विचारण्यात आलं की त्यांची पहिली भेट कशी झाली आणि ते प्रेमात कसे पडले?

या प्रश्नावर आशिष विद्यार्थी यांनी सांगितले की ही एक लांबलचक कथा आहे आणि ते त्याबद्दल कधीतरी सांगतील. दुसरीकडे रुपाली बरुआने सांगितले की, ती आणि आशिष विद्यार्थी काही काळापूर्वी भेटले होते आणि त्यांनी त्यांचे नाते पुढे नेण्याचा निर्णय घेतला होता.

रुपाली बरुआ कोण आहे?

रुपाली बरुआ ही आसाममधील गुवाहाटी येथील रहिवासी आहेत. तिचे कोलकात्यात फॅशन स्टोअर आणि स्वतःचा व्यवसाय आहे.

रुपाली बरुआने तिच्या दोन मैत्रिणी मेघाली आणि नमिता यांच्यासोबत कोलकातामध्ये नेमग नावाचे बुटीक आणि नरुमेग नावाचे कॅफे उघडले आहे. हे 32 हजार स्क्वेअर फूटमध्ये पसरलेले आहे.

आशिष विद्यार्थी यांच्या भूमीका

अभिनेते आशिष विद्यार्थी यांचं शिक्षण नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा ( NSD) इथं झालं. त्यांनी नाटकापासून आपल्या करिअरची सुरूवात केली. त्यांनी द्रोहकाल या चित्रपटापासुन आपल्या चित्रपटांच्या प्रवासाला सुरूवात केली.

आशिष विद्यार्थी यांनी बिच्छू, नाजायज, अलीगड, कहो ना प्यार है यांसारख्या गाजलेल्या चित्रपटांतून काम केलं आहे... त्यांच्या या लग्नानंतर चाहत्यांच्या संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mitchell Starc Fight: लाईव्ह सामन्यात 'रनिंग लाईन'वरुन राडा! मिचेल स्टार्क मेहदी हसन मिराजशी भिडला; हाय-व्होल्टेज ड्रामा व्हायरल

Goa Olympic Association: 'गोवा ऑलिंपिक'ला 21 वर्षांनंतर लाभणार नवा सचिव, गुरुदत्त भक्ता यांची दोन दशकांची कारकीर्द; महत्त्वाच्या स्पर्धांचे राज्यात आयोजन

Shukra Pushkaransh Yog 2026: शुक्रदेवांची अफाट कृपादृष्टी! 15 ऑगस्टपासून 'या' राशींच्या नशिबाला मिळणार नवी दिशा; 'शुक्र पुष्करांश' योग करणार मालामाल

Calangute Dance Bar: कळंगुटमधील 'डान्स बार' बंद करा, गट काँग्रेस समितीची मागणी; पोलिसांना निवेदन सादर

Child Disappearance Goa: राज्यात पाच वर्षांत हरवली 256 मुले, 106 सापडली,150 बेपत्ता

SCROLL FOR NEXT