Happy Birthday Arshad Warsi: मुन्ना भाईचा सर्किट फेम अरशद वारसी आज आपला 55 वा वाढदिवस साजरा करत आहे.
अरशद वारसीने आपल्या विविध भूमिकांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. आज त्याच्या वाढदिवसाबद्दल जाणून घेऊयात त्याच्याबद्दल खास गोष्टी.
अरशद वारसीचे बालपण
मुस्लिम कुटुंबात जन्मलेल्या अरशद वारसीने वयाच्या अवघ्या 14 व्या वर्षी आई- वडीलांना गमावले. 10 वी नंतर त्यांना शाळा सोडावी लागली. घर चालवण्यासाठी 17 व्या वर्षी अरशदला काम करावे लागले.
त्यांनी घराघरात जाऊन कॉस्मेटिक विकले, फोटोच्या लॅबमध्ये काम केले आहे. दरम्यानच्या काळात त्यांनी अकबर सामीच्या डान्स ग्रुपला जॉईन करण्याची संधी मिळाली आणि त्यांच्या अभिनय क्षेत्रातील प्रवासाची सुरुवात झाली.
अशी झाली सुरुवात
महेश भट्ट यांच्या काश चित्रपटात त्याने सर्वात पहिल्यांदा कोरिओग्राफर म्हणून काम केले. अरशदने लंडन डान्स कॉम्पिटीशन जिंकले. त्यानंतर त्याला रूप की रानी चोरों का राजा या चित्रपटातील टायटल ट्रॅकवर कोरिओग्राफी करण्याची संधी मिळाली. अमिताभ बच्चन यांची कंपनीकडून तेरे मेरे सपने मध्ये डेब्यू केला होता.
अरशदच्या 36 वर्षाच्या करिअरमध्ये त्याने 50 पेक्षा जास्त चित्रपटात भूमिका साकारली आहे. 2003 मध्ये आलेल्या मुन्नाभाई एमबीबीएस मध्ये त्याने निभवलेल्या सर्कीट च्या भूमिकेला चाहत्यांनी भरभरुन प्रेम दिले.
2015 मध्ये केले होते वादग्रस्त ट्वीट
2015 मध्ये अरशदने नागा साधूंवर एक टिप्पणी केली होती. त्यामुळे तो वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. त्याच्या या ट्विटनंतर त्याला मारण्याच्या धमक्या मिळाल्या होत्या. जेव्हा लोकांमधील संताप वाढला होता. त्यानंतर, अरशदने आपले ट्विट डिलिट करत माफी मागितली होती.
2016 मध्ये आलेल्या अरशदच्या चित्रपटातील एका डायलॉगनंतर हिंदू संघटना भडकल्या होत्या. त्याचबरोबर, अरशदने एका मुलाखतीत म्हटले होते की, तालीबानने आपल्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याचे म्हटले होते. सेबीने देखील त्याला बॅन केले होते.
दरम्यान, अरशद सध्या वेब सीरीज असुर 2च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. मुन्नाभाई 3, जीतेंगे हम आणि नमूने पाइपलाइन मधे दिसून येणार आहे. अलिकडेच अक्षयकुमारच्या बच्चन पांडेमध्ये दिसून आला होता.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.