Aryan Khan  Dainik Gomantak
मनोरंजन

Aryan Khan : "एवढा अहंकार, करत तर काहीच नाही"...आर्यन खानच्या या व्हिडीओवर लोक का भडकलेत?...

शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान एका व्हिडीओमुळे पुन्हा चर्चेत आला आहे.

Rahul sadolikar

शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान सध्या चांगलाच चर्चेत आहे. शाहरुख खान सध्या सर्वत्र त्याच्या "पठाण" या चित्रपटामुळे चर्चेत आहे. मात्र, इथे आपण ज्याच्याबद्दल बोलणार आहोत तो शाहरुख खान नसून त्याचा लाडका आर्यन खान आहे. आर्यन खानचा एक व्हिडिओ समोर आला आहे याच व्हिडीओवरून युजर्स त्याला अहंकारी म्हणत आहेत.

ड्रग्ज प्रकरणातल्या त्याच्या सहभागाचा आरोप झाला तेव्हा आर्यन खान खूप चर्चेत होता. , तो अनेकदा त्याच्या स्टाईलमुळे लक्षवेधी ठरत असतो आणि यावेळीही असेच घडले आहे. आर्यन खानचा एक व्हिडीओ समोर येतोय ज्यात त्याच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे.

आर्यनचा लेटेस्ट व्हिडिओ सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे. या व्हिडिओमध्ये आर्यन त्याच्या रेंज रोव्हर कारमधून खाली उतरतो, जिथे आधी उभे असलेले पापाराझी त्याला थांबण्याची विनंती करत आहेत. मात्र, आर्यन ऐकत नाही आणि थांबत नाही. कॅमेऱ्यासमोर कर्मचाऱ्यांना घेऊन तो पुढे सरकतो. हे पाहून लोक त्याच्यावर संतापले.

हा व्हिडीओ पाहून युजर्सनी कमेंट बॉक्समध्ये आपला राग व्यक्त केला आहे आणि लिहिलं आहे – हा कसला अॅट्यिट्यूड आहे , करत तर काहीच नाही. एका यूजरने म्हटले आहे - शाहरुखने मीडियासमोर काहीही बोलण्यास मनाई केली असावी कारण त्याने काही बोलले तर ते त्याच्या विरोधात जाईल. एक म्हणाला - ही वृत्ती पुन्हा सुरू.

चिडलेल्या लोकांनी असेही म्हटले आहे की - एवढी वृत्ती, इतका अहंकारी, हा शाहरुख नाही. काहींनी म्हटले आहे - चित्रपट एकदा येऊ द्या, मग तो स्वतःच येईल. एका यूजरने विचारले आहे - आर्यन भाई वडिलांचे पैसे खर्च करणे आणि पार्ट्यांमध्ये जाण्याव्यतिरिक्त काय करतो? त्याला रेड चिलीजच्या ऑफिसमध्ये कोणी पाहिले आहे का? तो 22 वर्षांचा आहे, आता शाहरुखने त्याला बॉलीवूडच्या युक्त्या शिकवल्या पाहिजेत कारण शाहरुख हजारो कोटींच्या संपत्तीचा वारसदार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Diwali Inflation Report 2026: दूध, तूप, ड्रायफ्रूट्सपासून इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंपर्यंत... ऐन दिवाळीत महागाईचा झटका; सर्वसामान्यांच्या खिशाला मोठी कात्री

Illegal Hill Cutting: बांधकामाचा परवाना आहे, पण डोंगरकापणीची परवानगी कुठे? व्हिडीओ व्हायरल होताच तलाठ्यांची पाहणी; कारवाई मात्र अद्याप नाही!

Breast Cancer Screening: 2.15 लाख महिलांची तपासणी, 3,925 जणींमध्ये संशयित लक्षणे! गोव्यात 96 महिलांना स्तन कर्करोगाचे निदान

US Iran Tensions: मध्यावधी निवडणुकीतील पराभवानंतर ट्रम्प अधिकच आक्रमक! इराणच्या अणुऊर्जा केंद्रांवर हल्ल्याचे सावट; सीमेवर हाय अलर्टवर

Cyber Fraud Safety Tip: दिवाळीत शॉपिंग करताना सावधान! 80 टक्के डिस्काउंटच्या नावाखाली सायबर भामटे घालू शकतात गंडा, 'या' गोष्टी लक्षात ठेवा

SCROLL FOR NEXT