Sameer Wankhede
Sameer Wankhede  Dainik Gomantak
मनोरंजन

Sameer Wankhede Bribe Case: आर्यन खान प्रकरणात समीर वानखेडेंनी 25 कोटींची लाच मागितल्याचं उघड होणार?...आज दिल्ली CBI कार्यालयात देणार जबाब

Rahul sadolikar

Sameer Wankhede Bribe Case: बहुचर्चित आर्यन खान ड्रग्ज प्रकरणाच्या केंद्रीय अन्वेषण ब्युरो (सीबीआय) च्या तपासात सोमवारी उघड झाले की स्वतंत्र साक्षीदार केपी गोसावी याने क्रूझवरील कथित ड्रग्स प्रकरणात आर्यन खानच्या कुटुंबाकडून  25 कोटी लुटण्याची योजना आखली होती . ही बातमी अशी बातमी एएनआय या वृत्तसंस्थेने दिली आहे.

आर्यन खान ड्रग्ज-ऑन-क्रूझ प्रकरणाशी संबंधित असलेल्या समीर वानखेडेंच्या आणि इतर तीन जणांविरुद्धच्या कथित भ्रष्टाचाराच्या प्रकरणानंतर सीबीआयने शुक्रवारी देशभरात 29 ठिकाणी छापे मारले.

ही एक मोठी कारवाई मानली जात आहे गेल्या वर्षी या प्रकरणाने मनोरंजन क्षेत्रासह राजकिय क्षेत्रात मोठा भूकंप झाला होता.. याप्रकरणी ते आज दिल्लीतील CBI कोर्टात जबाब देणार आहेत.

आर्यन खान ड्रग्ज-ऑन-क्रूझ प्रकरणाशी संबंधित भ्रष्टाचाराच्या प्रकरणात केंद्रीय तपास संस्थेने मुंबई एनसीबीचे माजी झोनल संचालक समीर वानखेडे आणि इतर तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला . एजन्सीने मुंबई, दिल्ली, रांची (झारखंड) आणि कानपूर (उत्तर प्रदेश) अशा 29 ठिकाणी छापे टाकले.

वानखेडे यांनी कॉर्डेलिया क्रूझवर छापा टाकून अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला ड्रग्ज प्रकरणात अटक केली होती. यानंतर देशभक्त म्हणून शिक्षा होत असल्याचा आरोप त्यांनी नुकताच केला होता.

केंद्रीय अन्वेषण ब्युरो (सीबीआय) ने शुक्रवारी त्यांच्या निवासस्थानी आणि इतर परिसरांवर छापे टाकल्याच्या प्रतिक्रिया म्हणून त्यांचे हे वक्तव्य आले आहे.

वानखेडे यांनी आरोप केला की, सीबीआयच्या 18 अधिकाऱ्यांनी काल त्यांच्या घरी छापा टाकला, त्यावेळी त्यांची पत्नी आणि मुले घरातच होती.

वानखेडे म्हणतात "मला देशभक्त म्हणून बक्षीस मिळत आहे, काल 18 सीबीआय अधिकाऱ्यांनी माझ्या निवासस्थानावर छापा टाकला आणि माझी पत्नी आणि मुले घरात असताना 12 तासांपेक्षा जास्त काळ झडती घेतली. त्यांच्याकडे 23,000 रुपये आणि चार मालमत्तेची कागदपत्रे सापडली. या संपत्ती यापूर्वी ताब्यात घेण्यात आल्या होत्या. मी सेवेत रुजू झालो,”

सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या पत्नी क्रांती रेडकरचा फोनही ताब्यात घेतल्याचा दावा त्यांनी केला. त्याशिवाय सीबीआयने त्याची बहीण यास्मिन वानखेडे हिच्या घरातून 28,000 रुपये आणि वडील ज्ञानेश्वर वानखेडे यांच्या घरातून 28,000 रुपये जप्त केले. वानखेडे यांच्या सासरच्या घरी समीरकडून 1800 रुपये जप्त करण्यात आले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IFFI Goa Poster Launch: फ्रान्स येथील कान्स चित्रपट महोत्सवात इफ्फीचे पोस्टर लाँच

District and Sessions Court: कोलवा येथील वेश्याव्यवसाय प्रकरणात दोषी ठरलेला विजय सिंगला 3 वर्षांची कैद

Supreme Court: ‘’बस्स! पुरे झाले, तुम्ही निकाल न वाचताच आला आहात...’’; CJI चंद्रचूड यांचे उत्तराधिकारी कोर्टरुममध्ये का संतापले?

Panaji News : सांताक्रुझ मतदारसंघाचा चेहरामोहरा बदलणार : आमदार रुडाॅल्फ फर्नांडिस

इंजिनिअरिंग ड्रॉपआऊट विद्यार्थ्याने Chat GPT च्या मदतीने सुरु केली बनावट कॅसिनो वेबसाईट, गोवा पोलिसांनी केली अटक

SCROLL FOR NEXT