A.R.Rehman Dainik Gomantak
मनोरंजन

A.R Rahman Birthday special: "मुलाला घेऊन रस्त्यावर भिक माग" ए.आर रहमानच्या आईचा कुणी केला होता अपमान?

गायक, संगीतकार ए.आर रेहमान यांचा आज वाढदिवस. जाणुन घेऊया त्यांच्या आयुष्यातला एक किस्सा.

Rahul sadolikar

गायक, संगीतकार ए. आर रहमान यांचा आज वाढदिवस. 2 ऑस्कर, 2 ग्रॅमी आणि असे कितीतरी अॅवॉर्ड मिळवणारे गायक, संगीतकार ए. आर रहमान आज आपला 56 वा वाढदिवस साजरा करत आहेत.

आज यशाच्या शिखरावर असणारा हा महान संंगीतकार त्याच्या लहानपणी प्रचंड कष्टातुन गेलेला आहे. वयाच्या 9 व्या वर्षी बापाचं छत्र हरवलेला हा मुलगा आपल्या आईसोबत जगण्याचा संघर्ष करत होता.

अगदी कोवळ्या वयात अशी जबाबदारी येऊन पडल्यामुळे रहमान यांना आपलं शिक्षणही सोडावं लागलं होतं.

छोटा रहमान आता पोरका झाला होता. वडिल त्याला सोडुन गेले होते ;आणि वडिलांनी वारशाच्या रुपात ठेवली होती फक्त काही वाद्ये. हीच वाद्ये भाड्याने देऊन घरचा उदरनिर्वाह चालायचा.

वडिलांकडुन मिळवलेलं वाद्यांचं ज्ञान त्यांना या व्यवसायात उपयोगी आलं. वाद्ये भाड्याने देत असताना त्यांना आपल्या आईसोबत जायला लागायचं. पण नंतर याच वाद्यांशी त्यांची जन्मभराची गट्टी जमली. रहमान यांनी नाईलाजाने सुरू केलेला हा प्रवास आज यशाच्या शिखरावर पोहोचला आहे.

रहमान यांचा सुरू झालेला हा प्रवास सोपा मुळीच नव्हता. जगण्याचा हा संघर्ष करताना कित्येकदा त्यांना अपमान सहन करावा लागला.

एकदा रहमान यांच्या आईला शाळेच्या मुख्याध्यापकांंनी बोलावलं. कारण होतं शाळेची रखडलेली फी. संघर्षाच्या त्या काळात फी भरणंही रहमान यांच्या आईल शक्य झाले नाही. यावर त्या उद्दाम मुख्याध्यापकाने ''तू तुझ्या मुलाला घेऊन रस्त्यावर भीक माग'' असं म्हणुन अपमान केला.

त्या मुख्याध्यापकाने विचारही केला नसेल की आपण अशा मुलाचा अपमान करत आहोत जो भविष्यात संगीत क्षेत्रात इतिहास घडवणार आहे. यानंतर रहमान यांनी शाळा सोडली आणि त्यांची संगीताची साधना सुरू झाली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vidhu Vinod Chopra At IFFI: 'माझ्या सिनेमाच्या पहिल्या 'शो'ला चार-पाचच प्रेक्षक होते..'; चोप्रांनी सांगिलता 'खामोश'चा दिलखुलास किस्सा

Paroda Murder Case: पारोड्यात महिलेचा अज्ञाताकडून खून! संशयित कामगाराचा शोध सुरू

एकाच दिवशी Cash For Job मधील ठकसेनांना जामीन! तक्रारदारांची मात्र चिंता संपेना

Cash For Job प्रकरणातील तक्रारदारांचे मोबाईल जप्त केल्‍याचा दावा; संशयितांचे कॉल डिटेल्स, लोकेशन्‍स जाहीर करण्याचे मुख्यमंत्र्यांना आव्हान

Anjuna Villagers Protest: हणजुणेत स्थानिक आक्रमक! मेगा इव्हेंट्सविरोधात धरणे आंदोलन; ध्वनी प्रदूषणाविरोधी झळकावले फलक

SCROLL FOR NEXT