Aryan Khan  Dainik Gomantak
मनोरंजन

Aryan Khan Drug Case: आर्यन खान ड्रग्ज केसमध्ये साक्षीदाराबाबत अधिकाऱ्याबाबत मोठा खुलासा

Aryan Khan Drug Case: त्यामुळे आता या दोन्ही विधानांमध्ये विरोधाभास दिसून येत आहे.

दैनिक गोमन्तक

Aryan Khan Drug Case: बॉलीवूडचा किंग खानचा मुलगा आर्यन खान कथित ड्रग्ज प्रकरणात नवीन वळण देणारी माहीती समोर आली आहे. या प्रकरणाचा तपास सुरु असाताना आर्यन खानसोबत घेतलेली सेल्फी मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली होती.

या फोटोमध्ये किरण गोसावी नावाचा व्यक्ती दिसून येत आहे. आता लाच घेतल्याप्रकरणी आरोपी असलेल्या माजी इंटेलिजेंस ऑफिसर आशीष रंजन यांनी किरण गोसावी बाबत महत्वाची माहीती उघड केली आहे.

एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्या परवानगीनंतरच या प्रकरणात किरण गोसावीला सामील केल्याचे आशिष रंजन यांनी म्हटले आहे. मात्र याआधी समीर वानखेडे यांनी ड्रग्ज प्रकरणा दरम्यान किरण गोसावीबरोबर पहिल्यांदा भेट झाल्याचे म्हटले होते. त्यामुळे आता या दोन्ही विधानांमध्ये विरोधाभास दिसून येत आहे.

आशिष रंजन यांनी दिलेल्या विधानानंतर आर्यन खान ड्रग्ज( Drugs ) केस प्रकरणात बऱ्याच त्रुटी दिसून आल्या असल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान, किरण गोसावी हा या प्रकरणात साक्षीदार मानला जात होता.

आर्यन खान ड्रग्ज प्रकरणाच्या तपासानंतर एनसीबीने आर्यनविरुद्धचा खटला रद्द केला असून पुराव्याअभावी त्याला कोर्टाने क्लीन चिट दिली आहे. मिळालेल्या माहीतीनुसार, आर्यनचे एक ऑडिओ रेकॉर्डिंगही गोसावी यांनी प्रसारित केले होते आणि यावरून तपास प्रक्रियेतील त्रुटीही दिसून येतात. एनसीबी कार्यालयातून साक्षीदाराचा आरोपीसोबतचा सेल्फी सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT