Virat Kohli reel Dainik Gomantak
मनोरंजन

''माझी साथ विसरलास का?'', विराटच्या प्रेमात बनवली रील, कोहलीला 'बेवफाह' म्हणणाऱ्या पोस्टवर अनुष्काची लाईक; Video

virat kohli fan reel video: विराट कोहलीच्या एका निष्ठावान चाहत्याने बनवलेला एक मजेशीर रील सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे

Akshata Chhatre

anushka sharma likes virat kohli bewafaa post: क्रिकेट जगतातील 'पॉवर कपल' विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांच्या चाहत्यांची संख्या केवळ भारतातच नाही, तर जगभरात आहे. आनंद असो वा कठीण काळ, त्यांचे चाहते नेहमीच त्यांच्यासोबत ठामपणे उभे असतात. नुकताच, विराट कोहलीच्या एका निष्ठावान चाहत्याने बनवलेला एक मजेशीर रील सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. विशेष म्हणजे, अनुष्का शर्माने स्वतः हा रील पाहिला आणि त्याला लाईक करून या चर्चेत अधिक भर घातली आहे.

रीलमध्ये आहे तरी काय?

एका चाहत्याने बनवलेला हा व्हिडिओ हलक्या-फुलक्या विनोदी पद्धतीने विराट कोहलीवरील त्याचे प्रेम आणि भावना व्यक्त केली आहे. जेव्हा विराट कोहलीने जाहीर केले की, त्याच्या कठीण काळात केवळ अनुष्का शर्मानेच त्याला साथ दिली, हा रील त्यावेळी चाहत्याची निराशा दाखवतो, व्हिडिओमध्ये हा चाहता आधी निराश होऊन खिडकीतून खाली उडी मारताना दिसतो. यानंतर तो कांदा चिरताना आपले अश्रू लपवण्याचा अभिनय करतो. या रीलवर लिहिलेले कॅप्शन आहे: "जेव्हा विराट कोहली म्हणाला की त्याच्या डाउनफॉलमध्ये फक्त अनुष्का शर्मानेच त्याला सपोर्ट केला."

अनुष्काने दिली दाद; इंटरनेटच्या प्रतिक्रिया

हा रील इंटरनेटवर त्वरित व्हायरल झाला आणि चाहत्यांच्या प्रतिक्रियांचा पाऊस पडू लागला. 'अनुष्का शर्माने हा व्हिडिओ लाईक केला' हे कळताच चाहत्यांचा आनंद द्विगुणित झाला. अनेकांनी अंदाज लावला की, अनुष्काने हा रील नक्कीच विराटला दाखवला असणार!

इंटरनेटवर आलेल्या काही मजेदार प्रतिक्रिया

एका युजरने लिहिले, "धोकेबाज हो आप कोहली भाई." दुसऱ्या एका चाहत्याने थेट अनुष्काला टॅग करून लिहिले, "अनुष्का, तुमच्या पतीला सांगा की मी सुद्धा त्याच्यासोबत होतो!" यावरून स्पष्ट होते की, विराटच्या चाहत्यांनी केवळ त्याला साथ दिली नाही, तर त्याच्या वैयक्तिक आयुष्यातील वक्तव्यांवरही ते भावनिकरित्या जोडलेले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IPL Mini Auction 2026: धोनीच्या चेन्नईत नव्या दमाच्या खेळाडूंची एन्ट्री! दोन अनकॅप्ड खेळाडूंवर 28 कोटींची उधळण; प्रशांत वीर आणि कार्तिक शर्मा कोट्यधीश

"लग्न केवळ कागदावर उरलं असेल तर ते तोडणंच बरं!" 24 वर्षांपासून रखडलेल्या घटस्फोटाच्या वादावर सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निकाल

IPL Mini Auction 2026: केकेआरचा 'मास्टरस्ट्रोक'! मथीशा पाथिरानाला 18 कोटींत केलं खरेदी; सीएसकेच्या 'बेबी मलिंगा'वर शाहरुखने लावली मोठी बोली

Luthra Brothers Arrested: 'बर्च बाय रोमिओ लेन' च्या मालकांचा खेळ खल्लास! दिल्ली विमानतळावर लुथरा बंधूंना गोवा पोलिसांकडून अटक

IPL Mini Auction 2026: पैशांचा पाऊस! कॅमेरुन ग्रीनसह 'हे' 4 खेळाडू आयपीएल लिलावात मालामाल; मोडले सर्व रेकॉर्ड्स

SCROLL FOR NEXT