Actress Anushka Sharma Twitter/@Shinnin07799800
मनोरंजन

अनुष्का लेकीसोबत युकेत करतेय एन्जॉय; फोटो होतोय व्हायरल

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) आजकाल यूकेमध्ये पती विराट कोहली (Virat Kohli) आणि मुलगी वामिकासमवेत (Vamika) एन्जॉय करत आहे.

दैनिक गोमन्तक

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) आजकाल यूकेमध्ये पती विराट कोहली (Virat Kohli) आणि मुलगी वामिकासमवेत (Vamika) एन्जॉय करत आहे. विराट त्याच्या टेस्ट सीरीज साठी इंग्लंडला गेला आहे तेथे अनुष्का आणि त्यांची मुलगीही त्यांच्यासोबत आहे. इंग्लंडमध्ये नेचर आणि फूड चा आनंद घेत असताना अनुष्का व्हिडिओ आणि पोस्ट शेअर करत राहते. आता अनुष्का मुलगी वामिकासोबत फिरायला बाहेर गेली आहे. त्यांचे फोटोज सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत. (Anushka Sharma was seen roaming the streets of UK with daughter Vamika)

अनुष्काचे फोटोज सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. फॅन क्लबने अभिनेत्रीचे फोटोज शेअर केले आहेत. फोटोंमध्ये अनुष्काने लांब तपकिरी रंगाचा कोट परिधान केला आहे आणि एक पोनीटेल बनविली आहे. फोटोमध्ये वामिकाचा चेहरा स्पष्ट दिसत नाही.सोमवारी अनुष्का शर्माने विराट कोहलीसोबत ब्रेकफास्ट करताना एन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला होता. फोटोमध्ये अनुष्का काहीतरी खाताना दिसली आहे, तर विराट हातात एक कप धरून बसलेला आहे आणि कॅमेराकडे पोज देत आहे.

अनुष्काने एक नवीन उपक्रम सुरू केला आहे ज्यामध्ये ती आपले प्रसूती कपडे विकत आहे. या सेलमधून जमा झालेल्या पैशातून अनुष्काने स्नेहा नावाच्या फाउंडेशनच्या गर्भवती महिलांना मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. जो ड्रेस अनुष्काने शेअर केला आहे. त्यांच्याकडून अडीच लाख लिटर पाणी वाचविण्यात हातभार लावेल.

अनुष्का शर्माला शाहरूख खान आणि कतरिना कैफ सोबत 2018 मधील ‘झिरो’ (zero) चित्रपटात पाहिले होते. या चित्रपटापासून ती कोणत्याही चित्रपटात दिसली नाही. आता अनुष्काने निर्णय घेतला आहे की 2022 पर्यंत ती ब्रेकवर असेल. आपली मुलगी वामिकाची काळजी घेण्यासाठी तिने असा ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच, ती सध्या तिच्या प्रॉडक्शन हाऊसवर लक्ष केंद्रित करत आहे. अनुष्काच्या प्रॉडक्शन हाऊसच्या अंतर्गत अनेक उत्तम चित्रपट आणि वेब सीरिज बनविण्यात आल्या आहेत. आता लवकरच पाताल लोक 2 (paatal lok 2), काला यासह अनेक चित्रपट त्यांच्या प्रॉडक्शन हाऊसच्या खाली बनणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

"आम्ही आणि पाकिस्तानी सैन्य एकच!" लष्कर-ए-तैयबाच्या दहशतवादी सैफुल्लाह कसूरीची मोठी कबुली; भारताविरुद्ध पुन्हा ओकली गरळ

"...म्हणून गोवा बर्बाद" राज ठाकरेंनी मांडलं जमिनींच्या लुटीचं 'डिजिटल' गणित; महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत रील्सस्टार्सना लगावला टोला

Goa Tourism: गोव्याचा पर्यटनात जागतिक डंका! 2025 मध्ये 1 कोटी 8 लाख पर्यटकांनी दिली भेट

IND vs NZ: ऋषभ पंतच्या जागी 'या' युवा खेळाडूची संघात एन्ट्री, 'BCCI'ने केली घोषणा

Goa Politics: गोव्यात 'आप'ची नवी टीम जाहीर! वाल्मिकी नाईक प्रदेशाध्यक्ष, तर गर्सन गोम्स कार्यकारी अध्यक्ष

SCROLL FOR NEXT